Israel-Hamas war : हमासकडून इस्रायलला मोठी जखम, गाझामध्ये इतके इस्रायली ओलीस

हमासचे दहशतवादी इस्रायलमध्ये घुसल्याने युद्ध घातक बनले आहे. दोन्ही बाजूंच्या मृत्यूची संख्या सातत्याने वाढत आहे. एवढेच नाही तर इस्त्रायल आणि हमासकडून जोरदार बॉम्बफेक सुरू आहे. हमास संचालित गाझा आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सांगितले की गेल्या 11 दिवसांत 3,478 पॅलेस्टिनी ठार झाले आणि 12,000 हून अधिक जखमी झाले.

Israel-Hamas war : हमासकडून इस्रायलला मोठी जखम, गाझामध्ये इतके इस्रायली ओलीस
israel-palestine-war
Follow us
| Updated on: Oct 19, 2023 | 5:33 PM

Israel – Hamas War : इस्रायल विरुद्ध हमास यांच्यात गेल्या १२ दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत 306 इस्रायली सैनिकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायल डिफेन्स फोर्सेसचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी गुरुवारी माहिती दिली की, हमासने गाझामध्ये किमान २०३ लोकांना ओलीस ठेवले असून ओलिसांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. 7 ऑक्टोबरपासून हमाससोबत सुरु असलेल्या युद्धात 306 सैनिक मारले गेले आहेत.

अनेक इस्रायली नागरिक बेपत्ता

इस्रायली लष्कराचे प्रवक्ते म्हणाले की, मृत आणि ओलीसांची ही संख्या निश्चित नाही, कारण IDF 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर बेपत्ता असलेल्या इस्रायलींची माहिती गोळा करत आहे. काही प्रकरणांमध्ये कुटुंबांना माहिती देण्यात आली होती की त्यांना हमासच्या ताब्यात ठेवल्याचा संशय आहे.

हमासला संपवण्याची शपथ

हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये घुसून इस्रायलवर रॉकेट हल्ला केल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासला संपवण्याची शपथ घेतली आहे. यानंतर गाझामधील युद्ध जीवघेणे बनले आहे. दोन्ही बाजूंच्या मृत्यूची संख्या सातत्याने वाढत आहे. एवढेच नाही तर इस्त्रायल आणि हमासकडून जोरदार बॉम्बफेक सुरू आहे. हमासच्या गाझा आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सांगितले की, गेल्या 11 दिवसांत 3,478 पॅलेस्टिनी ठार झाले आणि 12,000 हून अधिक जखमी झाले.

हमासमध्ये 1400 हून अधिक लोकं ठार

इस्रायलच्या लष्करी प्रवक्त्याने सांगितले की, हमासच्या हल्ल्यात इस्रायलमध्ये 1400 हून अधिक लोक मारले गेले आहेत. दरम्यान, न्यूज एजन्सी एपीच्या वृत्तानुसार, दक्षिण गाझा शहरातील एका घरावर हवाई हल्ला झाला, ज्यामध्ये सात लहान मुले ठार झाली. स्थानिक लोक आणि डॉक्टरांच्या हवाल्याने एजन्सीने ही बातमी दिली आहे. ही बातमी सोशल मीडियावर त्वरीत पसरली, कारण हॉस्पिटलच्या स्ट्रेचरवर शेजारी पडलेल्या मृत आणि रक्ताळलेल्या मुलांच्या भयानक प्रतिमा समोर आल्या, ज्यामुळे गाझा आणि वेस्ट बँकमध्ये संताप पसरला.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.