Taliban new cabinet : अमेरिकेच्या जेलमध्ये 6 वर्ष काढली, खतरनाक दहशतवादी आता तालिबानच्या संरक्षण मंत्रिपदी!

Taliban new cabinet : अफगाणिस्तानवर (Afghanistan) ताबा मिळवल्यानंतर तालिबानने (Taliban) आता सरकार बनवण्याची जोरदार तयारी केली आहे. मंत्र्यांची नावं फायनल केली जात आहेत. काही अंतरिम मंत्रिपदंही दिली जात आहेत.

Taliban new cabinet : अमेरिकेच्या जेलमध्ये 6 वर्ष काढली, खतरनाक दहशतवादी आता तालिबानच्या संरक्षण मंत्रिपदी!
TALIBAN ATTACK ON AFGHANISTAN 2
Follow us
| Updated on: Aug 26, 2021 | 11:38 AM

काबूल : अफगाणिस्तानवर (Afghanistan) ताबा मिळवल्यानंतर तालिबानने (Taliban) आता सरकार बनवण्याची जोरदार तयारी केली आहे. मंत्र्यांची नावं फायनल केली जात आहेत. काही अंतरिम मंत्रिपदंही दिली जात आहेत. अल जजीरा चॅनलने दिलेल्या माहितीनुसार, तालिबानने जगातील सर्वात खतरनाक जेलमधील कैद्याला थेट संरक्षण मंत्री (Defense Minister ) बनवलं आहे. मुल्ला अब्दुल कय्यूम झाकीर (Mullah Abdul Qayyum Zakir) असं त्याचं नाव आहे.

मुल्ला अब्दुल कय्यूम झाकीर हा तालिबानचा अनुभवी कमांडर मानला जातो. तो तालिबानचा संस्थापक मुल्ला उमरचा जवळचा मानला जातो. अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, अमेरिकन सैन्याने 2001 मध्ये त्याला पकडलं होतं. त्याला 2007 पर्यंत ग्वांटानामो बे इथल्या जेलमध्ये डांबण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला सोडून अफगाणिस्तान सरकारच्या ताब्यात देण्यात आलं होतं.

अत्यंत धोकादायक दहशतवाद्यांपैकी एक

मुल्ला अब्दुलहा अत्यंत धोकादायक दहशतवाद्यांपैकी एक समजला जातो. त्यामुळेच अमेरिकेच्या सर्वात सुरक्षित, कडक पहारा असलेल्या जेलमध्ये त्याला ठेवण्यात आलं होतं. ग्वांटानामो खाडीत अमेरिकी सैन्याचं एक अत्यंत सुरक्षित-हाय सिक्युरिटी असणारं जेल आहे. क्युबा इथं हे जेल आहे. या जेलमध्ये जगातील सर्वात खतरनाक आणि हायप्रोफाईल दहशतवाद्यांना ठेवलं जातं.

कोणाला कोणती पदं?

तालिबानने अफगाणिस्तानात अजून औपाचारिकपणे सरकार बनवलेलं नाही. मात्र देशाचा कारभार चालवण्यासाठी आपल्या संघटनेच्या काही नेत्यांना प्रमुख पदं दिली आहेत. यामध्ये हाजी मोहम्मद इदरीसचाही समावेश आहे. इदरीसला अफगाणिस्तानची केंद्रीय बँक द अफगाणिस्तान बँकेचा (DBA) कार्यकारी प्रमुख नियुक्त केलं आहे.

अफगाण न्यूजच्या मते, तालिबानच्या मंत्रिमंडळात सखउल्लाहला शिक्षण मंत्रिपद, अब्दुल बाकी उच्च शिक्षण मंत्री, सदर इब्राहिम गृहमंत्री, गुल आगा अर्थमंत्री, मुल्ला शिरीन काबूलचा गव्हर्नर, हमदुल्ला नोमानी काबूलचा महापौर आणि नजीबुल्लाहला गुप्तचर यंत्रणेचा प्रमुख बनवण्यात आलं आहे.

यापूर्वी तालिबानने आपला प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिदला (Zabihullah Mujahid) माहिती आणि संस्कृती मंत्री बनवलं होतं. मुजाहिद तोच आहे ज्याने तालिबानचं सरकार कसं असेल हे मीडियाला सांगितलं होतं.

संबंधित बातम्या 

Afghanistan Crisis : अमेरिकेने आतापर्यंत 88 हजार लोकांना काबुलमधून बाहेर काढलं, 31 ऑगस्टपर्यंतचा प्लॅन काय?    

Afghanistan Crisis : ‘तालिबानच्या प्रत्येक कृतीवर अमेरिकेची करडी नजर’, 31 ऑगस्टपर्यंत अफणगाणिस्तानातून अमेरिकेची पूर्णपणे माघार    

आधी वाऱ्यावर सोडलं आता तालिबानसोबत अमेरीकेची पडद्याआड चर्चा, टॉपचा अधिकारी काबूलमध्ये

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.