Video: काबूलच्या विमानतळावर आठवडी बाजारासारखी गर्दी, विमान पकडण्यासाठी ‘एसटी’सारखी चढाओढ, अमेरिकेचा ताबा

अमेरिकी सैन्याने अफगाणिस्तान सोडल्यानंतर काही काळातचं तालिबानने सक्रीय होतं, अफगाणिस्तानातील बहुसंख्य शहरांचा ताबा घेतला. राजधानी काबूलसह आता अनेक शहरं तालिबानच्या ताब्यात आहेत. यानंतर सध्याचे राष्ट्रपती अशरफ गनी हे मात्र स्वत:च्या अनेक कॅबिनेट मंत्र्यांना सोबत घेऊन देश सोडून पळून गेलेत.

Video: काबूलच्या विमानतळावर आठवडी बाजारासारखी गर्दी, विमान पकडण्यासाठी 'एसटी'सारखी चढाओढ, अमेरिकेचा ताबा
अफगाणिस्तानात विमानतळावर प्रचंड गर्दी
Follow us
| Updated on: Aug 16, 2021 | 1:09 PM

काबूल: अमेरिकेनं त्यांचं सैन्य आणि नाटोच्या सैन्यानं अफगाणिस्तानमधून काढता पाय घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा मिळवला आहे. तालिबानानं रविवारी जलालाबाद आणि काबूल शहरावर ताबा मिळवला. दरम्यानच्या काळात राष्ट्रपती अशरफ गनी त्यांच्या मंत्रिमंडळासह तझाकिस्तानला पळून गेले आहेत. तालिबानाच्या सत्तेत राहण्याची मानसिकता नसलेले नागरिक मिळेल त्या मार्गानं देश सोडताना दिसत आहेत. विमानतळांवर अफगाण नागरिकांची प्रचंड गर्दी झाल्याचं समोर येणाऱ्या दृश्यांमध्ये दिसत आहे. अफगाणिस्तानच्या नागरिकांची धडपड व्हिडीओमधून स्पष्ट दिसतेय.

अफगाणिस्तानातील विमानतळावरील दृश्य

अमेरिकी सैन्याने अफगाणिस्तान सोडल्यानंतर काही काळातचं तालिबानने सक्रीय होतं, अफगाणिस्तानातील बहुसंख्य शहरांचा ताबा घेतला. राजधानी काबूलसह आता अनेक शहरं तालिबानच्या ताब्यात आहेत. यानंतर सध्याचे राष्ट्रपती अशरफ गनी हे मात्र स्वत:च्या अनेक कॅबिनेट मंत्र्यांना सोबत घेऊन देश सोडून पळून गेलेत. ते तझाकिस्तानला पोहोचलेत. अशरफ गनी यांनी विश्वासघात केल्याची भावना अफगाण लोक व्यक्त करतायत. तर, अनेक नागरिक तालिबानच्या जुलमी राजवटीत राहण्यापेक्षा देश सोडण्याचा विचार करत आहेत. काबूलमधून बाहेर जाणाऱ्या विमानांमध्ये बसण्यासाठी नागरिकांची झुंबंड उडाली आहे.

बसमध्ये बसायला जशा रांगा लागतात तशी प्रचंड गर्दी

तालिबान्यांच्या अफगाणिस्तानात राहायचे नाही एवढाच निर्धार

तालिबानच्या प्रवक्त्यांनी देशातील नागरिकांना देश सोडू नये. त्यांच्या जीवाला, संपत्तीला हानी पोहोचवली जाणार नाही असं आवाहन केलंय. मात्र, तालिबानच्या जुन्या राजवटीचा अनुभव असल्यानं नागरिक देश सोडत आहेत. तालिबान्यांच्या अफगाणिस्तानात राहायचे नाहीत एवढाच निर्धार या नागरिकांनी केल्याचं दिसतेयं.

विमानतळावर अमेरिकन लष्कराकडून हवेत गोळीबार

तालिबानच्या ताब्यात अफगाणिस्तान गेल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण तयार झालंय. जो तो देश सोडण्यासाठी प्रयत्न करतोय. विमानतळावरील अफगाण नागिराकांची प्रचंड गर्दी झाल्यानं अमेरिकन लष्करानं हवेत गोळीबार केल्याचं समोर आलंय.

अफगाणिस्तानचा नवा राष्ट्रपती कोण?

अखेर तालिबाननं जवळपास 20 वर्षानंतर अफगाणिस्तानच्या सत्तेवर पूर्णपणे ताबा मिळवलाय. तालिबान्यांनी राजधानी काबूलमध्ये प्रवेश करत राष्ट्रपती भवनही ताब्यात घेतलंय. मुल्ला अब्दूल गनी बरादरचं नाव आता नवा राष्ट्रपती म्हणून जवळपास निश्चित मानलं जातंय. फक्त औपचारीक घोषणा बाकी असल्याचं आंतरराष्ट्रीय न्यूज संस्थांनी वृत्त दिलंय

अशरफ गनीवर अफगाण जनता नाराज

सध्याचे राष्ट्रपती अशरफ गनी हे ताजिकिस्तानला पळून गेलेत. अमेरीकेनं त्यांची तशी सोय केल्याचे रिपोर्ट आहेत. विशेष म्हणजे कालपर्यंत अशरफ गनी हे तालिबानचा पाडाव करण्याचं जनतेला टीव्हीवर आश्वासन देत होते. पण टीव्हीवर दाखवलेली त्यांची टेप ही आधीच रेकॉर्ड केली असल्याचं आता उघड झालंय. अफगाण जनतेला अशरफ गनी यांनी पळून जाणं फार रुचलेलं नाही. गनी यांनी अफगाण जनतेचा विश्वासघात केला आणि इतिहास त्यांना कधीही माफ करणार नाही अशा प्रतिक्रिया अफगाण जनता व्यक्त करतीय. फक्त राष्ट्रपतीच नाही तर अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपतीही देश सोडून निघून गेलेत.

इतर बातम्या:

Taliban Income: तालिबानची वार्षिक कमाई 1, 11, 32, 55, 00, 000 रुपयांपेक्षा जास्त, कोण हत्यार पुरवतं, पैसा कसा मिळवला जातो, संपूर्ण माहिती

कोण आहे मुल्ला बरादर ज्याचं अफगाण राष्ट्रपती म्हणून नाव घेतलं जातंय? आताचा राष्ट्रपती नेमका कुठे पळाला?

Afghanistan Crisis citizens rushed to airport for left country after Taliban taking power some video viral on social media

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.