काबुल : अफगाणिस्तानवर कट्टरतावादी तालिबानने नियंत्रण मिळवल्यानंतर आता जागतिक दहशतवादी संघटना अल-कायदाने (Al Qaeda) जल्लोष केलाय. तसेच मुस्लीम समुदायाला इतर मुस्लीम क्षेत्रही मुक्त करण्याचं आवाहन केलंय. विशेष म्हणजे तालिबानच्या विजयाचा जल्लोष करताना अल कायदाने त्यांचं पुढील लक्ष्य काश्मीर असेल अशी दर्पोक्तीही केलीय. अफगाणवरील विजयाने मुस्लिमांच्या संघर्षाचा मार्ग प्रशस्त झाल्याचं सांगत पुढील टप्प्यातील संघर्ष सुरू करण्याचं आवाहन अल कायदानं केलंय. यासाठी मुस्लीमबहुल भागांची एक यादीच तयार करण्यात आलीय.
अल कायदाने आपल्या यादीत जम्मू काश्मीरचा समावेश करुन भारताला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, दुसरीकडे चीनच्या ताब्यातील शिनजियांग आणि रशियाच्या ताब्यातील चेचन्यातही मुस्लीमांवर अत्याचाराचे आरोप होत आलेत. मात्र, या दोन्ही भागांचं नाव अल कायदाच्या यादीत नाही. यामुळेही चर्चांना उधाण आले आहे. अनेक तर्कवितर्कही लावले जात आहेत.
या यादीत काश्मीरशिवाय लेवेंट किंवा भूमध्यसागरीय स्वाथचा समावेश केलाय. भूमध्यसागरीय स्वाथमध्ये इराक, सीरिया, जॉर्डन आणि लेबनान अशा देशांचा समावेश होतो. उत्तर पश्चिम आफ्रीकेतील लीबिया, मोरक्को, अल्जीरिया, मॉरिटानिया, ट्यूनीशिया, येमेन आणि सोमालियाचाही या यादीत समावेश आहे. अलकायदाची अधिकृत माध्यम संस्था ‘अस-साहब’ने म्हटलंय, “अल्लाहच्या मदतीने तालिबानच्या या ऐतिहासिक विजयानं मुस्लीम जनतेसाठी त्या अत्याचारी निरंकुश शासनापासून मुक्तीचा मार्ग मोकळा केलाय. या ठिकाणी पाश्चिमात्य देशांनी सरकारं थोपवली आहेत.”
जगभरात दहशतवादी कृत्य केल्या प्रकरणी अल-कायदावर अनेक देशांनी बंदी घातलीय. मात्र, याच दहशतवादी संघटनेचे नेते अफगाणिस्तानमध्ये खुलेआमपणे फिरत आहेत. तालिबानकडून या संघटना आणि नेत्यांना आश्रय दिला जातोय. अल-कायदाचा वरिष्ठ नेता आणि ओसामा बिन लादेनचा सहकारी डॉ. अमीन-उल-हक (Dr. Amin-ul-Haq) अफगाणमधील नांगरहार प्रांतात आपल्या मूळ गावी परतलाय. उल हक अफगाणिस्तानमधील अल-कायदाचा एक मुख्य कमांडर होता. तोरा बोरा गुहांमध्ये त्याच्याकडे लादनेच्या सुरक्षेचा प्रभार होता. आता तालिबानने अफगाणवर ताबा मिळवल्यावर अल कायदाचे अनेक दहशतवादी अफगाणिस्तानमध्ये परतत आहेत.
Terrorist organization al qaida celebrate Afghanistan victory over America make Kashmir next target