3 हजार रुपयात एक बॉटल पाणी, साडे 7 हजार रुपयांना एक ताट जेवण, काबुल विमानतळावर नेमकं चाललंय काय?

काबुल विमानतळावर सर्वसामान्य नागरिकांचं जगणं अशक्य झालंय. या ठिकाणी एक बॉटल पाण्यासाठी 3,000 रुपये मोजावे लागत आहेत, तर एक ताट जेवणासाठी तब्बल 7,500 रुपये द्यावे लागत आहेत.

3 हजार रुपयात एक बॉटल पाणी, साडे 7 हजार रुपयांना एक ताट जेवण, काबुल विमानतळावर नेमकं चाललंय काय?
kabul airport
Follow us
| Updated on: Aug 27, 2021 | 11:55 PM

Kabul Airport, Taliban Crisis काबुल : अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर तेथील परिस्थिती बिकट झालीय. विशेषतः अफगाणमधून बाहेर पडण्यासाठी अमेरिकन सैन्याच्या नियंत्रणात असलेल्या काबुल विमानतळाचा उपयोग होत आहे. त्यामुळे अफगाणिस्तानमधून बाहेर पडणाऱ्यांची तिथं प्रचंड गर्दी होतेय. त्यात तालिबान्यांकडून या परिसरातही नागरिकांवर अत्याचार सुरू आहे. याच सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून काबुल विमानतळावर सर्वसामान्य नागरिकांचं जगणं अशक्य झालंय. या ठिकाणी एक बॉटल पाण्यासाठी 3,000 रुपये मोजावे लागत आहेत, तर एक ताट जेवणासाठी तब्बल 7,500 रुपये द्यावे लागत आहेत. या किमती सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर गेल्यानंच अनेकांवर उपासमारीची वेळ आलीय.

पाणी आणि खाद्य पदार्थांची मागणीसोबत किंमत वाढली

काबुल विमानतळाच्या परिसरात अनेक लोक आपला जीव वाचवत सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी संघर्ष करत आहेत. त्यामुळे या भागात प्रचंड गर्दी होतेय. त्यामुळे या भागात पाणी आणि खाद्य पदार्थांची मागण वाढलीय. याचाच फायदा घेत वस्तूंचा तुटवडा होतोय. मात्र, सत्ता काबिज केलेल्या तालिबान्यांकडून या भागातील नागरी व्यवस्थांकडे काहीही लक्ष देण्यात आलेलं नाही. उलट तालिबान्यांकडून नागरिकांवर अत्याचारच सुरू आहेत.

वस्तू खरेदी करणं अनेकांच्या आवाक्या बाहेर

अशा परिस्थितीतच काबुल विमानतळावर एका पाणी बॉटलसाठी 3 हजार रुपये आणि एक ताट जेवणासाठी साडेसात हजार रुपये द्यावे लागत आहे. ही महागाई इतकी आहे की या दराने वस्तू खरेदी करणं अनेकांच्या आवाक्या बाहेर आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी पाणी किंवा जेवणाचे पैसे डॉलरमध्ये द्यावे लागत आहे. पाणी बॉटलची किंमत 40 डॉलर झालीय, तर एक प्लेट भाताची किंमत 100 डॉलर झालीय.

एकूणच काबुल विमानतळावर गोंधळ माजलाय. अनेक लोक पाणी आणि अन्नाविना चक्कर येऊन पडत आहेत. वाईट म्हणजे तालिबान्यांकडून या परिस्थितीत कोणतीही मदत मिळत नाहीये. उलट अनेक ठिकाणी तालिबानी सामान्य नागरिकांवर अत्याचार करत आहेत. दुसरीकडे परदेशी नाटो सैन्य या नागरिकांना मदत करत आहे.

हेही वाचा : 

Kabul Airport Attack: ‘बदला घेणार, हल्ल्याचं ठिकाण आणि वेळ आमचंच असणार’, जो बायडन यांचं आयसीसला आव्हान

Kabul Airport Attack: काबुल विमानतळ हल्ल्यात 13 अमेरिकन सैनिकांसह 72 जणांचा मृत्यू

लादेन 9/11च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड नाहीच, ते तर अफगाणिस्तानविरुद्धच्या युद्धाचे निमित्त, तालिबानचा अमेरिकेला इशारा

व्हिडीओ पाहा ;

High prices in Kabul airport 3000 Rs for 1 water bottle and 7500 rs for one plate food

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.