Syrian Crisis : बापरे, मागच्या 48 तासात इस्रायलचे सीरियामध्ये तब्बल 300 Air Strike

Israel Strike on Syria : सीरियामध्ये तख्तापलट झाल्यानंतर अराजकाची स्थिती निर्माण झालीय. बाशर अल-असाद देश सोडून पळून गेले आहेत. सर्व सत्ता बंडखोरांच्या हाती आहे. इस्रायलने आपलं हित डोळ्यासमोर ठेऊन या स्थितीचा फायदा उचलण्यास सुरुवात केली आहे. इस्रायलने जवळपास 300 एअर स्ट्राइक केले आहेत.

Syrian Crisis : बापरे, मागच्या 48 तासात इस्रायलचे सीरियामध्ये तब्बल 300 Air Strike
Air strike on Syria
Follow us
| Updated on: Dec 10, 2024 | 12:57 PM

सीरियामध्ये तख्तापलट झाल्यानंतर निर्माण झालेल्या अराजक स्थितीचा इस्रायल फायदा उचलतोय. असदच्या सैन्याने मैदान सोडलय. सीरियाच्या सुरक्षेसाठी सरकार आणि सैन्य नाहीय. बंडखोरांनी सीरियाचा ताबा घेतल्यानंतर इस्रायलने गोलान हाइट्सला लागून असलेल्या सीरियाई क्षेत्राचा ताबा घेण्यास आपला दबदबा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. मागच्या 48 तासात इस्रायलने सीरियामध्ये जवळपास 300 एअर स्ट्राइक्स केले आहेत. त्यात सीरियाच एअर फोर्स आणि एअर डिफेन्स नेटवर्क पूर्णपणे उद्धवस्त झालय. जवळपास सर्व विमानं, हेलिकॉप्टर्स आणि एअर डिफेन्स सिस्टिम या हल्ल्यात उद्धवस्त झाली आहे.

बशर अल-असद सरकारच्या पतनानंतर तिथली काही घातक शस्त्र कट्टरपंथीयांच्या हाती लागू शकतात, अशी शस्त्रास्त्र इस्रायलने हवाई हल्ल्यात नष्ट केली. इस्रायली फायटर जेट्सनी कमीत कमी सीरियाई सैन्याच्या तीन एअर बेसवर बॉम्ब वर्षाव केला असं दोन सीरियन सुरक्षा सूत्रांनी सांगितलं. यात दोन डझन हेलिकॉप्टर आणि जेट विमानं होती. असद सत्तेवरून गेल्यानंतर हवाई तळांवरील सर्वात मोठा हल्ला आहे.

अजून कुठल्या देशांनी हल्ला केला?

कतर, सौदी अरेबिया आणि इराकने इस्रायलच्या या हवाई हल्ल्याचा निषेध केला आहे. सीरिया क्षेत्रावरील ताबा लवकरात लवकर सोडण्याच आवाहन केलय. त्याशिवाय हुती समूहाने सुद्धा क्यूनेत्रा आणि माउंट हरमोनमधील इस्रायली सैन्याच्या कारवाईवर चिंता व्यक्त केली. फक्त इस्रायलच नाही, अमेरिका आणि टर्कीने सुद्धा आपल्या-आपल्या हिताच्या रक्षणासाठी सीरियामध्ये एअर स्ट्राइक केला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने सोमवारी माहिती दिली की, त्यांनी ISIS च्या जवळपास 75 ठिकाणांवर हल्ला केला. टर्कीने सुद्धा कुर्द फोर्सच्या ठिकाणांना लक्ष्य केलं.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....