सुनीता विल्यम्सला अंतराळातून परत आणण्याच्या मोहिमेला मोठा झटका, नासाने उचलले मोठे पाऊल

अमेरिकेत वादळ येण्याची शक्यता असल्याने नासाने मोठे पाऊल उचलले आहे. 26 सप्टेंबर ते 28 सप्टेंबरपर्यंत मिशनचे प्रक्षेपण पुढे ढकलले आहे. नासा आणि स्पेसएक्सने हे प्रक्षेपण पुढे ढकलले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि तिचा सहकारी अंतराळात अडकले आहेत.

सुनीता विल्यम्सला अंतराळातून परत आणण्याच्या मोहिमेला मोठा झटका, नासाने उचलले मोठे पाऊल
Follow us
| Updated on: Sep 25, 2024 | 10:56 PM

अनेक महिन्यांपासून अंतराळात अडकलेल्या भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. तिला सुखरुप परत आणता यावे म्हणून जगभरातील लोकं तिच्यासाठी प्रार्थना करत आहेत. आता SpaceX चे Crew-9 अंतराळयान सुनीता आणि तिचे सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर यांना घेण्यासाठी प्रक्षेपित केले जाणार होते. मात्र, या मोहिमेला सुरुवात होण्यापूर्वीच मोठा धक्का बसलाय. अमेरिकेत वादळ येण्याची शक्यता असल्याने नासाने मोठे पाऊल उचलले आहे. 26 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर या कालावधीत मिशनचे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले आहे. नासा आणि स्पेसएक्सने हे प्रक्षेपण पुढे ढकलण्याचा निर्णय़ घेतला आहे. प्रक्षेपणाची तारीख 25 सप्टेंबर अशी निश्चित करण्यात आली होती, परंतु नंतर ती बदलून 26 करण्यात आली. त्यानंतर 27 आणि 28 सप्टेंबर बॅकअप तारखा म्हणून ठेवण्यात आल्या होत्या, परंतु आता पुन्हा 28 सप्टेंबरपर्यंत ती पुढे ढकलण्यात आली आहे.

मोहिम पुढे ढकलली

“नासा आणि स्पेस एक्सने नासाच्या स्पेसएक्स क्रू 9 मोहिमेसाठी पुढील प्रक्षेपण आता शनिवार, 28 सप्टेंबर रोजी परिसरात वादळाच्या परिस्थितीमुळे पुढे ढकलले असल्याची माहिती दिली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केलेल्या माहितीनुसार. या लॉन्चनंतरही एक दिवसाची बॅकअप विंडो ठेवण्यात आली आहे. 28 सप्टेंबरलाही प्रक्षेपण शक्य नसेल तर 29 सप्टेंबर रोजी दुपारी 12.54 वाजता प्रक्षेपण केले जाऊ शकते. खबरदारीचा उपाय म्हणून विलंबाचा निर्णय घेण्यात आला आहे. नासाने हेलन चक्रीवादळामुळे जोरदार वारे आणि मुसळधार पावसाला उशीर झाल्याचे कारण दिले आहे. हे वादळ मेक्सिकोच्या आखातातून जाण्याची अपेक्षा आहे, परंतु त्याचा आकार आणि तीव्रता फ्लोरिडाच्या पूर्व किनाऱ्यावरील हवामानावर परिणाम करू शकते.

सुनीता विल्यम्स आणखी वाट पाहावी लागणार

Crew-9 चे लॉन्चिंग जगभरातून थेट पाहता येणार आहे. त्याचे थेट प्रक्षेपण NASA च्या YouTube चॅनेल आणि SpaceX च्या X  अकाऊंटवर लॉन्च होण्याच्या एक तास आधी सुरू होईल. दोन अंतराळवीर आधीच नासाच्या अंतराळ केंद्रात पोहोचले आहेत आणि त्यांनी या मोहिमेच्या प्रक्षेपणाची तयारी सुरू केली आहे. हे मिशन सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोरला पृथ्वीवर परत आणेल. मात्र, दोघांचे पुनरागमन आता होणार नाही, तर पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात स्पेस स्टेशनवर पोहोचलेले दोन्ही अंतराळवीर बोईंग स्टारलाइनरमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने तिथेच अडकले. नंतर, या महिन्याच्या सुरुवातीला, स्टारलाइनर कोणत्याही अंतराळवीरांशिवाय एकटाच पृथ्वीवर परतला.

बच्चू कडू यांचं मंत्रालयासमोर भर पावसात आंदोलन, मागण्या नेमक्या काय?
बच्चू कडू यांचं मंत्रालयासमोर भर पावसात आंदोलन, मागण्या नेमक्या काय?.
मुंबईत धुव्वाधार, रेड अलर्ट अन् मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना सुट्टी
मुंबईत धुव्वाधार, रेड अलर्ट अन् मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना सुट्टी.
मुसळधार पावसाचा मध्य आणि पश्चिम रेल्वेला फटका, लोकल विस्कळीत
मुसळधार पावसाचा मध्य आणि पश्चिम रेल्वेला फटका, लोकल विस्कळीत.
'बाजारबुणगे, हिंमत असेल तर...', ठाकरेंचा कोणाला अप्रत्यक्षपणे इशारा?
'बाजारबुणगे, हिंमत असेल तर...', ठाकरेंचा कोणाला अप्रत्यक्षपणे इशारा?.
'अक्षय शिंदे कोणी संत नव्हता, तो..', शर्मिला ठाकरे नेमक काय म्हणाल्या?
'अक्षय शिंदे कोणी संत नव्हता, तो..', शर्मिला ठाकरे नेमक काय म्हणाल्या?.
जरांगेंचं उपोषण स्थगित, सलग 8 दिवस उपोषण केल्यानंतर 9व्या दिवशी माघार?
जरांगेंचं उपोषण स्थगित, सलग 8 दिवस उपोषण केल्यानंतर 9व्या दिवशी माघार?.
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी कोर्टाने केले 'हे' सवाल
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी कोर्टाने केले 'हे' सवाल.
'हे न पटण्यासारखं...', मुंबई हायकोर्टानं सरकारी वकिलांनाच फटकारलं
'हे न पटण्यासारखं...', मुंबई हायकोर्टानं सरकारी वकिलांनाच फटकारलं.
मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली; शिंदे हा नालायक...
मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली; शिंदे हा नालायक....
'पवार-ठाकरे-काँग्रेसकडून लिहून घ्यावं...', फडणवीसांचं जरांगेंन आव्हान
'पवार-ठाकरे-काँग्रेसकडून लिहून घ्यावं...', फडणवीसांचं जरांगेंन आव्हान.