कुठल्याही क्षणी पाकिस्तानला लढावं लागेल भीषण युद्ध, पेशावर, क्वेटामधून पाठवले सैनिक
पाकिस्तानला मोठ युद्ध लढावं लागू शकतं. पाकिस्तानने त्याची तयारी केली आहे. पाकिस्तानसाठी हे युद्ध सोपं नसेल. कारण शहबाज शरीफ सरकार आधीच आर्थिक संकट, सीपॅक प्रोजेक्टला विलंब आणि बलूचिस्तानातील फुटीरतावाद या समस्यांनी ग्रस्त आहे.
कुठल्याही क्षणी पाकिस्तानला भीषण युद्ध लढावं लागेल. पाकिस्तानने सुद्धा तयारी सुरु केली आहे. पाकिस्तानी एअरफोर्स आणि सैन्याने पेशावर-क्वेटा येथून सैनिक पाठवायला सुरुवात केली आहे. सध्या पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तणाव आहे. दोन्ही देशातील तणावाने आता विक्राळ रुप धारण केलय. पाकिस्तानने अफगाणिस्तानात घुसून एअर स्ट्राइक केला. त्यानंतर हा वाद आणखी चिघळला. तालिबानचे 15 हजार योद्धे पाकिस्तानच्या दिशेने जात आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याच्या काही तुकड्या अफगाण सीमेवर पोहोचल्या आहेत. अफगाण तालिबान मीर अली सीमेपर्यंत पोहोचलय. अजूनपर्यंत गोळीबाराचे काहीही संकेत मिळालेले नाहीत. पण तैनाती वाढवण्यात आली आहे. अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने काबुलमध्ये पाकिस्तानी दूतावासाच्या प्रभारीला हजर व्हायला सांगितलं. अफगाण परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हाफिज जिया अहमद यांनी या हल्ल्याचा निषेध केला.
अशा घटना खपवून न घेण्याचा संदेश
तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) अलीकडेच वजरिस्तानच्या मकीन भागात पाकिस्तानी सैन्याच्या 30 सैनिकांना मारलं. त्यावर पाकिस्तानने अफगाणिस्तानात एअर स्ट्राइक करुन अशा घटना खपवून घेणार नाही, असा अफगाणिस्तानचा संदेश दिला. कारण तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानला अफगाणिस्तानात आश्रय मिळाला आहे.
अशा डोंगर, गुफांमधून हल्ले करतात की….
अफगाणिस्तान तालिबानकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दुर्गम भागात लपण्याची क्षमता आहे. त्यांच्याकडे एके-47, मोर्टार, रॉकेट लॉन्चर सारख्या आधुनिक शस्त्रांच भंडार आहे. त्याशिवाय तालिबानी दहशतवादी त्या डोंगरातून, गुफांमधून हल्ले करतात, ज्याची पाकिस्तानी सैन्याला माहिती नाही.
पाकिस्तान सरकारच्या समस्या काय?
शहबाज शरीफ सरकार आधीच आर्थिक संकट, सीपॅक प्रोजेक्टला विलंब आणि बलूचिस्तानातील फुटीरतावाद या समस्यांनी ग्रस्त आहे. या मुद्यांनी सरकार आणि सैन्य दोघांना कमकुवत केलय. तालिबानसोबत संघर्षामुळे हे संकट आणखी वाढलं आहे.
पाकिस्तानकडे तशी आर्थिक क्षमताही नाही
अफगाण तालिबान बऱ्याच काळापासून हे दाखवतं आहे की, ते कुठल्याही मोठ्या सैन्य शक्तीसमोर झुकणार नाहीत. अमेरिका आणि रशिया सारख्या महाशक्तींना त्यांनी अनेक वर्ष आव्हान दिलं. अखेरीस त्यांना अफगाणिस्तान सोडून निघावं लागलं. पाकिस्तानकडे तशी आर्थिक क्षमताही नाही आणि सैन्य शक्ती सुद्धा नाही.
मोठ्या संघर्षाचे संकेत
मीर अली बॉर्डरवर वाढत्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने आपल्या सैन्याला अलर्ट मोडवर ठेवलय. सीमा भागात सैनिकांची तैनाती वाढवली आहे. स्थानिकांमध्ये भितीच वातावरण असून हे मोठ्या संघर्षाचे संकेत आहेत.