आता तालिबानी अतिरेक्यांवरच हल्ला, जलालाबादमध्ये 3 साखळी बॉम्बस्फोट, ISISने हल्ला केल्याचा संशय

पाठोपाठ एक 3 स्फोट घडवण्यात आले. ज्यामध्ये 3 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 20 लोक जखमी झाले आहेत. जलालाबादच्या या स्फोटांची जबाबदारी अद्याप कुणीही स्वीकारलेली नाही.

आता तालिबानी अतिरेक्यांवरच हल्ला, जलालाबादमध्ये 3 साखळी बॉम्बस्फोट, ISISने हल्ला केल्याचा संशय
अफगाणिस्तानमध्ये बॉम्बहल्ला करुन तालिबानला निशाणा बनवण्यात आलं
Follow us
| Updated on: Sep 18, 2021 | 4:08 PM

काबुल: अफगाणिस्तानात तालिबानचं सरकार आल्यानंतर हिंसाचार थांबलेला नाही. आता अफगाणिस्तानच्या पू्र्वेला असलेल्या नंगरहार प्रांतात तालिबान्यांच्या वाहनांना निशाणा बनवण्यात आलं आहे. जलालाबादमध्ये ही घटना घडली आहे. इथं एका पाठोपाठ एक 3 स्फोट घडवण्यात आले. ज्यामध्ये 3 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 20 लोक जखमी झाले आहेत. जलालाबादच्या या स्फोटांची जबाबदारी अद्याप कुणीही स्वीकारलेली नाही. मात्र पूर्वी अफगाणिस्तानचा हा भाग इस्लामिक स्टेटला बालेकिल्ला मानला जातो, त्यातच इस्लामिक स्टेट तालिबानला शत्रू मानतो, त्यामुळे त्यांनीच हा हल्ला घडवून आणला असू शकतो. ( Afghanistan- 3 chain bomb blast in Taliban vehicles in Jalalabad, 3 killed, 20 injured, ISIS )

काबुलमध्येही बॉम्बहल्ला, 2 जण जखमी

अजून हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही की, या हल्ल्यात तालिबानी अधिकारी मारले गेले की सामान्य लोक. तिकडे काबुलमध्येही एका बॉम्ब हल्ल्यात 2 जण जखमी झाले. अद्याप हे कळू शकलेलं नाही की, कुणाला टार्गेट करण्यासाठी हा हल्ला करण्यात आला होता. आयईडी प्रकारच्या विस्फोटकांचा या हल्ल्यात वापर करण्यात आला होता. या हल्ल्यात एक कार पूर्णपणे बेचिराख झाली तर बाजूच्या दुकानांचंही नुकसान झालं.

अपहरण केल्याच्या नावाखाली 2 लोकांची हत्या

तिकडे काबूलमध्ये पूर्वीच्याच तालिबानचं राज्य जाणवायला सुरुवात झाली आहे. कारण, नवीन तालिबान म्हणून सत्तेत आलेल्या तालिबानच्या राज्यात महिलांचे सगळे अधिकार तर गेलेच आहेत. शिवाय, शिक्षा देण्याचं नवं सत्रही सुरु झालं आहे. काबुलमध्ये दिवसा ढवळ्या 2 लोकांना मारुन चौकात फेकण्यात आलं. बीबीसीने ही माहिती दिली आहे. त्यांनी लहान मुलांचं अपहरण केलं असा आरोप करण्यात आला होता. आणि या आरोपानंतर त्यांना चौकात मारुन फेकण्यात आलं. या 2 व्यक्तींनी कुणी मारलं हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, मारणाऱ्यांने एक नोट लिहून हे 2 मृतदेह चौकात फेकून दिले होते.

तो ड्रोनहल्ला आमची चूक होती- अमेरिका

काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेरच्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात एक ड्रोन हल्ला केला होता. हा हल्ला ISIS खुरासान संघटनेच्या दहशतवाद्यावरच केला असल्याचं आधी अमेरिकेने सांगितलं. मात्र, आता अमेरिकेने आपली चूक कबूल केली आहे. या हल्ल्यात 7 लहान मुलांसह 10 जण मारले गेले होते. आता अमेरिकी सुरक्षा विभागाच्या पेंगागन कार्यालयातील मध्य कोअरचे कमांडर जनरल फ्रॅंक मॅक्केजी समोर आले. आणि त्यांनी हा हल्ला चुकीच्या टार्गेटवर झाल्याचं मान्य केलं. शिवाय हल्ल्याबद्दल माफी मागत असतानाच हल्ल्यात मृत झालेल्या लोकांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा:

महिला स्वातंत्र्याच्या गप्पा मारणाऱ्या पाकिस्तानी मीडियाचा बुरखा फाटला, तालिबान्यांच्या समर्थनार्थ महिला अँकरने लाईव्ह शोमध्येच हिजाब घातला!

वाढती कट्टरता जगासाठी नवं आव्हान, अफगाणिस्तान ताजं उदाहरण, SCO संमेलनात मोदींचं रोखठोक भाषण

 

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.