काबुलमध्ये ‘इस्राईल-पॅलेस्टाईन’ प्रमाणे युद्ध, रॉकेट हल्ले करत अमेरिकेला कोण आव्हान देतंय?

तालिबानने मदत मोहिमेला दिलेली 31 ऑगस्टची मूदत संपायला अवघा एक दिवस बाकी असतानाच काबुल विमानतळावर सोमवारी (30 ऑगस्ट) रॉकेटचा पाऊस पडला. यामुळेच काबुलमध्ये इस्राईल-पॅलेस्टाईन युद्धाप्रमाणे स्थिती तयार झाल्याची चर्चा आहे. मात्र, यामागे कोण आहे असाही प्रश्न उपस्थित होतोय.

काबुलमध्ये 'इस्राईल-पॅलेस्टाईन' प्रमाणे युद्ध, रॉकेट हल्ले करत अमेरिकेला कोण आव्हान देतंय?
Follow us
| Updated on: Aug 30, 2021 | 8:38 PM

काबुल : अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये सध्या इस्राईल-पॅलेस्टाईनमध्ये झालेल्या युद्धाप्रमाणे परिस्थिती तयार झालीय. अमेरिकेने आपलं सैन्य माघारी बोलावलं आहे. त्याआधी अमेरिकेसह नाटो देशांनी काबुल विमानतळावर नियंत्रण ठेवत अफगाणमधील परदेशी नागरिक आणि देश सोडू इच्छिणाऱ्या अफगाण नागरिकांसाठी मदत अभियान राबवलं. यासाठी तालिबानने 31 ऑगस्टची मूदत दिली. त्याला अवघा एक दिवस बाकी असतानाच काबुल विमानतळावर सोमवारी (30 ऑगस्ट) रॉकेटचा पाऊस पडला. यामुळेच काबुलमध्ये इस्राईल-पॅलेस्टाईन युद्धाप्रमाणे स्थिती तयार झाल्याची चर्चा आहे. मात्र, यामागे कोण आहे असाही प्रश्न उपस्थित होतोय.

30 ऑगस्टच्या रॉकेट हल्ल्यांनंतर अमेरिकेची अफगाणिस्तानमधून घरवापसी या रॉकेट हल्ल्यांच्या छायेतच होणार असं दिसतंय. हे रॉकेट हल्ले काबुलमधील हामिद करजई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लक्ष्य करत झाले. एकूण 5 रॉकेट विमानतळाच्या परिसरातूनच सोडल्याचं सांगितलं जातंय. माध्यमांमधील वृत्तानुसार दहशतवाद्यांनी कार लाँचरच्या मदतीने हे रॉकेट हल्ले केले. यानंतर अमेरिकेच्या क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणेने ही रॉकेट हवेतच नष्ट केली. मात्र, त्यातील एक रॉकेट बाजूच्या नागरी भागात पडल्याचंही वृत्त आहे.

रॉकेट हल्ल्याची जबाबदारीही आयसिस-केने घेतली

काबुलमध्ये आयसिस आणि अमेरिकन सैन्यात एकमेकांना प्रत्युत्तराची स्पर्धाच सुरू झाल्याचं दिसतंय. आधी आयसिस-के या दहशतवादी संघटनेने काबुल विमानतळावर हल्ला केला. त्यात 169 अफगाण नागरिक आणि 13 अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला. हा हल्ला करुन आयसिसने थेट अमेरिकेला आव्हान दिलं. यानंतर अमेरिकेने ड्रोन हल्ले करत विमानतळावर हल्ला करणाऱ्याचा खात्मा केल्याचा दावा केला. तसेच इतर ठिकाणी देखील अमेरिकन सैन्याच्या कारवाया सुरूच राहिल्या. याला प्रत्युत्तर म्हणून आयसिसने 30 ऑगस्टला रॉकेट हल्ले केला. या हल्ल्याची जबाबदारी आयसिसने घेतलीय.

अखेरच्या दिवसांमधील हल्ल्यांनी अमेरिकेच्या काळजीत वाढ

काबुलमधील प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हे रॉकेट काबुलच्या सलीम कारवा भागात पडले. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. यानंतर लगेचच तुफान गोळीबार झाल्याचेही आवाज स्थानिकांना ऐकू आले. या हल्ल्यात किती जीविताहानी झाली याचे तपशील अद्याप येणं बाकी आहे. मात्र, या हल्ल्यांनी अमेरिकेची चिंता मात्र वाढवलीय.

विमानतळावरील हल्ल्यांमागे आयसिस की तालिबानच?

विशेष म्हणजे तालिबान्यांनी अफगाण सैन्याच्या ताब्यातून काबुलसह अफगाणिस्तानमधील मोठ्या भागावर आपलं नियंत्रण प्रस्थापित केलंय. या भागावर संपूर्णपणे तालिबानचं नियंत्रण निर्माण झालंय. मग त्यांच्या उपस्थितीत काबुल विमानतळावर कोण हल्ला करत आहे असाही प्रश्न विचारला जातोय. तालिबानच्या सहमतीशिवाय असे हल्ले होऊ शकतात का? असाही प्रश्न आहे. यातूनच या हल्ल्यांमागे अचानक चर्चेत आलेली आयसिस-के संघटना आहे की तालिबान यामागून काही सूत्रं हालवतोय की अन्य कुणी यामागे आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यामुळे याच्या सूत्रधारांचं नाव आगामी काळातच स्पष्ट होऊ शकणार आहे.

हेही वाचा :

अमेरिकेची कमाल, काबूल एअरपोर्टरवर डागलेली 5 रॉकेट्स जिथल्या तिथे निकामी!

Bacha Bazi : लोकनियुक्त किंवा तालिबानी, सरकार कुणाचंही असो अफगाणमध्ये बच्चाबाजी जोरात, काय आहे प्रकार?

अफगाणी चिमुरड्याला आईप्रमाणे प्रेम करणारी अमेरिकन महिला सैनिकही स्फोटात शहीद

व्हिडीओ पाहा :

Who is really behind rocket attacks on Kabul Airport ISIS Taliban or any other

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.