318 ऑक्सिजन कंसंट्रेटर काही तासांत भारतात येणार; अमेरिकतून विमान निघालं

भारतात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने अमेरिकेने भारताला मोठी मदत केली आहे. (318 oxygen concentrator loaded into air india plane departs from us to delhi)

318 ऑक्सिजन कंसंट्रेटर काही तासांत भारतात येणार; अमेरिकतून विमान निघालं
Oxygen Concentrator
Follow us
| Updated on: Apr 26, 2021 | 12:57 PM

वॉशिंग्टन: भारतात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने अमेरिकेने भारताला मोठी मदत केली आहे. अमेरिकेने भारताला 318 ऑक्सिजन कंसंट्रेटर दिले असून या मशीन्स घेऊन एअर इंडियाच्या विमानाने अमेरिकेतून उड्डाण केलं आहे. अवघ्या काही तासातच या मशीन्स भारतात दाखल होणार असून त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग यांनी याबाबतचं ट्विट करून माहिती दिली आहे. (318 oxygen concentrator loaded into air india plane departs from us to delhi)

नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. प्रत्ये व्यक्तीचा अनमोल प्राण वाचवण्यासाठी आणि कोरोना संकटावर मात करण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयाकडून करण्यात आलेला हा प्रयत्न आहे, असं सिंग यांनी म्हटलं आहे.

काय आहे ऑक्सिजन कंसंट्रेटर

ऑक्सिजन कंसंट्रेटर ही सामान्य हवेद्वारे ऑक्सिजन तयार करणारी मशीन आहे. ही मशीन रुग्णांसाठी एक प्रकारची जीवन संजीवनीच आहे. ऑक्सिजन कंसंट्रेटर हे गृह विलगीकरणात असलेल्यांसाठी एक चांगला पर्याय आहे. देशात बीपीएल आणि फिलिप्स या दोन मुख्य कंपन्याच या मशीनचे उत्पादन करतात. हे ऑक्सिजन कंसंट्रेटर ऑक्सिजन सिलिंडरपेक्षा खूप वेगळे असतात.

मेडिकल ऑक्सिजन कंसंट्रेटरसाठी 30 ते 60 हजार रुपयात बनवले जातात. काही पोर्टबल मशीन खूप छोट्या असतात. त्याची किंमत 3 ते 5 हजार रुपये असते. या मशीन वीज किंवा बॅटरीवर चालतात. ऑक्सिजन सिलेंडर आणि रिफलिंगच्या तुलनेत या मशीन स्वस्त आणि सुरक्षित आहेत. कंसंट्रेटर ऑक्सिजनचे नवीन मॉल्युक्लर बनवत नाहीत. तर हवेतील नायट्रोजन वेगळे करतात, त्यातून ऑक्सिजन कायम राहतो.

बायडेन काय म्हणाले?

भारतातील कोरोनाचं संकट वाढल्याने अनेक देशांनी भारताला मदतीचा हात दिला आहे. महामारीच्या काळात जेव्हा आम्ही संकटात होतो. तेव्हा भारताने आम्हाला मदत केली. आता भारताच्या संकटावेळी आम्ही त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यास कटिबद्ध आहोत, असं अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी सांगितलं. (318 oxygen concentrator loaded into air india plane departs from us to delhi)

संबंधित बातम्या:

NSA प्रमुख अजित डोवाल मैदानात, अमेरिकेकडून लसीच्या कच्च्या मालाला हिरवा कंदील, नेमकं काय घडलं?

अमेरिकेनं भारताचं ‘रॉ’ मटेरियल रोखलं, चीननं डिवचलं, तीन देश, एक कार्टून, वाचा सविस्तर

NSA प्रमुख अजित डोवाल मैदानात, अमेरिकेकडून लसीच्या कच्च्या मालाला हिरवा कंदील, नेमकं काय घडलं?

(318 oxygen concentrator loaded into air india plane departs from us to delhi)

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.