Afghanistan : NRF ने पंजशीरमध्ये पाकिस्तानचं फायटर जेट पाडलं, अहमद मसूदचा दावा

अफगाणिस्तानमधील पंजशीर प्रांतात नॅशनल रजिस्टंट फ्रंट (NRF) तालिबानला कडवी झूंज देतेय. तालिबानसोबतच्या युद्धात एनआरएफने पाकिस्तानचं फायटर जेट विमान पाडल्याचा दावा एनआरएफचे नेते अहमद मसूद (Ahmad Massoud) यांनी केलाय.

Afghanistan : NRF ने पंजशीरमध्ये पाकिस्तानचं फायटर जेट पाडलं, अहमद मसूदचा दावा
Follow us
| Updated on: Sep 07, 2021 | 10:26 AM

Pakistani Jet Shot Down in Panjshir by NRF काबुल : अफगाणिस्तानमधील पंजशीर प्रांतात नॅशनल रजिस्टंट फ्रंट (NRF) तालिबानला कडवी झूंज देतेय. तालिबानसोबतच्या युद्धात एनआरएफने पाकिस्तानचं फायटर जेट विमान पाडल्याचा दावा एनआरएफचे नेते अहमद मसूद (Ahmad Massoud) यांनी केलाय. त्यांनी एक ट्वीट करत म्हटलं, “पाकिस्तानचं जेट प्लेन पंजशीरमध्ये पाडण्यात आलंय. रेजिस्टंस पंजशीर.” या ट्विटसोबत मसूद यांनी या फायटर जेट प्लेनचा फोटोही जोडला आहे. फोटोत हे विमान जमिनीवर पडलेलं दिसत आहे. याआधी पाकिस्तानने पंजशीरमध्ये ड्रोनने हल्ला केल्याचं वृत्त होतं.

तालिबानने पंजशीर प्रांत सोडला तर संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. मात्र, पंजशीरमधील स्थानिकांनी नागरिकांना प्रक्षिक्षण देत सैन्य उभं केलंय. हे स्थानिक सैन्य तालिबानला कडवी झुंज देतंय. तालिबानकडून वारंवार पंजशीरवर हल्ले चढवून पंजशीरचा ताबा घेण्याचा प्रयत्न होतोय. पाकिस्तानने तालिबानला मदत करत पंजशीरवर ड्रोन्स हल्ले केल्याचाही आरोप झाला होता. मात्र, आता एनआरएफने थेट फायटर विमान पाडल्याचाच फोटो पोस्ट करुन आपल्या दाव्याला बळ दिलंय.

आयएसआयच्या अधिकाऱ्यांकडून वारंवार तालिबानी नेत्यांच्या भेटीगाठी

स्थानिक वृत्तपत्रांनुसार पंजशीरवरील हे ड्रोन हल्ले रविवारी (5 सप्टेंबर) झाले होते. रजिस्टंस फ्रंटच्या नेत्यांच्या हवाल्यानं दिलेलं हे वृत्त तालिबानने मात्र फेटाळलं आहे (Pakistan Helps Taliban). मात्र, मागील काही दिवसांपासून पाकिस्तान गुप्तहेर संघटना आयएसआयचे अधिकारी तालिबान नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यावरुनच पाकिस्तान तालिबानची मदत करत असल्याचा आरोप होतोय.

अहमद मसूद यांनी पाकिस्तानला लाथाडलं

अहमद मसूद यांनी फेसबूकवर एक ऑडिओ क्लिप जारी करत तालिबानचे दावे खोटे असल्याचं म्हटलंय. तसेच अफगाणिस्तानमध्ये हस्तक्षेप केल्यावरुन पाकिस्तानला लाथाडलं आहे. ते म्हणाले, “माझ्या कुटुंबातील सदस्यांना आणि सहकारी फहीम दश्ती यांना मारण्यासाठी पाकिस्तानने तालिबानला मदत केलीय. पाकिस्तानसोबत तालिबान संगनमत करत असल्याचं समजूनही संपूर्ण देश गप्प आहे (Pakistan Taliban). पाकिस्तान थेटपणे पंजशीरमध्ये अफगाणी नागरिकांवर हल्ला करत आहे. असं असताना आंतरराष्ट्रीय समूह शांतपणे हे पाहत आहे. तालिबान पाकिस्तानच्या मदतीने हल्ला करत आहे.”

हेही वाचा :

अखेरचा किल्लाही ढासळला, पंजशीरवर अखेर तालिबान्यांचा कब्जा; संपूर्ण अफगाण तालिबानमय

जावेद अख्तर म्हणाले, आरएसएस, व्हीएचपी आणि बजरंग दल तालिबानसारखेच, भाजपकडून माफीची मागणी

Afghanistan: काश्मीरवर तालिबान-हक्कानी नेटवर्कमध्ये मतभेद, तालिबानला सरकार स्थापनेला उशीर का?

व्हिडीओ पाहा :

NRF claim targeting of Pakistan fighter jet plane in Panjshir Afghanistan

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.