मोठी बातमी, झायडसच्या Virafinला मंजुरी; वाचा काय आहे हे औषध
झायडस कंपनीच्या Virafin या औषधाला मंजुरी देण्यात आली आहे. डीसीजीआयने ( ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया) या औषधाला मंजुरी दिली आहे. (Zydus gets emergency use approval for Virafin)
नवी दिल्ली: झायडस कंपनीच्या Virafin या औषधाला मंजुरी देण्यात आली आहे. डीसीजीआयने ( ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया) या औषधाला मंजुरी दिली आहे. कोरोनाच्या सौम्य लक्षणे असलेल्यांसाठी हे औषध रामबाण उपाय ठरणार आहे. हे औषध घेतल्यानंतर अवघ्या सात दिवसात आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह येणार असल्याचा दावा झायडस कॅडिलाने केला आहे. 91.15 टक्के रुग्णांवर या औषधांचा प्रयोग करण्यात आला असून त्यातून हे सिद्ध झाल्याचंही झायडसने म्हटलं आहे. (Zydus gets emergency use approval for Virafin)
वेरिफीन ही दवा सौम्य लक्षणे असलेल्या 18 वर्षांवरील व्यक्तिंवर परिणामकारक ठरली आहे. क्लिनिकल ट्रायलमध्ये 91.15 टक्के रिझल्ट्स चांगले आले आहेत, असा दावा कंपनीने केला आहे. या निष्कर्षावरून वेळेतच रुग्णांना औषध दिल्यास ते लवकर बरे होण्यास मदत होते. त्यामुळे आजार बळावण्यापासून रोखला जाऊ शकत असल्याचंही कंपनीने म्हटलं आहे.
250 जणांवर ट्रायल
भारतात 20 ते 25 केंद्रावरील 250 रुग्णांवर या औषधांची तिसरी ट्रायल घेण्यात आली. त्याचे विस्तृत निष्कर्ष लवकरच प्रकाशित करण्यात येणार असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. सुरुवातीलाच हे औषध दिल्यावर रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होत असल्याचा दावाही या कंपनीने केला आहे. केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच रुग्णांना हे औषध देण्यात येणार आहे. सर्वच रुग्णालयांमध्ये हे औषध उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
औषधाचं काम कसं होतं?
PegIFN गेल्या अनेक वर्षांपासून क्रोनिक हेपेटायटिस बी आणि हेपेटायटिस सी रुग्णांमध्ये मल्टिपल डोससह सुरक्षित असल्याचं दिसून आलं आहे. Pegylated Interferon Alpha 2b च्या वापरानंतर रुग्णांना सप्लिमेंट ऑक्सिजनची कमी आवश्यकता भासल्यांच एका परीक्षणातून दिसून आलं आहे. त्यामुळे हे औषध रेसपिरेटरी डिस्ट्रेसला कंट्रोलमध्ये ठेवण्यात सक्षम असल्याचं दिसून येत आहे, असंही कंपनीने म्हटलं आहे.
दोन दिवसात सहा लाख रुग्ण
गेल्या दोन दिवसात देशात सहा लाखाहून कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. सध्या केवळ व्हॅक्सीनवरच भर दिला जात आहे. आतापर्यंत सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिीन या दोनच औषधांचा वापर केला जात आहे. लवकरच रशियाची स्पुतनिक-V सुद्धा लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतातील कोरोना संसर्गावर नियंत्रण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Zydus gets emergency use approval for Virafin)
VIDEO | महाफास्ट न्यूज 100 | MahaFast News 100 | 7 AM | 23 April 2021 https://t.co/nO3rBBqcnP #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 23, 2021
संबंधित बातम्या:
Corona Cases and Lockdown News LIVE : नाशिकमध्ये अनेक खासगी हॉस्पिटलमधील ऑक्सिजन संपला
(Zydus gets emergency use approval for Virafin)