रशियाच्या राजनैतिक मिशनच्या 12 सदस्यांची हकालपट्टी, युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे मोठे पाऊल

अमेरिकेने संयुक्त राष्ट्रातील 12 रशियन राजनैतिक अधिकाऱ्यांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अमेरिकेने हे अगदी मोठं पाऊल उचललं असल्याचं अनेकांनी म्हणटलं आहे. वृत्तसंस्थांच्या वृत्तानुसार, अमेरिकेने म्हटले आहे की, 12 रशियन राजनैतिक अधिकाऱ्यांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत.

रशियाच्या राजनैतिक मिशनच्या 12 सदस्यांची हकालपट्टी, युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे मोठे पाऊल
रशियाच्या राजनैतिक मिशनच्या 12 सदस्यांची हकालपट्टीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 11:33 AM

रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) यांच्यातलं युद्ध आता शिगेला पोहचल्याचं पाहायला मिळत आहे. रशियाने युक्रेनमध्ये आक्रमण केल्यापासून मागच्या पाच दिवसात प्रचंड मोठं नुकसान केल्याचं पाहायला मिळत आहे. युक्रेनची राजधानी कीव (kiev) या शहरात आत्तापर्यंत सगळ्यात जास्त हल्ला केला असून तिथं सरकारी इमारती आणि लष्कर साठ्यावरती हल्ला करण्यात आला आहे, त्यामुळे युक्रेनचे अनेक सैनिक आणि सामान्य नागरिकांचा मृत्यू झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या तिथली परिस्थिती अत्यंत बिकत असून लोक दहशती खाली राहत असल्याचे समजते. विशेष म्हणजे कीव शहरात आत्तापर्यंत अधिक बॉम्ब हल्ला करण्यात आला असून तिथल्या इमारतींना तडे गेले आहेत. रशियासमोर ठामपणे उभ्या असलेल्या युक्रेनने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षांना उद्देशून एक पत्र पाठवले आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनेही युक्रेनच्या पत्राच्या अजेंड्यावर दुपारी 3 पासून बैठक बोलावली आहे. त्यामुळे अमेरिकेने मोठं पाऊल उचललं असल्याची चर्चा सगळीकडे पाहायला मिळते.

12 अधिका-यांना देश सोडण्याचे आदेश

अमेरिकेने संयुक्त राष्ट्रातील 12 रशियन राजनैतिक अधिकाऱ्यांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अमेरिकेने हे अगदी मोठं पाऊल उचललं असल्याचं अनेकांनी म्हणटलं आहे. वृत्तसंस्थांच्या वृत्तानुसार, अमेरिकेने म्हटले आहे की, 12 रशियन राजनैतिक अधिकाऱ्यांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रशियाला याबाबत कोणतं पाऊल उचलणार किंवा अमेरिकेला काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धामुळे इतर देशांवर मोठा परिणाम होणार असल्याचे म्हटले होते. परंतु काही दिवसातचं परिणाम सुरू होतील असं चित्र आहे.

रशियाच्या विरोधात सीमेवरती निदर्शने

न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयाबाहेर युक्रेनचे नागरिक मोठ्या संख्येने जमले होते. त्यांनी रशिया आणि युक्रेन सध्या सुरू असलेल्या युद्धाविरोधात जोरदार घोषणा देत निदर्शन केलं. तसेच युक्रेनच्या नागरिकांनी रशियाच्या संयुक्त राष्ट्रातून बाहेर पडण्याची सुध्दा मागणी केली आहे. साधारण अडीच लाख लोकांनी जर्मनीत रस्त्यावर उतरून रशियाच्या विरोधात निदर्शन दिली आहेत. तसेच युक्रेनची सीमाजवळ सुध्दा रशियांच्या पुकारलेल्या युद्धाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली आहेत.

सध्याच्या युद्धाने कोणाचाही फायदा होणार नाही

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत चीनने आपली भूमिका मांडली त्यावेळी त्यांनी सांगितलं की सध्या सुरू असलेल्या रशिया आणि युक्रिया यांच्या युद्धामुळे कोणत्याही देशाचा फायदा होणार नसून विशेष म्हणजे रशियाने बाजूने चीन उभा राहिल्याने अनेकांना आच्छर्य वाटले आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत रशियाविरोधातील ठरावावरील मतदानातही चीनने भाग घेतला नाही. त्यामुळे अनेकांना आच्छर्य वाटले आहे.

Russia Ukrane War: तब्बल 64 KM चा रशियन ताफा, कीवला घेरण्यासाठी रशिया सज्ज

रशियाकडून व्हॅक्यूम बॉम्बचा वापर, काय आहे बॉम्बची खासियत; जिनिव्हा करारानुसार बंदी

यांना तर उत्तर कोरियातच सोडलं पाहिजे, युक्रेनमधून सुटका झालेल्या विद्यार्थ्यांच्या उन्मादी वर्तनावर लोक भडकले

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...