Pakistan attack in iran | बिथरलेल्या पाकिस्तानचा पलटवार, इराणमध्ये घुसून AIR STRIKE

Pakistan attack in iran | इराणने केलेल्या हल्ल्याला पाकिस्तानने 24 तासानंतर प्रत्युत्तर दिलं आहे. आता या नंतर दोन्ही देशांच सैन्य आमने-सामने येणार का? या प्रश्नाच उत्तर मिळेलच. इराण आणि पाकिस्तानमध्ये तणाव आणखी वाढणार हे निश्चित आहे. पाकिस्तानने इराणमध्ये कुठे एअर स्ट्राइक केला? ते जाणून घ्या.

Pakistan attack in iran | बिथरलेल्या पाकिस्तानचा पलटवार, इराणमध्ये घुसून AIR STRIKE
Pakistan attack in iran
Follow us
| Updated on: Jan 18, 2024 | 9:14 AM

Pakistan attack in iran |  इराणने मंगळवारी पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतातील जैश अल अदल या दहशतवादी संघटनेच्या तळावर हवाई हल्ला केला होता. या हल्ल्याला पाकिस्तानने 24 तास उलटत नाही, तोच प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तानी एअर फोर्सने पूर्व इराणच्या सरवन शहरात बलूच दहशतवादी संघटनेच्या तळावर एअर स्ट्राइक केला आहे. पाकिस्तानी सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, एअर फोर्सने बुधवारी रात्री पूर्व इराणच्या सरवन शहरात बलूच दहशतवादी संघटनेच्या तळावर अनेक हवाई हल्ले केले. या हल्ल्यानंतर शहरात सर्वत्र धूर दिसत होता.

पाकिस्तानवर झालेल्या हल्ल्यानंतर सिस्तान आणि बलूचिस्तान प्रांतातील इराणी तळ हाय अलर्टवर होते. ते प्रत्युत्तराची तयारी करत होते. जाहेदानमध्ये शाहिद अली अरबी एअर बेसला अलर्टवर ठेवण्यात आलं आहे. इराणच्या एअर स्ट्राइकला उत्तर म्हणून पाकिस्तानने हा हल्ला केला आहे. मंगळवारी इराणने पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतातील जैश अल अदलच्या ठिकाणांवर हल्ला केला होता. यात 2 लहान मुलींचा मृत्यू झाला होता.

इराणच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने तात्काळ काय पावल उचलेली ?

इराणच्या हल्ल्याची पाकिस्तानने निंदा केली होती. हे चांगल्या शेजाऱ्याच लक्षण नाही, असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं होतं. याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला होता. हल्ल्यानंतर पकिस्तानने इराणमधून आपल्या राजदूताला माघारी बोलवून घेतलं होतं. इतकच नाही पाकिस्तानने इराणसोबत सर्व द्विपक्षीय चर्चा रद्द केल्या.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने काय म्हटलं?

इराणने जाहीरपणे पाकिस्तानच्या संप्रभुतेच उल्लंघन केलय. हे आंतराष्ट्रीय कायदा आणि संयुक्त राष्ट्राच्या चार्टर सिद्धांताच उल्लंघन आहे. ही बेकायद कारवाई अजिबात मान्य नाही. पाकिस्तानला या बेकायद कृतीचा उत्तर देण्याचा पूर्ण अधिकार आहे. याच्या परिणामांची सगळी जबाबदारी इराणची असेल असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं होतं.

जुन्दल्लाहमध्ये कधी फूट पडली?

जैश अल अदलच 2012 आधी जुन्दल्लाह नाव होतं. 2002 मध्ये ही दहशतवादी संघटना अस्तित्वात आली. अब्दुल मलिक रिगी या संघटनेचा प्रमुख होता. 2010 मध्ये इराणी सैन्याने अब्दुल मलिक रिगीची हत्या केली. त्यानंतर जुन्दल्लाहमध्ये फूट पडून वेगवेगळे गट तयार झाले. ही एक सुन्नी दहशतवादी संघटना आहे. इराणने याच जैश अल अदलवर हवाई हल्ला केला होता.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.