आयसीसला मोठा झटका, फ्रान्सच्या सैन्याने सहारा वाळवंटातील आयसीसच्या संस्थापकाला संपवलं!
कट्टर इस्लामिक संघटना ( Islamic States )आयसीसला ( ISIS) फ्रान्सच्या सैन्याने ( France ) मोठा झटका दिला आहे. सहारा वाळवंटातील संस्थापक अदनान अबु वालिद अल सहरावी ( Adnan Abou Walid al Sahraoui ) याचा फ्रान्सच्या सैन्याने खात्मा केला आहे.
पॅरिस: जगभरात दहशतवाद पसरवणाऱ्या कट्टर इस्लामिक संघटना ( Islamic States )आयसीसला ( ISIS) फ्रान्सच्या सैन्याने ( France ) मोठा झटका दिला आहे. सहारा वाळवंटातील संस्थापक अदनान अबु वालिद अल सहरावी ( Adnan Abou Walid al Sahraoui ) याचा फ्रान्सच्या सैन्याने खात्मा केला आहे. खुद्द फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रो ( Emmanuel Macron ) यांनी ही माहिती दिली. मात्र हे सैन्य ऑपरेशन कुठे झालं, आणि त्याला कसं मारण्यात आलं याबाबत त्यांनी गुप्तता पाळली. ( Adnan Abou Walid al Sahraoui, the founder of the ISIS terrorist organization, was killed by French forces. President of France Emmanuel Macron )
Adnan Abou Walid al Sahraoui, chef du groupe terroriste État islamique au Grand Sahara a été neutralisé par les forces françaises. Il s’agit d’un nouveau succès majeur dans le combat que nous menons contre les groupes terroristes au Sahel.
— Emmanuel Macron (@EmmanuelMacron) September 15, 2021
ग्रेटर सहारा प्रांतात इस्लामिक स्टेट अनेक दहशतवादी हल्ले करत असतो. यांच्या मदतीला अलकायदासोबत जोडलेले द सपोर्ट ऑफ इस्लाम अॅण्ड मुस्लीम नावाचा गटही असतो. त्यामुळेच या दहशतवादी गटांविरोधातील युद्धात हे मोठं यश असल्याचं मॅक्रो आपल्या ट्विटमध्ये म्हणाले. सहारवी हा पश्चिमी आफ्रिकेच्या सहेल भागातील इस्लामिक स्टेटचा मोठा नेता होता. त्याच्या संघटनेने 2017 मध्ये अमेरिकी सैन्यावर हल्ला केला होता. तर ऑगस्ट 2020 मध्ये याच सहारवी हे फ्रान्सच्या 6 चॅरिटी वर्कर्सच्या हत्येचे आदेश दिले होते. या हत्याकांडात फ्रान्सच्या चॅरिटी वर्कर्ससोबत नायजेरियाच्या लोकांनाही मारण्यात आलं होतं.
सहारा प्रांतातून फ्रान्सचं सैन्य कमी करणार
साहेल प्रांतात फ्रान्स आपल्या सैन्याला नवं रुप देण्याच्या तयारी असल्याचं मॅक्रो म्हणाले होते. साहेल प्रांतात फ्रान्सच्या सैन्याने इस्लामिक स्टेटविरोधात मोर्चा उघडला आहे. मात्र, आता तिथं सैन्य कमी करणार असल्याचा प्लान आहे.मॅक्रो म्हणाले की, फ्रान्सची एंटी जिहाद बरखेन फोर्स आता स्थानिक सैनिकांना प्रशिक्षण देणार आहे आणि त्यांना इस्लामिक स्टेटविरोधात उभं करणार आहे.
दहशतवादाविरोधात युद्ध सुरुच राहणार
मॅक्रो यांनी ट्विट करत म्हटलं होतं की, ‘फ्रान्स आज त्या सर्व हिरोजची आठवण काढतो, जे साहेल प्रांतातील बरखेन ऑपरेशनमध्ये शहीद झाले. मी त्यांच्या कुटुंबाविषयी आणि त्यांच्यावर झालेल्या आघातावर विचार करतो आहे. त्यांचं बलिदान बेकार जाणार नाही. आम्ही आमचे आफ्रिकी, युरोपियन आणि अमेरिकन मित्रांसोबत मिळून युद्ध सुरुच ठेऊ’
हेही वाचा: