Afghanistan Mosque Blast: अफगाणिस्तानात पुन्हा मशिदीत बॉम्बहल्ला, कंदहार मशिद स्फोटात 16 लोकांचा मृत्यू, तर 32 जखमी

या मशिदीला बीबी फातिमा मस्जिद (Bibi Fatima Mosque Attack) आणि इमाम बरगाह म्हणून ओळखले जाते. शुक्रवारी नमाज पढताना बॉम्बस्फोट झाला.

Afghanistan Mosque Blast: अफगाणिस्तानात पुन्हा मशिदीत बॉम्बहल्ला, कंदहार मशिद स्फोटात 16 लोकांचा मृत्यू, तर 32 जखमी
अफगाणिस्तानच्या कंदहारमध्ये मशिदीत बॉम्बहल्ला (फोटो- ट्वीटर)
Follow us
| Updated on: Oct 15, 2021 | 6:12 PM

कंदहार: अफगाणिस्तानच्या कंधार शहरात गुरुवारी मोठा हल्ला झाला. हा हल्ला कंधारच्या सर्वात मोठ्या (Attack on Mosque in Afghanistan) मशिदीवर झाला. मशिदीत झालेल्या बॉम्बस्फोटात आतापर्यंत 16 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 32 लोक जखमी झाले आहेत. स्थानिक टोलो न्यूजने सूत्रांच्या हवाल्याने या प्रकरणाची माहिती दिली आहे. या मशिदीला बीबी फातिमा मस्जिद (Bibi Fatima Mosque Attack) आणि इमाम बरगाह म्हणून ओळखले जाते. शुक्रवारी नमाज पढताना बॉम्बस्फोट झाला. (Afghanistan bomb blast kandahar fatemeh imam bargah mosque many people killed injured)

स्थानिक माध्यमांनुसार, साक्षीदारांचे म्हणणे आहे की मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अधिकृतपणे मृतांची संख्या अद्याप दिलेली नाही. याशिवाय कोणत्याही संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. बॉम्बस्फोटामागील कारण अद्याप समजू शकले नाही, हा आत्मघातकी हल्ला असल्याचे मानले जात आहे. 13 ऑगस्ट रोजी तालिबानने अफगाणिस्तानचे दुसरे मोठे शहर कंधार ताब्यात घेतलं होतं.

ISIS-K चा हात असण्याची शक्यता

या हल्ल्यामागे इस्लामिक स्टेट-खोरासन म्हणजेच इसिस-के जबाबदार असल्याचे मानले जात आहे. इस्लामिक स्टेट या जागतिक दहशतवादी संघटनेची ही अफगाणिस्तान शाखा आहे. जे देशातील अल्पसंख्याक शिया मुस्लिमांना सतत लक्ष्य करत आहे. याआधी शुक्रवारच्या नमाजावेळी उत्तरेकडील कुंदूर शहरातील (Kunduz Mosque Attack) मशिदीमध्ये बॉम्ब हल्ला झाला होता. ज्यात कमीतकमी 50 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. इस्लामिक स्टेटने याची जबाबदारी घेतली आहे. ऑगस्टमध्ये अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यानंतर हा सर्वात मोठा हल्ला होता.

आधी काबूलच्या मशीदवरही हल्ला

सुमारे दोन आठवड्यांपूर्वी कुंदुज आणि कंधारच्या मशिदींवर हल्ला करण्यापूर्वी काबूलमधील मशिदीलाही (Attack on Kabul Mosque) लक्ष्य करण्यात आलं होतं. मशिदीच्या गेटवर बॉम्बस्फोट झाला. ज्यात किमान पाच लोकांचा मृत्यू झाला. तालिबानचा कट्टर शत्रू असलेल्या या हल्ल्यामागे खुद्द इस्लामिक स्टेटलाच दोष दिला जात आहे. काबूलमधील या मशिदीवर हल्ला झाला तेव्हा तालिबानचे प्रवक्ते झबीहुल्ला मुजाहिद यांच्या आईच्या शोकसभेसाठी मोठ्या संख्येने लोक येथे जमले होते.

हेही वाचा:

बांग्लादेशात दुर्गा पूजा उत्सवावर समाजकंटकांचे हल्ले, पंतप्रधान शेख हसीनांचा भारताला इशारा

Myanmar: बंडखोरांसोबतच्या चकमकीत म्यानमारचे 30 सैनिक ठार, पिपल्स डेमोक्रॅटिक फोर्सकडून म्यानमान सैन्याचं मोठं नुकसान

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.