मित्रासाठी इफ्तार पार्टी करीत असतानाच घर पेटले, दुबईत भारतीय दाम्प्त्यासोबत वाईट घडलं
रिजेशने शेवटचा व्हॉट्सअप स्टेटस रात्री 12.35 वाजता पाहील्याचे दिसत आहे. मला विश्वासच बसत नाहीए, ज्या माणसाने मला रविवारचे फ्लाईट बुक करण्यास मदत केली. मला इफ्तारसाठी निमंत्रण दिले तो त्याच्या पत्नीसह जगातून नाहीसा झाला आहे,

दुबई : दुबईतील एका इमारतीला आगलेल्या मोठ्या आगीत भारतीय दाम्प्त्यासह सोळा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. शेजारील मुस्लीम मित्रांसाठी ईफ्तारच्या पार्टीची तयारी करीत असताना ही आग लागून त्यात हे सर्वजण गंभीर भाजून शनिवारी रात्री जखमी झाल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, या आगीत भाजल्याने मृत्यू झालेल्या त्यांच्या राज्यातीत व्यक्तींच्या वारसांना तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी दहा लाखाच्या मदतीची घोषणा केली आहे.
दुबईतील अल-रास परिसराचील एका उंच अपार्टमेंटला शनिवारी लागलेल्या आगीत सोळा जणांचा मृत्यू झाला आहे. या आगीत एका भारतीय दाम्प्त्याचा मृत्यू झाला आहे. रिजेश कलंगादन ( 38 ) एका ट्रॅव्हल कंपनीत बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर असून त्यांची पत्नी जेशी कंदामांगलथ ( 32 ) या स्कुल टीचर आहेत.
आगप्रतिबंधक यंत्रणा नसल्याचे उघड
शनिवारी रात्री या दाम्प्त्याने विशुसंध्या साजरा करण्यासाठी ( व्हेजेटेरीयन फेस्टीव्हल ) शेजारी राहणाऱ्या केरळीय मुस्लीम बॅचलर मित्रांना रमजान निमित्ताने उपवास सोडवण्यासाठी निमंत्रण दिले होते. त्यावेळी आग लागल्याने पळापळ झाली. त्यात धुराने गुदमरल्याने आणि भाजल्याने सोळा जणांचा मृत्यू झाला. ईमारतीमध्ये पुरेशी आगप्रतिबंधक यंत्रणा नसल्याने आग विझवण्यात नागरी बचाव पथकाला वेळ लागल्याचे उघडकीस आले आहे.
इफ्तारसाठी बोलावणे आले आणि…
रियास कैकाबम हे त्याच्या सात रूममेटबरोबर या अपार्टमेंटच्या 409 मध्ये रहात असून तर ते दाम्पत्य रूम क्र. 406 मध्ये रहायला होते. आणि शेजारील फ्लॅट क्रमांक 405 मधून आगीला सुरूवात झाल्याचे म्हटले जात आहे. या दाम्प्त्याने रियास कैकामब आणि त्याच्या बॅचरल मित्रांना इफ्तार निमित्त खास केळीच्या पानावरील व्हेजीटेरीयन डीश खाण्यासाठी बोलावले होते तेव्हा हा दुर्देवी अपघात झाला.
त्यांना शेवटचे पाहीले
आग लागली तेव्हा रियास यांनी या दाम्प्त्याला शेवटचे त्याच्या अपार्टमेंट बाहेर पाहीले होते, तेव्हा जेशी कंदामांगलथ या जोराने रडत होत्या. त्यानंतर हे दाम्प्त्य पुन्हा त्याच्या घरातकडे धावत गेले. त्यानंतर त्यांचा थांगपत्ता लागला नाही. रिजेशने शेवटचा व्हॉट्सअप स्टेटस रात्री 12.35 वाजता पाहील्याचे दिसत. मला विश्वास बसत नाही ज्या माणसाने मला रविवारचे फ्लाईट बुक करण्यास मदत केली. मला इफ्तारसाठी निमंत्रण दिले तो त्याच्या पत्नीसह जगातून नाहीसा झाला आहे असे रियास याने म्हटले आहे.