AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरारा, तिच्यासाठी लावली चक्क 122 कोटींची बोली, ‘ती’ ठरली जगातली सर्वात महागडी…

दुबईतील जुमेराह येथील फोर सीझन हॉटेलमध्ये 'मोस्ट नोबल नंबर्स'चा नंबर प्लेट आणि मोबाइल नंबरचा लिलाव करण्यात आला. हा लिलाव केवळ विलास आणि उधळपट्टीसाठी नव्हता. तर त्यामागे एक उद्देश होता.

आरारा, तिच्यासाठी लावली चक्क 122 कोटींची बोली, 'ती' ठरली जगातली सर्वात महागडी...
DUBAI NEWSImage Credit source: TV9 NETWORK
Follow us
| Updated on: Apr 10, 2023 | 10:50 PM

SITE : SITE LINK : https://www.tv9marathi.com/international FB : गड्याचा नादच खुळा, नंबर प्लेटसाठी मोजले तब्बल 122 कोटी, असा कोणता नंबर ज्यासाठी तो इतका वेडापिसा झाला ? ENGLISH TITLE : a bid of 122 crores was made for her she became the most expensive in the world YOU TUBE LINK : TAGS :

दुबई : आपल्या घरात नवनवीन गाड्या असाव्यात, जगभरातलं कारचं कुठलंही मॉडेल आपल्याकडे असावं अशी अपेक्षा असणारे अनेक महाभाग जगात आहेत. महागड्या कार घेण्याचा अशा लोकांना जणू छंदच जडलेला असतो. काहींकडे फेरारी, काहींकडे ऑडी, BMW, मर्सिडीज अशा महागड्या गाड्यांचा ताफा असतो. महागड्या गाड्या घेण्याचा आपला छंद किंवा इच्छा पूर्ण करण्यासाठी ते पाण्यासारखा पैसे खर्च करतात. भारतातील RTO कार्यालये देखील फॅन्सी नंबर विकतात आणि लोक त्यांना स्वतःचे बनवण्यासाठी मोठी बोली लावतात. इथपर्यंत ठीक आहे. मात्र, यावेळी एक अशी कार नंबर चर्चेत आहे, जी जगातील सर्वात महागडी नंबर प्लेट बनली आहे. फक्त गाडीच्या नंबर प्लेटसाठी त्या महानगाने तब्बल 122 कोटीची बोली लावली.

हे सुद्धा वाचा

याआधी 2008 मध्ये सर्वात महागडी नंबर प्लेट विकण्याचा विक्रम झाला होता. त्यावेळी अबू धाबीमध्ये गाडीच्या नंबर प्लेटसाठी बोली लावण्यात आली होती. त्या बोलीत अनेकांनी भाग घेतला होता. पण, बुगाटी कारचा मालक असलेल्या एका व्यावसायिकाने 52.22 दशलक्ष दिरहमची बोली लावून ती नंबर प्लेट मिळविली होती. तो नंबर होता “F1”. त्यामुळे ती सर्वात महागडी नंबरप्लेट म्हणून ओळखली जात होती. परंतु, त्या नंबरप्लेटचा विक्रम या नंबरप्लेटने मोडीत काढला.

दुबईतील जुमेराह येथील फोर सीझन हॉटेलमध्ये ‘मोस्ट नोबल नंबर्स’चा नंबर प्लेट आणि मोबाइल नंबरचा लिलाव करण्यात आला. हा लिलाव केवळ विलास आणि उधळपट्टीसाठी नव्हता. तर त्यामागे एक उद्देश होता. या कार्यक्रमातून मिळणारे उत्पन्न हे भूक विरोधात लढण्यासाठी वापरले जाणार होते. या मिळालेल्या पैशाचा विनियोज रमजान जेवण मोहिमेसाठी करण्यात येणार होता. या लिलावामधून सुमारे 2 अब्ज 18 कोटी रुपये जमा करण्यात आले.

सुरुवातीची बोली 15 दशलक्ष

याच लिलावादरम्यान ‘P 7’ ही कारची नंबर प्लेट आकर्षण ठरली. त्या नंबर प्लेटची सुरुवातीची बोली 15 दशलक्ष दिरहम होती. जी काही सेकंदात वाढून 30 दशलक्ष दिरहम झाली. अखेरीस ही बोली 35 दशलक्षवर येऊन थांबली. टेलीग्राम अॅपचे संस्थापक आणि मालक फ्रेंच एमिराती व्यापारी पावेल व्हॅलेरिविच दुरोव यांनी ही बोली लावली होती.

त्यानंतर दुसरी बोली लागली, ज्याने त्या नंबर प्लेटची किंमत 55 दशलक्ष दिरहमपर्यंत आणली. त्या दोन अक्षरी नंबर प्लेटची भारतीय चलनात सुमारे 122.5 कोटी रुपये इतकी किंमत आहे. त्यामुळे या वर्षी लिलाव झालेल्या जगातील ती सर्वात महाग नंबर प्लेट ठरली. या लिलावामधून मिळणारे सर्व पैसे ‘वन बिलियन मील्स’ मोहिमेसाठी सुपूर्द करण्यात येणार आहेत.

खरेदीदाराने घातली ही अट

ज्या व्यक्तीने ही नंबर प्लेट सर्वाधिक रकमेला खरेदी केली त्याने एकच अट ठेवली आहे. आपले नाव उघड करू नये अशी अट त्या व्यक्तीने ठेवली आहे. या लिलावादरम्यान इतर अनेक व्हीआयपी नंबर प्लेट्स आणि फोन नंबरचाही लिलाव करण्यात आला. यातून सुमारे 100 दशलक्ष दिरहम ($27 दशलक्ष) जमा झाले आहेत. मात्र, या सर्वात अव्वल स्थानी पोहोचला तो ‘पी7’ ही नंबरप्लेट

'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य
'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?.
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू.
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी.
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय.
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं..
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं...
हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्...
हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्....
'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय...
'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय....
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी.