अमेरिकी सैन्य अफगाणिस्तानातून जीव वाचवून पळालं, व्लादिमीर पुतीन यांची अमेरिकेवर खरमरीत टीका, रशिया-अमेरिका वाद पुन्हा पेटणार?
Vladimir Putin Slams US Over Afghanistan Issue:अफगाणिस्तानात 20 वर्ष काढल्यानंतर अखेर अमेरिकेने आपलं सैन्य मायदेशी बोलावलं. वर्षभरापासून सैन्य बोलावण्याची तयारी सुरु होती. अमेरिकेने हा निर्णय घाईघाईत घेतला असं जग म्हणतंय, मात्र, दुसरीकडे रशियाला हा घाईघाईचा निर्णय नाही तर जीव वाचवून पळण्याचा निर्णय वाटतो आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादमीर पुतीन यांनी शुक्रवारी यावर वक्तव्य केलं. ते म्हणाले […]
Vladimir Putin Slams US Over Afghanistan Issue:अफगाणिस्तानात 20 वर्ष काढल्यानंतर अखेर अमेरिकेने आपलं सैन्य मायदेशी बोलावलं. वर्षभरापासून सैन्य बोलावण्याची तयारी सुरु होती. अमेरिकेने हा निर्णय घाईघाईत घेतला असं जग म्हणतंय, मात्र, दुसरीकडे रशियाला हा घाईघाईचा निर्णय नाही तर जीव वाचवून पळण्याचा निर्णय वाटतो आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादमीर पुतीन यांनी शुक्रवारी यावर वक्तव्य केलं. ते म्हणाले की अमेरिका अफगाणिस्तानातून आपला जीव वाचवून पळाला.
अमेरिकी सैन्य जीव वाचवून पळालं!
पुतीन भारत आणि चीनसह 8 देशांच्या शांघाय परिषदेत बोलत होते. ते म्हणाले की’ सध्या आमचं संघटन ज्या गोष्टींचा सामना करत आहे, त्यातील अफगाणिस्तानातील बदललेली हा एक मोठा मुद्दा आहे. आम्हाला या परिस्थितीबद्दल व्यवस्थित माहिती घेऊन एक प्लान बनवावा लागेल आणि त्यावरच चालावं लागेल. यानंतर पुतीन यांनी अमेरिका आणि नाटो सैन्यांचा उल्लेख केला. ते म्हणाले की अमेरिकी सैन्य आणि नाटो सैन्य ज्याप्रकारे अमेरिकेतून निघालं, ते पाहून असंच वाटतं की ते जीव वाचवून पळाले. विशेष म्हणजे या संघटनेत पाकिस्तान, ताजिकीस्तान आणि उज्बेकिस्तानही सामील आहेत, ज्यांना थेट अफगाणिस्तानची सीमा लागते.
दहशतवाद आणि कट्टरतावाद थांबवण्याची गरज
व्लादिमीर पुतीन यांनी पुढे दहशतवादाचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, दहशतवाद, ड्रग्जची तस्करी आणि अफगाणिस्तानात वाढणारा कट्टरतावाद एससीओ देशांसाठी धोका आहे.विशेष म्हणजे, व्लादिमीर पुतीन यांनी पहिल्यांदाच थेट अमेरिकेचे नाव घेत अफगाणिस्तानबद्दल आरोप केले. याआधी पुतीन यांनी नाटो सैन्यावर टीका केली होती. तेव्हा ते म्हणाले होते की, नाटो सैन्याने अफगाणिस्तानात सर्वात मोठी गडबड केली आहे, आता अख्ख्या जगाला मिळून याची भरपाई करावी लागेल.
अमेरिकेने परंपरांचा मान ठेवला नाही
व्लादिमीर पुतीन यांनी अमेरिकेवर परंपरांचा अवमान केल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, ‘ मी अनेकदा सांगितलं आहे की अफगाणिस्तानमध्ये बाहेरची, परदेशी मुल्य त्यांच्यावर थोपावण्याचा प्रयत्न करण्यात आला. राजकीय इंजिनिअरिंग करुन तिथं लोकशाही तयार करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला गेला. हे करताना कुठंही त्यांची ऐतिहासिक आणि राष्ट्रीय मुल्य पाहिली गेली नाही. या सगळ्यात त्यांच्या परंपरांकडे दुर्लक्ष करण्यात आलं, ज्या परंपरा त्या देशातील लोकांच्या जीवनाचा भाग आहेत. ‘ अमेरिकेने अफगाणिस्तानातून जाण्याचा निर्णय जाहीर केला. मे 2021 पासून सैन्य हळू हळू कमी करण्यात आलं आणि तिथूनच अफगाणिस्तानातील स्थिती बिघडण्यास सुरुवात झाली. शेवटी 15 ऑगस्टला तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला.
हेही वाचा: