Afghanistan Taliban War LIVE Updates: रशिया अफगाणिस्तानातील दुतावासातील रशियन कर्मचाऱ्यांना परत बोलावणार

| Updated on: Aug 17, 2021 | 12:04 AM

तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर मुल्ला अब्दुल गनी बरदार हे देशाचे नवे राष्ट्रपती होण्याची शक्यता आहे. तालिबान लवकरचं अफगाणिस्तानचं नाव बदलून 'इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान' ठेवू शकतं.

Afghanistan Taliban War LIVE Updates: रशिया अफगाणिस्तानातील दुतावासातील रशियन कर्मचाऱ्यांना परत बोलावणार
अफगाणिस्तान

Afghanistan Taliban War LIVE Updates काबूल: तालिबानने (Taliban) अफगाणिस्तान (Afghanistan) ताब्यात घेतल्यानंतर मुल्ला अब्दुल गनी बरदार हे देशाचे नवे राष्ट्रपती होण्याची शक्यता आहे. तालिबान लवकरचं अफगाणिस्तानचं नाव बदलून ‘इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान’ ठेवू शकतं. तालिबान समर्थकांनी रविवारी सकाळी काबूलवर हल्ला केल्यानंतर राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडला. याशिवाय उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनीही अफगाणिस्तान सोडले आहे. त्याचबरोबर देशवासी आणि परदेशी लोकही युद्धग्रस्त देशातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. अफगाण सैन्याशी अनेक महिन्यांच्या लढाईनंतर तालिबानने आश्चर्यकारकपणे एका आठवड्यात जवळजवळ संपूर्ण अफगाणिस्तान काबीज केले. एस्टोनिया आणि नॉर्वेच्या विनंतीवरून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) सोमवारी अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर तातडीची बैठक आयोजित करण्यात येत आहे. भारताच्या भूमिकेकडं लक्ष लागलं आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 16 Aug 2021 09:46 PM (IST)

    अमेरिकेच्या सैनिकांनी काबुल विमानतळावर दोन सशस्त्र लोकांना ठार केले

    तालिबानने अफगाणिस्तान काबीज केला आहे. यादरम्यान सोमावरी काबुल येथील विमानतळावर दोन सशस्त्र माणसांना अमेरिकेच्या सैनिकांनी ठार केले. ही बातमी वृत्तसंस्था एएफपीने दिली आहे.

  • 16 Aug 2021 09:41 PM (IST)

    अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांची मोठी घोषणा, 1 हजार पॅराकमांडर काबूलमध्ये उतरवणार

    अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांची मोठी घोषणा, 1 हजार पॅराकमांडर काबूलमध्ये उतरवणार, काही दिवसात 7 हजार पॅराकमांडर काबूलमध्ये पाठवणार

  • 16 Aug 2021 08:36 PM (IST)

    शरणार्थींना सर्व देशांनी स्वीकारावे, संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांचे आवाहन

    अफगाणिस्तानातील सध्याच्या परिस्थितीवरुन संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने आपत्कालीन बैठक बोलावली. या बैठकीत सध्याच्या अफगाणिस्तानमधील स्थितीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांनी शरणार्थींचा स्वीकार करण्याचे सर्व देशांना आवाहन केले. तसेच जीवन सुरक्षा विषय सर्व मदत पुरवण्याचेही त्यांनी आवाहन केले आहे.

  • 16 Aug 2021 08:26 PM (IST)

    रशिया अफगाणिस्तानातील दुतावासातील रशियन कर्मचाऱ्यांना परत बोलावणार

    रशिया सरकार अफगाणिस्तानातील दुतावासातून रशियन कर्मचाऱ्यांना परत बोलावणार आहे. रुसच्या राष्ट्रपतीचे अफगाणिस्तान दूत जमीर काबुलोव यांनी याविषयी माहिती दिली आहे. काबुलोव यांनी ‘एखो मोस्कवी’ या रेडियो स्टेशनवरुन ही घोषणा केली आहे. रशिया येथील दुतावासात काम करणाऱ्या जवळपास 100 कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली जाणार आहे किंवा त्यांना परत रशियामध्ये बोलावले जाणार आहे. रशियाचे राजदूत दमित्री झिनरोव हे मंगळवारी तालिबानींच्या प्रतिनिधींची भेट घेणार आहेत. यामध्ये ते अफगाणिस्तान दुतावासाच्या सुरक्षेवर चर्चा करतील. सध्या दुतावासाची सुरक्षा तालिबानी सैनिक करत आहेत.

  • 16 Aug 2021 07:44 PM (IST)

    अल्पसंख्याकांनी घेतला काबुलच्या गुरुद्वारामध्ये आश्रय

    फगाणिस्तानमधील अल्पसंख्याकांनी काबुलच्या गुरुद्वारामध्ये आश्रय घेतला आहे. याविषयी दिल्ली शिख गुरुद्वारा प्रबंधन समितीचे अध्यक्ष तसेच शिअद नेता मनजिंदर सिंह सिरसा यांनी सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते काबुल येथील गुरुद्वारा कमिटीच्या लोकांच्या संपर्कात आहेत. कमिटीच्या लोकांनी अल्पसंख्याक नागरिकांनी काबुल येथील गुरुद्वारामध्ये आश्रय घेतल्याचं सांगितलं. तसेच आश्रय घेतलेल्या लोकांची तालिबानी नेत्यांनी भेट घेतली असून त्यांनी या लोकांना सुरक्षा प्रदान करण्याचे आश्वासन दिल्याची माहितीही  काबुलमधून मिळालेली आहे.

  • 16 Aug 2021 04:51 PM (IST)

    तालिबानकडून सामान्य नागरिकांकडील शस्त्र गोळा करण्यास सुरुवात

    अल जजिराच्या रिपोर्टनुसार तालिबानच्या समर्थकांनी अफगाणिस्तानच्या सामान्य नागरिकांकडे असलेली शस्त्रास्त्रे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. तालिबानची राजवट असल्यानं नागरिकांना खासगी शस्त्रास्त्र बाळगण्याची गरज नसल्याचं तालिबान्यांकडून सांगण्यात येत आहे. याशिवाय तालिबानकडून बँकेत काम करणाऱ्या महिलांनी कामावर येऊ नये, असा फतवा काढण्यात आलाय. महिला कर्मचाऱ्यांनी हे विचित्र आहे पण वास्तव असल्याचं म्हटलंय.

  • 16 Aug 2021 03:49 PM (IST)

    अफगाणिस्तानातून शीख आणि हिंदूंना बाहेर काढण्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था करणार: हरदीप सिंह पुरी

    अफगाणिस्तानातून शीख आणि हिंदूंना बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून व्यव्सथा केल्या जातील, असं केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटले आहे.तालिबानने काबूलमधील टोलोन्यूज कंपाऊंडमध्ये घुसून सुरक्षा कर्मचाऱ्यांची शस्त्रे तपासली आणि सरकारने जारी केलेली शस्त्रे गोळा केलीअ असल्याचं कळतंय.

  • 16 Aug 2021 03:33 PM (IST)

    काबूल विमानतळावरील वास्तव दाखवणारा व्हिडीओ

  • 16 Aug 2021 03:09 PM (IST)

    तालिबानसोबत ‘मैत्रीपूर्ण संबंध’ निर्माण करण्यास इच्छुक: चीन

    एएफपी या वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, चीनने अफगाणिस्तानमध्ये तालिबानसोबत “मैत्रीपूर्ण संबंध” तयार करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. त्याच वेळी, पाकिस्तानने असेही म्हटले आहे की जेव्हा वेळ येईल तेव्हा तो तालिबान सरकारला आंतरराष्ट्रीय सहमती इतर बाबतीत सहकार्य करणार असल्याचं म्हटलंय. तर  पाकिस्तानने काबूलमधील आपले दूतावास बंद न करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 16 Aug 2021 02:32 PM (IST)

    अफगाणिस्तानमधील भयानक दृश्य, जीव वाचवण्यासाठी विमानाला लटकले, उंचावरुन पडून दोघांचा मृत्यू

    अफगाणिस्तानमधील भयानक दृश्य, जीव वाचवण्यासाठी विमानाला लटकले, उंचावरुन पडून दोघांचा मृत्यू

  • 16 Aug 2021 01:57 PM (IST)

    अफगाणिस्तानचे राष्ट्पती अशरफ घनी ओमानमध्ये

    अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडल्यानंतर ते तझाकिस्तानला गेल्याची चर्चा सुरु होती. मात्र, नव्यानं आलेल्या माहितीनुसार घनी सध्या ओमानमध्ये असल्याची माहिती आहे.

  • 16 Aug 2021 01:55 PM (IST)

    अफगाणिस्तानचं नाव लवकरचं बदललं जाणार

    अफगाणिस्तानातील तालिबान्यांविरोधात कारवाई करण्यासाठी अमेरिकेचं सैन्य वीस वर्षांपूर्वी म्हणजेच 2001 मध्ये दाखल झालं होतं. अमेरिकेत सत्ताबदल झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी टप्प्याटप्यानं अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानातून हटवण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेचं सैन्य कमी झाल्याची संधी साधत देशाच्या ग्रामीण भागात मर्यादित असेलेल्या तालिबाननं आक्रमक पवित्रा घेतला. तालिबान आणि अफगाणिस्तान सरकार यांच्यात एका बाजूला चर्चा सुरु होती. दुसरीकडे तालिबान एका मागोमाग शहरं ताब्यात घेत होता. अफगाणिस्तानातील 34 प्रातांपैकी 28 प्रांत तालिबाननं 15 ऑगस्टपर्यंत ताब्यात घेतले होते. तर, रविवारी जलालाबाद आणि काबूलवर ताबा घेत तालिबानं पुन्हा सत्ता मिळवलीय.तालिबान समर्थकांनी रविवारी सकाळी काबूलवर हल्ला केल्यानंतर राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडला. याशिवाय उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनीही अफगाणिस्तान सोडले आहे. तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर मुल्ला अब्दुल गनी बरदार हे देशाचे नवे राष्ट्रपती होण्याची शक्यता आहे. तालिबान लवकरचं अफगाणिस्तानचं नाव बदलून ‘इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान’ ठेवू शकतं.

  • 16 Aug 2021 01:46 PM (IST)

    काबूल विमानतळावर अमेरिकेच्या सैन्याकडून गोळीबार

    एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, काबूल विमानतळावरील  गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिकन सैनिकांनी हवेत गोळीबार केला. अमेरिकेने अफगाणिस्तानातून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी काबूल विमानतळाचे हवाई वाहतूक नियंत्रण ताब्यात घेण्याची घोषणा केली आहे. या गोळीबारात काही लोकांनी जीव गमावले आहेत.

  • 16 Aug 2021 01:44 PM (IST)

    ब्रिटनकडून त्यांच्या नागरिकांना बाहेर काढण्यास सुरुवात

    तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर ब्रिटनने काबूलमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानातील  लोकांना काबूलमधून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना घरी आणण्यासाठी ब्रिटिश सैनिक तेथे पोहोचले असल्याचे ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रविवारी मंत्रिमंडळाच्या आपत्कालीन समितीच्या बैठकीच्या अध्यक्षतेनंतर सांगितले की, गेल्या 20 वर्षांमध्ये अफगाणिस्तानात ब्रिटिश सैनिकांना मदत करणाऱ्या ब्रिटिश नागरिकांना आणि अफगाणिस्तानांना बाहेर काढण्यास प्राधान्य  देण्यात येणार आहे.  

  • 16 Aug 2021 01:43 PM (IST)

    कॅनडा अफगाणिस्तानच्या नागरिकांना आश्रय देणार

    अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा झाल्यानंतर कॅनडा सरकारने 20,000 अफगाण नागरिकांना आश्रय देण्याची घोषणा केली आहे. तालिबानच्या सत्ताबदलानंतर अफगाणिस्तानातील अनेक लोक इतर देशांमध्ये आश्रय घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

  • 16 Aug 2021 01:42 PM (IST)

    काबूल विमानतळावर अमेरिकेचा ताबा,6 हजार सैन्य तैनात करणार

    अफगाणिस्तानातून आपल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी अमेरिकेने काबूल विमानतळाचे हवाई वाहतूक नियंत्रण ताब्यात घेण्याची घोषणा केली आहे. यासाठी अमेरिका काबूल विमानतळावर सुमारे 6000 सैनिक तैनात करणार आहे.

Published On - Aug 16,2021 1:38 PM

Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.