इस्रायल विरोधात एकवटले जगातील सगळे मुस्लीम देश, बोलवली तातडीची बैठक

जगभरातील मुस्लीम देश आता इस्रायलच्या विरोधात एकवटू लागले आहेत. हमास विरोधात इस्रायलने हल्ले वाढवल्यानंतर आता मुस्लीम देशांची संघटना असलेल्या ओआयसीची तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. सौदा अरेबियाने ही बैठक बोलावली आहे.

इस्रायल विरोधात एकवटले जगातील सगळे मुस्लीम देश, बोलवली तातडीची बैठक
Israel-Hamas war
Follow us
| Updated on: Oct 18, 2023 | 1:36 PM

Israel Hamas War : इस्रायल आणि हमास या दहशतवादी संघटनेत गेल्या 11 दिवसांपासून संघर्ष सुरु आहे. या संघर्षामुळे जगातील देश दोन गटात वाटले गेले आहेत. पण जगभरातील मुस्लीम देश इस्रायलच्या विरोधात एकत्र येताना दिसत आहेत. गाझावर इस्रायलकडून जोरदार हल्ले सुरु आहेत. हमासचा नायनाट करण्याची शपथ इस्रायलच्या पंतप्रधानांनी घेतली आहे. अशात सौदी अरेबियाने ओआयसीची तातडीची बैठक बोलावली आहे. ज्यामध्ये ५७ इस्लामिक देशांचा समावेश आहे. सौदी अरेबियाच्या विनंतीवरून ही बैठक बोलावण्यात आली आहे.

जेद्दाह येथे होत असलेल्या या बैठकीत इस्रायलकडून गाझामध्ये होत असलेल्या हल्ल्यांबाबत चर्चा होणार आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने संपूर्ण गाझा उद्ध्वस्त करण्यासाठी हल्ले सुरु केले आहे. यासाठी त्यांनी आधी नागरिकांना गाझा सोडून जाणाच्या सुचना ही केल्या होत्या. OIC ने मात्र याचा निषेध केला आहे.

ओआयसीने इस्रायलला जबाबदार धरले

ओआयसीने या युद्धासाठी इस्रायलला जबाबदार धरले आहे. 57 इस्लामिक देशांच्या या संघटनेने म्हटले होते की, इस्रायलने पॅलेस्टाईनमधील लोकांवर होणारे हल्ले त्वरित थांबवावे. आंतरराष्ट्रीय समुदायाने यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायल पूर्णपणे अस्वस्थ झाले आहे. इस्रायली सैन्य गाझामध्ये तळ ठोकून आहे. पीएम नेतन्याहू म्हणाले की, हमासने युद्ध सुरू केले पण ते आम्ही संपवू.

मुस्लिमांना कोणीही रोखू शकत नाही.

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांनी इस्रायलला इशारा दिला आहे. इस्रायलने गाझावर असेच हल्ले सुरू ठेवले तर जगातील मुस्लिमांना कोणीही रोखू शकणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. गाझावर बॉम्बफेक त्वरित थांबली पाहिजे. गाझामधील पॅलेस्टिनींवर त्यांच्या गुन्ह्यांसाठी खटला चालवला गेला पाहिजे, असे ते म्हणाले.

11 दिवसापासून युद्ध सुरु

इस्रायल आणि हमासमध्ये गेल्या 11 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. 7 ऑक्टोबरला पहाटे हमासने इस्रायलवर पाच हजार रॉकेटने हल्ला केला होता. इस्रायलकडूनही मग प्रत्युत्तराची कारवाई करण्यात आली. गाझामधील हमासच्या ठिकाणांवर जोरदार बॉम्बफेक करण्यात आली. इस्रायलमध्ये हमासच्या हल्ल्यात आतापर्यंत 1400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर गाझामध्ये 3000 हून अधिक लोक मारले गेले आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.