9/11 हल्ल्याला 20 वर्षे, मुहूर्त साधत तालिबान नव्या मंत्र्यांना शपथ देणार, मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांना महत्वाची मंत्रिपदं

तालिबानने (Taliban) अफगानिस्तानात (Afghanistan) अंतिम सरकार बनवण्याची घोषणा केल्यानंतर, आता या नव्या मंत्र्यांचा शपथविधी होत आहे. तालिबानने अफगाणिस्तानचं नाव बदलून ‘इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान’ असं केलं आहे.

9/11 हल्ल्याला 20 वर्षे, मुहूर्त साधत तालिबान नव्या मंत्र्यांना शपथ देणार, मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांना महत्वाची मंत्रिपदं
Taliban Leaders
Follow us
| Updated on: Sep 11, 2021 | 12:25 PM

काबूल : तालिबानने (Taliban) अफगानिस्तानात (Afghanistan) अंतिम सरकार बनवण्याची घोषणा केल्यानंतर, आता या नव्या मंत्र्यांचा शपथविधी होत आहे. तालिबानने अफगाणिस्तानचं नाव बदलून ‘इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान’ असं केलं आहे. आता अमेरिकेवरील 9/11 च्या हल्ल्याला 20 वर्ष पूर्ण झाल्याच्या मुहूर्तावर तालिबानने आजच शपथविधीचं नियोजन केलं आहे.

तालिबानच्या नव्या मंत्रिमंडळात अनेक खतरनाक दहशवाद्यांचा समावेश आहे. ज्यांच्यावर गेल्या दोन दशकात अमेरिकन सैन्यावर (US Army) हल्ला केल्याचा आरोप आहे, त्यांच्याही मंत्रिमंडळात समावेश आहे.

नव्या सरकारचं नेतृत्त्व मुल्ला मोहम्मद हसन अखुंद (Mullah Mohammad Hassan Akhund) याच्याकडे आहे. अखुंद हा तालिबानच्या संस्थापकांपैकी एक आहे. शिवाय हा यूएनच्या ब्लॅकलिस्टमध्ये समावेश आहे.

नवा गृहमंत्री

अफगाणिस्तानचा नवा गृहमंत्री म्हणून हक्कानी नेटवर्कचा (Haqqani Network) नेता सिराजुद्दीन हक्कानी (Sirajuddin Haqqani) पदभार स्वीकारणार आहे. तो अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा एफबीआई (FBI) च्या वॉण्टेड लिस्टमध्ये आहे.

आम्हाला सर्वांशी चांगले संबंध हवे

तालिबानचा नेता मौलवी हिबतुल्लाह अखुंदजादाने (Mawlawi Hibatullah Akhundzada) आधीच सांगितल्याप्रमाणे, हे सरकार शरिया कायद्यानुसार चालेल. इतकंच नाही तर आम्हाला शेजारी राष्ट्र्रांशी चांगले संबंध हवे आहेत. आंतरराष्ट्रीय कायद्याचा आम्ही सन्मान करु, असंही त्यांनी म्हटलं आहे. आम्ही इस्लामी कायदे आणि देशाच्या राष्ट्रीय मूल्यांच्याविरोधात नाही, असं अखुंदजादाने म्हटलं आहे.

संबंधित बातम्या   

लॅपटॉपच्या बाजूला AK-47, तालिबान सरकारनं निवडलेल्या रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरचं शिक्षण नेमकं किती?

तालिबान आणि NRF मध्ये लढाई तेज, अमरुल्ला सालेहचा भाऊ ठार, अहमद मसूदचे हत्यारही तालिबान्यांच्या हाती

काबूलमधून 16000 हजार ब्रिटीश-भारतीय सैनिकांनी माघार घेतली, पण निर्धारीत ठिकाणी फक्त एकच जिवंत पोहोचला, इतरांचं काय झालं? वाचा सविस्तर

पंतप्रधान जागतिक दहशतवादी तर गृहमंत्र्याच्या डोक्यावर 5 मिलियन डॉलरचं बक्षिस, वाचा अफगाणिस्तानचे टॉप 6 मंत्री

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.