Queen Elizabeth : राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर ‘त्या’ पत्राची चर्चा, उत्सुकता शिगेला पण खुलासा 63 वर्षानंतरच
राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर अनेर गोष्टींची चर्चा झाली आहे. त्यांच्या पर्सपासून ते जीवनशैली ही सर्वांसमोर आली आहे. त्याच पद्धतीने आता त्यांनी लिहलेल्या पत्राची चर्चा होऊ लागली आहे. मात्र, या पत्रातील मजुकरासंबंधी त्यांच्या निकटवर्तींयांना देखील माहिती नाही.
मुंबई : (Queen Elizabeth) राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर त्यांच्या संबंधी अनेक गोष्टी आता समोर येऊ लागल्या आहेत. शिवाय याबाबत सर्वसामान्यांमध्येही देखील कमालीची उत्सुकता आहे. आता त्यांनी अनेक वर्षापूर्वी लिहलेल्या (Letter) पत्राची चर्चा सुरु झाली आहे. असे असले तरी या पत्रामध्ये नेमके काय आहे हे राणी व्यतिरीक्त कुणालाच माहितीही नाही. शिवाय आता त्यांच्या निधनानंतर काय ते समोर येईल असे तुम्हाला वाटत असले तरी तो तुमचा गैरसमज आहे. कारण येथून पुढे 63 वर्षांनी ते (In the glass palace) काचेच्या महलात ठेवणारे पत्र उघडता येणार आहे.
कुठे आहे ते राणींनी लिहलेले पत्र?
राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर अनेक गोष्टींची चर्चा झाली आहे. त्यांच्या पर्सपासून ते जीवनशैली ही सर्वांसमोर आली आहे. त्याच पद्धतीने आता त्यांनी लिहलेल्या पत्राची चर्चा होऊ लागली आहे. मात्र, या पत्रातील मजुकरासंबंधी त्यांच्या निकटवर्तींयांना देखील माहिती नाही. ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील एका काचेच्या लॉकरमध्ये हे पत्र ठेवण्यात आले आहे. जे 1986 साली राणी एलिझाबेथ यांनी लिहले होते.
काय आहे तज्ञांचा अंदाज?
राणी एलिझाबेथ यांनी लिहिलेल्या पत्रातील मजकुराबद्दल कोणीच काही अधिकृतपणे सांगू शकत नाही. पण यामध्ये सिडनीतील लोकांना उद्देशून काही संदेश असल्याचे अंदाज वर्तवले जात आहेत. असे असले तरी 2085 शिवाय हे पत्र उघडता येणारही नाही.
पत्रावर काय आहेत सूचना?
राणीने लिहिलेले पत्र सध्या काचेमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र, यावर सिडनीच्या लॉर्ड मेयरला उद्देशून काही सूचानाही आहेत. यामध्ये आपण 2085 सालच्या योग्य दिवशी लिफाफा उघडून यामधील मजकूर सिडनीच्या लोकांपर्यंत पोहचवू असे म्हटले आहे. राणी एलिझाबेथ ह्या ऑस्ट्रेलियाची राणीही होत्या. राष्ट्रप्रमुख या नात्याने महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी 16 वेळा ऑस्ट्रेलियाला भेट दिली.
ऑस्ट्रेलियामध्येही झाले होते जंगी स्वागत
राष्ट्रप्रमुख या नात्याने महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी 16 वेळा ऑस्ट्रेलियाला भेट दिली होती. प्रत्येक भेटी दरम्यान त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले होते. राणीला ऑस्ट्रोलियाच्या राष्ट्रप्रमुख या पदावरुन हटवायचे की नाही, याबाबत सार्वमत घेण्यात आले होते. पण तो प्रस्ताव बारगळल्याचे अल्बनीज यांनी सांगितले आहे.