US Election Results 2024 : अमेरिकेत ट्रम्प जिंकले, भारताच्या नव्या शत्रुचं मोठं नुकसान

US Election Results 2024 : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा विजय मिळवला आहे. ट्रम्प यांचा विजय अनेक अर्थांनी भारताच्या फायद्याचा आहे. भारताच्या नव्या शत्रुला याची किंमत चुकवावी लागेल.

US Election Results 2024 : अमेरिकेत ट्रम्प जिंकले, भारताच्या नव्या शत्रुचं मोठं नुकसान
Donald Trump
Follow us
| Updated on: Nov 06, 2024 | 5:07 PM

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच चित्र स्पष्ट झालं आहे. पुढच्या चार वर्षांसाठी डोनाल्ड ट्रम्प सत्ता संभाळणार आहेत. अमेरिकेच्या या निवडणुकीवर भारतासह सगळ्या जगाची नजर होती. अमेरिकेत ट्रम्प यांचा पुनरागमन हे भारतासह आशिया खंडातील हिंदुंसाठी एक मोठा टर्निंग पॉइंट आहे. ट्रम्प यांनी अलीकडेच एका स्टेटमेंट केलं. त्यात त्यांनी शेजारच्या बांग्लादेशात हिंदुंविरोधात सुरु असलेल्या अत्याचारावर चिंता व्यक्त केली होती. यावरुन त्यांनी बायडेन प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. शेख हसीना यांचं सरकार गेल्यानंतर भारताने बांग्लादेशातील हिंदू सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे. बांग्लादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद यूनुस यांच्या प्रशासनाला आतापर्यंत बायडेन यांचं विशेष समर्थन मिळालं होतं. भारताच्या चिंतांकडे बायडेन प्रशासनाने दुर्लक्ष केलं होतं. आता डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आले आहेत. त्यामुळे मोहम्मद यूनुस सरकारला हिंदुंची सुरक्षा निश्चित करावी लागेल.

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी बांग्लादेशला अराजकाकडे ढकललं असं डोनाल्ड ट्रम्प आधीच बोलले आहेत. तिथे हिंदुंवर हल्ला करण्यात आले. जाळपोळ, लुटमार करण्यात आली. डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आले तर बांग्लादेशातील स्थिती बदलणार हे निश्चित आहे.

ट्रम्प काय म्हणाले?

बांग्लादेशातील हिंदुंना सुरक्षेच आश्वासन देत डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींच कौतुक केलं होतं. कमला हॅरिस यांच्यावर हिंदुंकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला होता. अमेरिकेतील धर्म विरोधी, अति डावे यांच्यापासून मी अमेरिकी हिंदुंच रक्षण करीन असं ट्रम्प म्हणाले होते. डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांची चांगली मैत्री आहे. आता दोन्ही नेते एकत्र येऊन बांग्लादेशातील हिंदू सुरक्षेबद्दल काहीतरी करतील अशी अपेक्षा आहे.

आता लगाम लागणार

शेख हसीना यांच्यानंतर बांग्लादेशात सत्तेवर आलेल्या अंतरिम सरकारने भारताविरोधात अनेक पावलं उचलली आहेत. बायडेन हे यूनुस सरकारचे समर्थक आहेत. पण डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर युनूस सरकारवर नियंत्रण येईल.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.