डोनाल्ड ट्रम्प चार वर्षांनंतर व्हाईट हाऊसमध्ये, बायडेन यांनी असे केले त्यांचे स्वागत

व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये दोन्ही नेत्यांनी सत्ता हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेवर चर्चा केली. बैठकीच्या सुरुवातीला बायडेन यांनी ट्रम्प यांचे स्वागत केले आणि म्हणाले, आपले स्वागत आहे, ही आपल्या देशासाठी महत्त्वाची वेळ आहे.

डोनाल्ड ट्रम्प चार वर्षांनंतर व्हाईट हाऊसमध्ये, बायडेन यांनी असे केले त्यांचे स्वागत
Follow us
| Updated on: Nov 14, 2024 | 12:39 AM

जगातील सर्वात जुनी लोकशाही असलेल्या अमेरिकेत नुकत्याच निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दणदणीत विजय नोंदवला आणि या विजयानंतर पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या निमंत्रणावरून व्हाईट हाऊसला भेट दिली. बायडेन यांनी ट्रम्प यांचे स्वागत केले आणि सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण करण्याच्या गरजेचा पुनरुच्चार केला. ही प्रक्रिया अमेरिकन राजकारणातील एक महत्त्वाची पायरी मानली जाते, जिथे सत्तेचे शांततापूर्ण आणि सुरळीत हस्तांतरण सुनिश्चित करण्यावर भर दिला जातो.

प्रत्यक्षात व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये झालेल्या या भेटीत दोन्ही नेत्यांनी सत्ता हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेवर चर्चा केली. बैठकीच्या सुरुवातीला बायडेन यांनी ट्रम्प यांचे स्वागत केले आणि म्हणाले, आपले स्वागत आहे, ही आपल्या देशासाठी महत्त्वाची वेळ आहे. ट्रम्प म्हणाले की, राजकारण करणे अवघड आहे, मात्र बदल करण्यासाठी मी माझी भूमिका बजावेन. व्हाईट हाऊसमध्ये सत्ता हस्तांतरणाची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

संभाषणादरम्यान, बायडेन यांनी अध्यक्षीय निवडणुकीतील विजयाबद्दल ट्रम्प यांचे अभिनंदन केले.  ट्रम्प यांनीही यावेळी सहमती दर्शवली आणि ही प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी आपण बायडेन प्रशासनासोबत काम करणार असल्याचे सांगितले. या भेटीचा व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये दोन्ही नेत्यांमध्ये सौहार्दपूर्ण संवाद पाहायला मिळत आहे.

2020 च्या निवडणुकीत जेव्हा ट्रम्प यांना पराभवाचा सामना करावा लागला तेव्हा त्यांनी सत्ता हस्तांतरणाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या परंपरांचे पालन केले नाही. त्यावेळी त्यांनी बायडेन यांना व्हाईट हाऊसमध्ये येण्याचे निमंत्रण दिले नव्हते आणि शपथविधी सोहळ्यालाही ते उपस्थित राहिले नव्हते. मात्र यावेळी ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसला भेट देण्याचे निमंत्रण तर स्वीकारलेच शिवाय सत्ता हस्तांतरणाच्या परंपरांचे पालन करण्याच्या दिशेने पावले टाकली.

डोनाल्ड ट्रम्प पुढील वर्षी 20 जानेवारी रोजी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. यासाठी ते स्वत:ची टीम तयार करत आहे. परराष्ट्र धोरण, संरक्षण, वित्त आणि राष्ट्रीय सुरक्षा यासारख्या महत्त्वाच्या खात्यांमध्ये मोठ्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याची तयारीही जोरात सुरू असून आगामी धोरणांकडे लक्ष लागले आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.