ब्रिटननंतर अमेरिकेचाही शेख हसीना यांना मोठा झटका, आता कुठे जाणार?

माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणी थांबायचं नाव घेत नाहीये. कारण ब्रिटनकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. दुसरीकडे अमेरिकेनेही शेख हसीनासाठी आपले दरवाजे बंद केले आहेत. त्यामुळे सध्या त्या भारताच्या आश्रयातच आहेत.

ब्रिटननंतर अमेरिकेचाही शेख हसीना यांना मोठा झटका, आता कुठे जाणार?
Follow us
| Updated on: Aug 06, 2024 | 7:25 PM

बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या हिंसक आंदोलनामुळे शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर जीवाचा धोका असल्याने त्यांना देश सोडावा लागला. शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला आहे. पण येथून त्यांना लंडन किंवा अमेरिकेला जाण्याचा विचार होता. पण शेख हसीना यांना ब्रिटनकडून धक्का बसल्यानंतर आता अमेरिकेने ही झटका दिला आहे. शेख हसीना भारतातून लंडनला जाणार असल्याची चर्चा होती. ब्रिटन सरकार कठोर भूमिका दाखवत आहे. शेख हसीना यांना ब्रिटनमधून हिरवा सिग्नल मिळताना दिसत नाही. बांगलादेशातील विरोधकांच्या जवळच्या सूत्रांनी दावा केला आहे की, अमेरिकेने पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांचा व्हिसाही रद्द केला आहे.

ब्रिटनकडून अजून परवानगी नाही

ब्रिटिश इमिग्रेशन नियम कोणालाही आश्रय घेण्यासाठी प्रवास करण्यास परवानगी देत ​​नाहीत. ब्रिटनच्या या भूमिकेमुळे शेख हसीना यांना मोठा धक्का बसला आहे. सध्या त्या भारतात आहेत. गाझियाबादच्या हिंडन एअरपोर्टच्या गेस्ट हाऊसमध्ये मुक्कामी आहेत. त्यामुळे काही काळ आता त्यांना इथेच राहावे लागणार आहे.

ज्या लोकांना आंतरराष्ट्रीय संरक्षणाची आवश्यकता आहे त्यांनी प्रथम सुरक्षित देशात आश्रया घेतला पाहिजे असं यूकेने म्हटलं आहे. ब्रिटिश सरकार हसीना यांच्या औपचारिक आश्रयाच्या विनंतीवर कारवाई करत आहे. शेख हसीना यांची बहिण रेहाना यांच्याकडे यूकेचे नागरिकत्व आहे. त्यामुळे त्या लवकरच यूकेला जाऊ शकतात.

अमेरिकेने दार केले बंद

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या कार्यकाळात बांगलादेश आणि अमेरिकेतील संबंध चांगले नव्हते. त्यामुळे त्यांना आता अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेख हसीना यांनी अमेरिकेला लष्करी तळ बांधण्यासाठी स्पष्ट नकार दिला होता. अमेरिकेनेही शेख हसीनासाठी आपले दरवाजे बंद केले आहेत. अमेरिकेने शेख हसीना यांचा यूएस व्हिसा रद्द केला आहे, म्हणजेच त्या आता अमेरिकेला जाऊ शकणार नाहीत.

बांगलादेशमधील परिस्थिती अजूनही बिकट आहे. शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर ही जाळपोळ सुरु आहे. दुकाने लुटली जात आहेत. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केले जात आहे. बांगलादेशमध्ये लवकरच काळजीवाहू सरकार स्थापन केलं जाणार आहे. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात येऊ शकते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.