अफगाणिस्तान- तालिबान युद्धात कोणता मुस्लीम देश कुणाच्या बाजूने?

तालिबानच्या सत्तेला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळणार की नाही हाच मोठा प्रश्न आहे. मुस्लीम देशांमध्ये अफगाणिस्तानमधील तालिबान सत्तेला मान्यता देण्याबाबत काय वातावरण आहे, कोणता देश कुणाच्या बाजूने आहे याचाच खास आढावा.

अफगाणिस्तान- तालिबान युद्धात कोणता मुस्लीम देश कुणाच्या बाजूने?
TALIBAN ATTACK ON AFGHANISTAN 2
Follow us
| Updated on: Sep 02, 2021 | 8:00 PM

काबूल : अफगाणिस्तानमध्ये तालिबानने थेट राजधानीपर्यंत मजल मारत काबुलवर नियंत्रण प्रस्थापित केलंय. यासह अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ गनी यांनी पलायन करत देश सोडलाय. त्यामुळे तालिबानने एकहाती सत्ता स्थापन करण्यापर्यंत मजल मारलीय. मात्र, आता तालिबानच्या सत्तेला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळणार की नाही हाच मोठा प्रश्न आहे. अमेरिकेने शस्त्रास्त्रांच्या बळावर मिळवलेल्या सत्तेला मान्यता देण्यास नकार दिलाय. ब्रिटनने मात्र आपले पत्ते उघडलेले नाहीत. दुसरीकडे मुस्लीम देशांमध्ये अफगाणिस्तानमधील तालिबान सत्तेला मान्यता देण्याबाबत काय वातावरण आहे, कोणता देश कुणाच्या बाजूने आहे याचाच खास आढावा.

इराण

ऐतिहासिक घटनांकडे पाहिलं तर शिया बहुसंख्य असलेल्या इराणचं सुन्नी कट्टरतवादी तालिबानशी फारसं पटलेलं नाही. अफगाणिस्तानमधील परिस्थितीत इराणचीही डोकेदुखी वाढवणारी आहे. कारण अफगाणमधील परिस्थिती बिघडली की शेजारी राष्ट्र इराणमध्ये निर्वासितांचे लोंढे येतात. 1998 मध्ये तालिबानने इराणच्या 7 दुतावासातील अधिकाऱ्यांसह एका पत्रकाराची हत्या केली होती. तेव्हापासून इराण आणि तालिबानमधील संबंध कडवट झाले होते. मात्र, यावेळी मागील महिन्यापासूनच तालिबानने इराणसोबत संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले. इराणने देखील आपल्या दुतावासीतल अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचं आश्वासन तालिबानकडून घेतलंय.

सौदी अरब

मुस्लीम राष्ट्रांपैकी सर्वात शक्तीशाली देश असलेल्या वहाबी विचारसरणीच्या सौदी अरबने अद्याप तालिबानवर थेट आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. सौदीने यावर मौन बाळगत आतापर्यंत मित्रदेश पाकिस्तानमार्फतच या विषयावर हस्तक्षेप केलाय. असं असलं तरी 1980 मध्ये सौदीने सोव्हिएत युनियनच्या विरोधात अफगाण मुजाहिदीनची खुलेआम मदत केली होती.

कतर

कतर देश तालिबानची खरी आणि सर्वज्ञात ताकद आहे. कतरमध्येच तालिबानचं राजकीय मुख्यालय आहे. कतरनेच तालिबानला जगाशी संपर्क करण्यासाठी पहिल्यांदा जागा दिली. कतरच्या मदतीनेच तालिबान अफगाण आणि अमेरिकेशी चर्चा करत आलाय. कतरच्या मदतीशिवाय तालिबानचा आंतरराष्ट्रीय प्रभाव खूप कमी होईल.

तुर्की

तुर्कीचे राष्ट्रपती तैयप एर्दोगन सध्या सर्व मुस्लीम राष्ट्रांचे नेते बनण्याच्या तयारीत आहेत. एर्दोगन सुन्नी आहेत आणि तालिबान देखील सुन्नी विचार मानते. मात्र, काबुल विमानतळावर तुर्की सैन्य तैनात केल्यानं तालिबान्यांनी तुर्कीला परिणाम भोगण्याचा इशारा दिलाय. तुर्की मित्रदेश पाकिस्तानमार्फत तालिबानच्या संपर्तकात आहे. तसेच लवकरच तुर्की तालिबानसोबत बैठक करेल त्यामुळे तुर्की तालिबानसोबत चर्चेचे प्रयत्न करत असल्याचं स्पष्ट आहे.

पाकिस्तान

पाकिस्तान तालिबानला मदत करत असल्याचा आरोप अफगाणिस्तानच्या सरकारने वारंवार केलाय. आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील पाकिस्तान सरकारसह सैन्य आणि आयएसआयचे तालिबानशी जवळचे संबंध असल्याचे आरोप होत आलेत. विशेष म्हणजे तालिबानशी जवळचे संबंध असल्यानंच पाकिस्तान आजपर्यंत अमेरिकेशी आपले हितसंबंध जोपासत आलंय.

हेही वाचा :

3 लाख अफगाण सैन्य असतानाही, 60 हजार तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा कसा मिळवला? वाचा काय आहेत मुख्य कारणं

अफगाणिस्तानच्या घडामोडींमध्ये नवं ट्विस्ट, आता मीच काळजीवाहू राष्ट्रपती, उपराष्ट्रपती सालेहकडून घोषणा

Taliban Crisis : काबूलमधील परिस्थितीनंतर भारताने सुरू केला ई-आणीबाणी एक्स-मिस्क व्हिसा, जाणून घ्या याबाबत

व्हिडीओ पाहा :

Know which country supporting Taliban in Afghanistan and who is against

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.