US strike Afghanistan: ड्रोन स्ट्राईकमध्ये अल कायदाचा दहशतवादी अल जवाहिरी ठार; अमेरिकेची अफगाणिस्तानात मोठी कारवाई

US strike Afghanistan: संयुक्त राज्य अफगाणिस्तानात अलकायदाने एक महत्त्वपूर्ण लक्ष्य म्हणून दहशतवाद विरोधी अभियान हाती घेतलं. ऑपरेशन यशस्वी ठरलं. या हल्ल्यात एकाही नागरिकाला काहीही झालं नाही. शेरपूरच्या एका घराला रॉकेटद्वारा लक्ष्य करण्यात आलं.

US strike Afghanistan: ड्रोन स्ट्राईकमध्ये अल कायदाचा दहशतवादी अल जवाहिरी ठार; अमेरिकेची अफगाणिस्तानात मोठी कारवाई
ड्रोन स्ट्राईकमध्ये अल कायदाचा दहशतवादी अल जवाहिरी ठार; अमेरिकेची अफगाणिस्तानात मोठी कारवाई Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 02, 2022 | 6:52 AM

वॉशिंग्टन: अमेरिकेने अफगाणिस्तानात (US strike Afghanistan) घुसून सर्वात मोठी कारवाई केली आहे. सीआयएच्या (CIA) ड्रोन हल्ल्यात अल कायदाचा दहशतवादी अल जवाहिरीला (Ayman al-Zawahiri) ठार मारण्यात आलं आहे. अमेरिका मीडियाच्या आऊटलेट्सनेही माहिती दिली आहे. अफगाणिस्तानात अमेरिकेने ड्रोन स्ट्राईक करून मोठी कारवाई केल्याची घोषणा व्हाईट्स हाऊसने केल्याचं अमेरिका मीडियाच्या आऊटलेट्सने म्हटलं आहे. आहे. ओसामा बिन लादेन याला मारल्यानंतरची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचा दावा अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. तसेच या कारवाईमुळे दहशतवादी संघटनांना मोठा दणका देण्यात आला आहे. अल जवाहिरीवर अमेरिकेने 25 मिलियन डॉलरचं बक्षिस ठेवलं होतं. दरम्यान, व्हाईट हाऊसने अफगाणिस्तानात एक लक्ष्य पूर्ण करण्यात आल्याचा दावा केला असला तरी अमेरिकन सरकारने जवाहिरीला मारल्याचा कोणताही दावा केलेला नाही.

राष्ट्रपती जो बायडन हे अफगाणिस्तानात अल कायदाच्या विरोधातील दहशतवाद विरोधी अभियानाबाबत संध्याकाळी 7.30 वाजता माहिती देतील, असं व्हाइटस हाऊसने म्हटलं आहे. इजिप्तमधील डॉक्टर आणि सर्जन अयमान अल जवाहिरीने 11 सप्टेंबर 2001च्या हल्ल्यात समन्वय साधण्यासाठी मदत केली होती. त्यावेळी चार विमानांचं अपहरण करण्यात आलं होतं आणि न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवरवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात तीन हजार लोक मारले गेले होते. त्याचाच बदला घेण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये घुसून सीआयएद्वारे ड्रोन हल्ला केला आहे.

हे सुद्धा वाचा

अमेरिकेचं अभियान यशस्वी

संयुक्त राज्य अफगाणिस्तानात अलकायदाने एक महत्त्वपूर्ण लक्ष्य म्हणून दहशतवाद विरोधी अभियान हाती घेतलं. ऑपरेशन यशस्वी ठरलं. या हल्ल्यात एकाही नागरिकाला काहीही झालं नाही. शेरपूरच्या एका घराला रॉकेटद्वारा लक्ष्य करण्यात आलं. हे घर रिकामे असल्याने कोणतंही मोठं नुकसान झालं नाही, असं अफगाणिस्तानच्या गृहमंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल नफी ताकोर यांनी सांगितलं. तर, तालिबानच्याच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी काबुलवरून कमीत कमी एक ड्रोन उडाल्याची माहिती मिळाली होती.

जवाहिरीच्या कारवाया

रिवॉर्डस फॉर जस्टिस वेबसाइटच्या मते, जवाहिरीने वरिष्ठ अलकायदा सदस्यांच्या साथीने यमनमध्ये अमेरिकेच्या कोल नौसैनिक पोतवर 12 ऑक्टोबर 2000 रोजी हल्ल्याचं षडयंत्र रचलं होतं. या हल्ल्यात 17 अमेरिकन नाविक ठार झाले होते. या हल्ल्यात 30हून अधिकजण जखमी झाले होते. 7 ऑगस्ट 1998मध्ये केनिया आणि तंजानियामध्ये अमेरिकन दूतावासावर झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी अल जवाहिरीला दोषी ठरवण्यात आलं होतं. या हल्ल्यात 224 लोक मारले गेले होते. तसेच 5,000 हून अधिक लोक जखमी झाले होते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.