ब्रिटनच्या राजगादीवर आता कोण? ‘तो’ 3 वर्षांचा असतानाच वारसदार घोषित…
1970 मध्ये ब्रिटिश राजघराण्यात एखाद्या विद्यापीठाची पदवी मिळवणारे प्रिन्स चार्ल्स हे पहिले व्यक्ती ठरले.
ब्रिटनच्या (Britain) राजगादीवर तब्बल 70 वर्षे विराजमान झालेल्या महाराणी एलिझाबेथ (Queen Elizabeth) द्वितीय यांचं गुरुवारी निधन झालं. आता एलिझाबेथ यांच्या निधनानंतर 73 वर्षांचे प्रिन्स चार्ल्स (Prince Charles) हे ‘किंग चार्ल्स थर्ड’ म्हणून विराजमान होतील. प्रिन्स चार्ल्स यांचे वैशिष्ट्य म्हणजे ब्रिटनच्या तख्तावर बसणारे ते सर्वाधिक वयाचे राजे असतील. एलिझाबेथ यांच्या निधनानंतर लवकरच त्यांची ताजपोशी होईल. ते 3 वर्षांचे असतानाच राणी एलिझाबेथ यांच्यानंतर ते वारसदार असतील, अशी घोषणा करण्यात आली होती.
कोण आहेत प्रिन्स चार्ल्स?
महाराणा एलिझाबेथ आणि ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलिप यांचे मोठे पुत्र चार्ल्स यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1948 रोजी बंकिंघम पॅलेसमध्ये झाला.
प्रिन्स 3 वर्षांचे असतानाच महाराणी एलिझाबेथ यांच्यानंतर ते राजगादीवर विराजमान होतील, असे ठरले होते.
किंग जॉर्स सहावे यांचं निधन 6 फेब्रुवारी 1952 मध्ये झालं. त्यानंतर 25 वर्षी राणी एलिझाबेथ राजगादीवर विराजमान झाल्या.
त्यामुळे त्यांच्या मोठ्या मुलाकडे अर्थात प्रिन्स चार्ल्स यांच्याकडे वारसाने हे पद येणार, असे निश्चित झाले.
प्रिन्स चार्ल्स यांचे शिक्षण किती?
ब्रिटनच्या शाही घराण्यातील सदस्यांचं शिक्षण राजवाड्यातच होत असे. महाराणी आणि ड्यूक ऑफ एडिनबर्ग यांनी मात्र वेगळा निर्णय घेतला.
प्रिन्स चार्ल्स यांना बंकिंघम पॅलेसमध्ये न शिकवता शाळेत पाठवण्यात आले. चार्ल्स यांचं सुरुवातीचं शिक्षण 1956 मध्ये सुरु झालं. पश्चिम लंडनमधील हिल हाऊस शाळेतून…
10 महिन्यातच चार्ल्स यांना बर्कशायर येथील चेम स्कूलमध्ये पाठवण्यात आलं. ते बोर्डिंग स्कूल होतं. तिथेच त्यांनी पुढील शिक्षण घेतलं. प्रिन्स असल्यामुळे त्यांना शाळेत बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागलं, असंही म्हटलं जातं.
शाळेत मारही खाल्ला होता…
व्हॅनिटी फेअरच्या रिपोर्टानुसार, चार्ल्स यांना बोर्डिंग स्कूलमध्ये होमसिकनेस जाणवत होता. खूपदा ते टेडी बिअरला जवळ घेत रडत असत. राजगादीवर विराजमान होणार म्हणून त्यांना शाळेत चिडवतही होते. अभ्यासात कचुराई झाल्यास त्यांनी शिक्षकांचा मारही खाल्ला आहे.
1962 मध्ये त्यांना पूर्व स्कॉटलँड येथील गॉर्डनस्टोन शाळेत पाठवण्यात आलं. प्रिन्स ऑफ वेल्सने 1966 मध्ये ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे इंग्लंड ग्रामर स्कूलमध्ये एक्सचेंज स्टुडंटच्या रुपात दोन टर्म शिक्षण घेतलं.
चार्ल्स शेवटच्या वर्षात होते, तेव्हा पुन्हा स्कॉटलंडला परतले. नंतर त्यांनी सहा ओ लेव्हलच्या परीक्षा दिल्या. उत्तीर्ण झाले.
जुलै 1967 मध्ये ऑप्शनल हिस्ट्री पेपरमध्ये डिस्टिंक्शन मिळवलं. चार्ल्स यांनी केम्ब्रिज युनिव्हर्सिटीत ट्रिनिटी कॉलेजमध्ये इतिहासाचं शिक्षण घेतलं.
1970 मध्ये ब्रिटिश राजघराण्यात एखाद्या विद्यापीठाची पदवी मिळवणारे ते पहिले व्यक्ती ठरले.