China crisis: चीनमध्ये 48 हजार कोटींचा बँकिंग घोटाळा, लाखो ग्राहकांची खाती गोठवली, बँकांमध्ये जाण्यावर बंदी, बँकांसमोर लष्करी रणगाडे
याबाबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ हेनान प्रांतातील आहे. या ठिकाणी अनेक रणगाडे एका रांगेत उभे असल्याचे या व्हिडीओत दिसते आहे. प्रशासनाने लोकांनी बँकांमध्ये घुसू नये यासाठी रणगाडे तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.
बिजिंग – चीनमध्ये मोठे बँकिंग संकट (Banking Crisis)उभे राहिले आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, अनेक बँकांनी ग्राहकांवर पैसे काढण्यासाठी निर्बंध लावले आहेत. त्यामुळे हजारो नागरिक रस्त्यावर येऊन निदर्शने (protest by people)करीत आहेत. अनेक ठिकाणी ही आंदोलने हिंसक झाली आहेत. त्यामुळे आता बँकांच्या आजूबाजूला रणगाडे तैनात (Tanks deployed)करण्यात आले आहेत. याबाबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ हेनान प्रांतातील आहे. या ठिकाणी अनेक रणगाडे एका रांगेत उभे असल्याचे या व्हिडीओत दिसते आहे. प्रशासनाने लोकांनी बँकांमध्ये घुसू नये यासाठी रणगाडे तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.
El gobierno de China manda tanques a una sucursal de Bank of China en la ciudad de Henan porqué el banco cancelo los retiros de dinero… #Bitcoin soluciona esto… pic.twitter.com/kkFpxvqZYv
हे सुद्धा वाचा— Mr. M (@MichelPesquera) July 20, 2022
काय आहे प्रकरण
एप्रिलमध्ये दक्षिण चायना मॉर्निंग पोस्टमध्ये एक बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यात चिनी बँकांमध्ये झालेल्या घोटाळ्याची माहिती देण्यात आली होती. त्यात 40 अब्ज युआन म्हणजेच ६ अब्ज डॉलर्स चीनच्या बँकिंग व्यवस्थेतून गायब झाल्याचा दावा करण्यात आला होता. यानंतर हेनान आणि अनहुई प्रांतातील बँकांनी ग्राहकांना बँकेतून पैसे काढण्यावर पूर्णपणे निर्बंध घातले आहेत. त्यासाठी सिस्टिम अपग्रेडचे कारण देण्यात आले होते.
This is huge. Don’t know how this will end. Henan bank is NOT the only one that is having problems with liquidity. All four Chinese banks are having the same issue. Some depositors found they can save and can NOT withdraw money with their bank cards. #bankrun #China #CCP pic.twitter.com/5WYYgpmIWP
— Jennifer Zeng 曾錚 (@jenniferatntd) July 10, 2022
4 बँकांना सर्वाधिक फटका
या संपूर्ण प्रकरणात न्यू ओरिएंटल कँपिंग बँक ऑफ कैफेंग, जिचेंग हुआंगहुई कम्युनिटी बँक, शांगकाई हुईमिन काउंटी बँक आणि युजौ शिन मिन विलेज बँक या चार बँकांवर जास्त परिणाम झाला आहे. या ठिकाणी ग्राहक गेल्या ३ महिन्यांपासून बँकांत जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यांना आत प्रवेश दिला जात नाहीये.
इतिहासाची पुनरावृत्ती
रस्त्यांवरती रणगाडे पाहून चिनी नागरिक या प्रकरणाची तुलान शियानमन चौकातील घटनेशी करीत आहे. 1989 मध्ये चिनी नागरिकांनी थियानमन स्क्वेअरमध्ये सरकारविरोधी आंदोलन सुरु केले होते. तयावेळी सैन्यदलाने आंदोलनकर्त्यांवर रणगाडे घातले होते. यात 3 हजाराहून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. युरोपीय माध्यमांनी या आदोलनावेळी 10 हजार जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले होते.