इस्रायलच्या सैन्याकडून झाली मोठी चूक, पंतप्रधानांच्या विरोधात लोकं उतरले रस्त्यावर

Israel vs Hamas : इस्रायली सैनिकांकडून मोठी चूक झाली आहे. त्यामुळे लोक रस्त्यावर उतरले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बेंजामिन नेतान्याहू यांच्या विरोधात तेल अवीवमध्ये निदर्शने सुरू आहेत. ओलीसांच्या सुटकेसाठी आंदोलकांनी सरकारशी तडजोड करण्याची मागणी केली आहे.

इस्रायलच्या सैन्याकडून झाली मोठी चूक, पंतप्रधानांच्या विरोधात लोकं उतरले रस्त्यावर
israel
Follow us
| Updated on: Dec 16, 2023 | 8:10 PM

Israel – hamas war : इस्रायलच्या सैनिकांडून मोठी चूक झाली आहे. शुक्रवारी तीन ओलिसांना धोका समजून सैनिकांनी त्यांना गोळ्या घालून ठार केले. पण ते इस्रायलचेच नागरिक असल्याचं समोर आले आहे. 7 ऑक्टोबरला हमासच्या ठिकाणांवर कारवाई करताना तीन ओलीस ठेवण्यात आलेल्या बंधकाना धोका असल्याचं समजून सैनिकांनी ठार केले. त्यामुळे आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर टीका होऊ लागली आहे. बेंजामिन नेतान्याहू यांच्या विरोधात लोकं रस्त्यावर उतरली आहेत. घटनेची माहिती मिळताच लोकांनी लष्करी तळाकडे मोर्चा वळवला. उर्वरित ओलीसांच्या सुटकेसाठी तडजोड करण्याची मागणी लोकांकडून होऊ लागली आहे. हमासने अनेकांना ओलीस ठेवले आहे. अजूनही 100 हून अधिक ओलीस हमासच्या ताब्यात आहेत.

बेंजामिन नेतन्याहू यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण इस्रायल शोक करत आहे. या कठीण प्रसंगी माझे हृदय शोकाकुल कुटुंबांसोबत आहे.”

लष्कराने एका निवेदनात म्हटले की, कारवाई दरम्यान हे तिनही लोकं एकतर सूटका करुन पळाले किंवा त्यांना हमासनेच सोडले असावे. पण धोका असल्याचे चिन्ह दिसल्याने त्यांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला. या दु:खद घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करतो. या गंभीर घटनेतून तात्काळ धडा घेण्यात आला आहे.

अमेरिकेने म्हटले – हे दुःखद आहे

व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सांगितले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा पथकाने शुक्रवारी गाझामध्ये इस्रायली सैन्याने तीन ओलीसांची चुकून हत्या केल्याची माहिती दिली. ते दुःखद आहे,”

7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यादरम्यान हमासने सुमारे 250 लोकांचे अपहरण करून त्यांना ओलीस ठेवले होते. या हल्ल्यात 1,139 लोकांचा मृत्यू झाला होता. हमासने म्हटले की, इस्रायलच्या प्रत्युत्तरादाखल हल्ल्यात 18,700 हून अधिक लोक मारले गेले आहेत.

अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.