Texas : तब्बल 46 प्रवाशांच्या मृत्यूने एकच खळबळ! टेक्ससमध्ये एका ट्रॉलरमध्ये गुदमरुन 46 प्रवाशांचा मृत्यू की मोठा घातपात?
Texas Dead body News : 46 मृतदेह काढून त्यांची ओळख पटवणं, त्यांचं पोस्टमॉर्टेम करणं आणि रुग्णालयात हे सगळे मृतदेह पाठवण्याचं काम सुरु आहे.
अमेरिकेतून (America news) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. तब्बल 46 प्रवाशांचे मृतदेह एकाचवेळी एकाच ट्रॉलरमध्ये (Tractor-Trailer) आढळून आले आहेत. मृतदेहांनी भरलेला हा ट्रॉलर पाहून पोलीसही हादरुन गेलेत. अमेरिकेच्या टेक्सास (Texas News) प्रांतात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करत आहेत. नेमका या 46 प्रवाशांचा मृत्यू नेमका का झाला आहे, यावरुन शंका उपस्थित केली जातेय. सैन एंटोनियोमधील कॅसेट टेलीव्हीजनने दक्षिण टेक्सासमध्ये प्रवाशांच्या तस्करी दरम्यान या लोकांच्या मृत्यूबाबतचं वृत्त दिलंय. मृतदेहांना खचाखच भरलेला हा ट्रॉलर सैन एंटोनियोच्या दक्षिण पश्चिम भागात आढळला. एका ट्रॅक्टरला हा ट्रॉलर लावण्यात आलेला होता.
पोलिसांकडून तपास सुरु
अमेरिकेतील वृत्तसंस्थांच्या हवाल्यानं एएफपी वृत्तसंस्थेनंही याबाबतचं वृत्त दिलंय. एका रेल्वे ट्रॅक शेजारी ही घटना उघडकीस आली. रेल्वे ट्रॅक शेजारी तब्बल 46 मृतदेहांची भरलेला हा ट्रक रस्त्याच्या आडोशाला उभा होता. सेंट एंटोनियो शहराच्या बाहेरील भागात गी घटना उघडकीस आली आहे. सेंट एंटोनियो पोलिसांनी ही घटना कळताच या ठिकाणी धाव घेतली. त्यानंतर आता संबंधित तज्ज्ञ तपास यंत्रणांनाही तैनात करण्यात आलं असून पुढील तपास केला जातोय.
#UPDATE At least 46 migrants have been found dead in and around a tractor-trailer that was abandoned on the side of a road in San Antonio, Texas, authorities say.
The grim discovery was one of the worst disasters involving migrants in the United States in recent years pic.twitter.com/Ins0sBjaEk
— AFP News Agency (@AFP) June 28, 2022
समोर आलेल्या फोटोमध्ये लांबच लांब पोलिसांच्या गाड्या लागल्या असून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आल्याचंही दिसून आलं आहे. तपास यंत्रणा कामाला लागल्या असून 46 मृतदेह काढून त्यांची ओळख पटवणं, त्यांचं पोस्टमॉर्टेम करणं आणि रुग्णालयात हे सगळे मृतदेह पाठवण्याचं काम सुरु असल्याचंही दिसून आलंय.
At least 40 found dead in tractor-trailer in Texas, reports AFP News Agency quoting US media
— ANI (@ANI) June 28, 2022
अपघात की घातपात?
एकाच वेळी 46 प्रवाशांच्या मृत्यूनं सगळेच हादरले आहेत. हा अपघात होती की घातपात, यावरुनही शंका उपस्थित केली जातेय. दरम्यान, मॅक्सिकोच्या परराष्ट्र मंत्र्यांनी हे प्रवासी नेमके कोणत्या देशातले आहेत, त्यांचं नागरीकत्व कुठलं होतं, याबाबत शोध घेतला जात असल्याचं म्हटलं आहे. ट्रॉलरमध्ये गुदरमरल्यामुळे या प्रवाशांचा श्वास कोंडला असावा आणि त्यातच त्यांचा जीव गेला असावा, अशी शंका घेतली जातेय. मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांच्या प्रती हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेचा आता विशेष पथकाकडून तपास केला जातोय.