कोरोनापेक्षा 100 पट धोकादायक महामारी, तज्ज्ञांकडून नव्या एच5एन1 व्हायरसबाबत चिंता
Bird flu outbreak: अमेरिकेत या प्राण्यांना बर्ड फ्लू कसा आला? हे अजून स्पष्ट झाले नाही. परिसरात वाघांमध्ये हा विषाणू आढळला आहे. रोगट कोंबडी खाल्ल्याने या प्राण्यांना संसर्ग झाला असण्याची शक्यता आहे. हा विषाणू वन्यजीवांना किती व्यापक धोका निर्माण करू शकतो.
दोन वर्षांपूर्वी कोरोनामुळे संपूर्ण जग धास्तावले होते. लाखो जणांचा मृत्यू या व्हायरसने घेतला होता. त्यातून आता कुठे दिलासा मिळत असताना पुन्हा एका नवीन संकटाने दार ठोठावले आहे. तज्ज्ञांनी आता बर्ड फ्लूची महामारी सुरु होण्याचा धोका सांगितला आहे. कोरोनापेक्षा हा धोका जास्त असणार आहे. बर्ड फ्लूचा H5N1 स्ट्रेन जगभरात धोका निर्माण करु शकतो, अशी चिंता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे. गाय, मांजरसह मानव आणि इतर सस्तन प्राण्यांमध्ये हा धोका आहे. अमेरिकेत गाय, मांजरीत हा विषाणू सापडल्यानंतर त्यावर संशोधन सुरु झाले आहे.
अमेरिकेतील डेली मेलमधील बातमीत म्हटले आहे की, अमेरिकेतील टेक्सासमधील एका डेअर फार्ममध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीला H5N1 ची लागन झाली. हा व्यक्ती डेअरीमधील प्राण्यांच्या सरळ संपर्कात होता. त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहे. अमेरिकेतील सहा राज्यांत गायीच्या 12 कळपांमध्ये हा व्हायरस सापडला आहे. तीन मांजरीमध्ये हे विषाणू मिळाला आहे. या विषाणूमुळे या तिन्ही मांजरींचा मृत्यू झाला होता. अमेरिकेतील अंडे उत्पादन करणाऱ्या सर्वात मोठ्या पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लू मिळाले आहे. त्यानंतर त्या पोल्ट्री फार्ममधील 16 लाख कोंबड्या आणि 3 लाख 37 हजार पिल्लांना नष्ट करण्यात आले आहे.
तज्ज्ञांनी दिला इशारा
बर्ड फ्लू संशोधन करणारे डॉ. सुरेश कुचिपुडी यांनी H5N1 संदर्भात धोक्याचा इशारा दिला आहे. ते म्हणाले, जग आता एका नवीन धोक्याच्या उंबरठ्यावर आला आहे. या व्हायरसने यापूर्वी आपली क्षमता सिद्ध केली आहे. तो मानवासह सर्व सस्तन प्राण्यांमध्ये यापूर्वी मिळाला होता. औषधनिर्माण कंपनीचा सल्लागार जॉन फुल्टन यांनी या व्हायरसच्या धोक्याबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे. या व्हायरसमुळे कोरोनापेक्षा जास्त प्रमाणात महामारी फैलू शकते, असे त्यांनी म्हटले आहे. हा धोका कोविड-19 पेक्षा 100 पट अधिक असणार आहे.
कसा आला विषाणू
अमेरिकेत या प्राण्यांना बर्ड फ्लू कसा आला? हे अजून स्पष्ट झाले नाही. परिसरात वाघांमध्ये हा विषाणू आढळला आहे. रोगट कोंबडी खाल्ल्याने या प्राण्यांना संसर्ग झाला असण्याची शक्यता आहे. हा विषाणू वन्यजीवांना किती व्यापक धोका निर्माण करू शकतो, हे तपासण्यासाठी बर्ड फ्लूच्या चाचण्या घेण्यात आल्या. 1 जानेवारी 2003 ते 21 डिसेंबर 2023 दरम्यान, 23 देशांमध्ये H5N1 विषाणूंद्वारे मानवी संसर्गाची 882 प्रकरणे नोंदवली गेली, त्यापैकी 461 (52%) प्राणघातक होती.