पाकिस्तानच्या राजकारणात नवा ट्विस्ट, पंतप्रधानपदासाठी चुरस वाढली

Pakistan politics : पाकिस्तानच्या राजकारणात सध्या नवा ट्विस्ट आला आहे. नवाज शरीफ यांच्या पक्षाला भुट्टो यांची साथ हवी आहे तरच ते सत्ता स्थापन करु शकणार आहेत. कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने सगळे जण एकमेकांवर अवलंबून आहेत. भुट्टो मात्र नवाज शरीफ यांच्यासोबत जाण्यास इच्छूक नसल्याचं बोललं जात आहे,

पाकिस्तानच्या राजकारणात नवा ट्विस्ट, पंतप्रधानपदासाठी चुरस वाढली
Follow us
| Updated on: Feb 13, 2024 | 3:01 PM

Pakistan election : पाकिस्तानमध्ये निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. नवाझ शरीफ यांचा पक्ष पीएमएल-एन आणि बिलावल भुट्टो यांचा पक्ष पीपीपी यांच्यात चर्चा सुरू असल्याची माहित सोमवारी पुढे आली होती. आता मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की पीएमएल-एनसोबत युती करण्याबाबत पीपीपीमध्ये मतभेद आहेत आणि एकमत होत नाहीये. त्यामुळे पीपीपीच्या एका गटाला पीएमएल-एनसोबत सत्तेत बसायचे आहे तर दुसरा गट पीटीआयसोबत विरोधी पक्षात बसण्याच्या बाजूने आहे.

पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) च्या सोमवारी इस्लामाबादमध्ये बैठक झाली. पण या बैठकीत कोणताही निर्णय झालेला नाही. पीपीपीच्या नेत्या शेरी रहमान यांनी सोमवारी रात्री पत्रकार परिषदेत सांगितले की, पीपीपी सर्व पक्षांशी चर्चा करेल आणि एक समिती स्थापन केली जाईल. आज पुन्हा पक्षाची बैठक होणार आहे.

बिलावल भुट्टो पीएमएल-एनसोबत युती करण्याच्या बाजूने नाहीत

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीपीपी नेते बिलावल भुट्टो हे नवाझ शरीफ यांच्या पक्षासोबत जाण्याच इच्छूक दिसत नाहीयेत. बिलावल यांच्यासह पीपीपीच्या अनेक नेत्यांना सत्तेत बसण्याची इच्छा नाही. बिलावल भुट्टो यांना वाटते की, नवाझ शरीफ यांचा पक्ष पीएमएल-एनकडे विश्वासार्हता नाही. इम्रान खान यांनी पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवारांचा मोठ्या प्रमाणात विजय झाल्याने लोकांचा मूड स्पष्ट दिसून येत आहे. अशा परिस्थितीत बिलावल यांना विरोधी पक्षात राहून नवाझ शरीफ यांच्या सरकारला कोंडीत पकडायचे आहे.

बिलावल भुट्टो यांची पीएमएल-एनशी युती करण्याची इच्छा नसली तरी त्याचे वडील पीपीपीचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी पीएमएल-एन नेत्यांशी चर्चा करत आहेत. पीएमएल-एन आणि पीपीपीमध्ये प्रत्येकी अडीच वर्षे पंतप्रधानपदाबाबत चर्चा सुरु आहे. महत्त्वाच्या मंत्रालयांच्या विभाजनावरही चर्चा सुरू आहे. पीपीपीमध्ये सरकार स्थापनेबाबत एकमत नाही आणि बिलावल भुट्टो यांना त्यांच्या वडिलांप्रमाणे स्वतःच्या तत्त्वांच्या आधारावर पक्ष चालवायचा आहे.

इम्रान खान यांच्यावरील कारवाईने नाराज

बिलावल भुट्टो हे ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवीधर आहेत. त्यांनी इम्रान खान यांच्यावर होत असलेल्या कठोर कारवाईवरही नाराजी व्यक्त केली होती. राजकारणात एवढ्या खालच्या थराला जाऊ नये, असे ते म्हणाले होते.

बिलावल भुट्टो झरदारी राजकारणात आपली वेगळी ओळख तयार करण्याच्या तयारीत दिसत आहेत. त्यामुळे पाकिस्तानात पुढचे काही तास महत्त्वाचे असणार आहे. बिलावल भुट्टो यांच्या निर्णयाकडे पाकिस्तानी जनतेचे लक्ष लागलं आहे. पीएमएल-एन आणि पीपीपी यांच्यात जरी आघाडी झाली तरी ती जास्त काळ टिकू शकणार नाही असे देखील तज्ज्ञांचे मत आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.