चीनचा आता वाघांच्या युरिनपासून नवा धंदा, मद्यासोबत घेतल्यास मोठा फायदा होणार असल्याचा दावा
नेहमीच निरनिराळे उपदव्याप करणाऱ्या चीनमधील एका प्राणीसंग्रहालयाने नवा बिझनेस सुरु केला आहे. या प्राणी संग्रहालयाने चक्क वाघाची लघवी विकण्यास सुरुवात केली आहे. या वाघाच्या लघवी पासून निरनिराळे आजार बरे होतात असा दावा या प्राणी संग्रहालयाने केला आहे.
![चीनचा आता वाघांच्या युरिनपासून नवा धंदा, मद्यासोबत घेतल्यास मोठा फायदा होणार असल्याचा दावा चीनचा आता वाघांच्या युरिनपासून नवा धंदा, मद्यासोबत घेतल्यास मोठा फायदा होणार असल्याचा दावा](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/tiger-urin.jpg?w=1280)
चीन हा चित्र विचित्र प्राणी आणि जीवजंतूंचे सेवन करणारा देश असून अनेक विषाणूंचे माहेरघर देखील बनला आहे. चीन येथील प्राणीसंग्रहालय आता सोशल मीडियावर खूप गाजत आहे. परंतू यामागे मोठे चमत्कारिक कारण आहे. चीनचे हे प्राणी संग्रहालय वाघांची युरिन विकत आहे. या वाघांच्या युरिनला प्यायल्यास संधीवातासह अनेक आजारांवर उपचार केला जात आहे. वाघांच्या युरिनला जर व्हाईट वाईन सोबत घेतले तर अधिक फायदा होतो असा दावा चीनी लोकांनी केला आहे. या वाघाच्या मूत्रांची किंमत देखील मोठी आहे. एका बाटलीसाठी सहाशे रुपये खर्च करावे लागत आहे.
वाघांच्या युरिनमध्ये जर व्हाईट वाईन घालून प्यायल्यास तुमची तब्येत एकदम ठणठणीत होते असा चीनच्या सिचुआन प्रांतांच्या यान बिफेंगक्सिया वाईल्डलाईफ प्राणीसंग्रहालयाने दावा केला आहे. साऊथ मॉर्निग चायना यांनी केलेल्या पोस्टनुसार या प्राणीसंग्रहालयाला भेट दिल्यानंतर एका व्यक्तीने ही पोस्ट टाकली आहे. या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार सायबैरियातील वाघांचे युरिन सांगून येथे या युरिनची विक्री केली जात आहे. वाघांच्या या युरिनच्या २५० मिली बाटलीची किंमत ५० युआन आहे म्हणजे ६०० रुपये..
वाघांच्या युरिनचे काय फायदे
या युरिनच्या बाटलीवर संधीवात, चमक, स्नायूंचे दुखणे, मांसपेशींचे दुखण्यापासून या युरिनमुळे आराम मिळतो. या बाटलीवर याचा वापर कसा करायचा याची कृती देखील दिली आहे. युरिनला व्हाईट वाईनमध्ये आल्याच्या तुकड्यांसोबत एकत्र मिसळून प्यायल्यास तसेच प्रभावित भागांवर हे औषधांप्रमाणे लावावे असेही या बाटलीवर लिहीले असल्याचे या बातमीत म्हटले आहे.
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/buldhana-hair-loss-news.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/mahakumbh2025.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/NEW-SMART-PHONE.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Papua-New-Guinea-in-Africa.jpg)
या लोकांनी वाघाची मूत्र पिऊ नये
या बाटलीवर एक सूचना देखील लिहीली आहे. जर कोणाला कोणत्याही प्रकारची एलर्जी असेल तर यापासून दूर रहावे. या वाघांच्या युरिनला तज्ज्ञांनी भ्रामक कल्पना असल्याचे म्हटले आहे. चीनच्या एका फार्मासिस्टने सांगितले की या प्रकाराने वाघांचा जीव धोक्यात तर येईलच शिवाय चीनची पारंपारिक उपचार पद्धती देखील बदनाम होत आहे.
भ्रामक दाव्यांवर युजर्सचा संताप
वाघांच्या मूत्राचा औषधी वापराचा कोणताही पुरावा नाही असे फार्मासिस्टने म्हटले आहे. परंतू प्राणी संग्रहालयाने दावा केला आहे की त्यांच्याकडे याचे बिझनेस लायसन्स आहे. सोशल मीडियावर या दाव्यावर युजर्स भडकले आहे. एका युजरने म्हटलेय की मी माझ्या वडिलासाठी ही युरिन खरेदी केली होती. परंतू कोणताही फायदा झाला नाही. दुसऱ्या अन्य एका युजर्सने म्हटलेय की वाघाची युरिन म्हणजे कल्पना करून देखील किळस वाटतेय…