Israel-Hamas War | मोठी बातमी, गाझा पट्टीतील युद्धात थेट उतरणार अमेरिका
Israel-Hamas War | आता अशी बातमी आहे की, अमेरिका थेट या युद्धात उतरणार आहे. अमेरिकेच कुठल युनिट इस्रायलमध्ये आहे? त्यांनी आतापर्यंत कोणा-कोणाला संपवलय जाणून घ्या. इस्रायल-हमास युद्धाचा आज 14 वा दिवस आहे. इस्रायलकडून हवाई हल्ले सुरुच आहेत.
जेरुसलेम : गाझा पट्टीत युद्ध सुरु आहे. सध्या फक्त या युद्धाच स्वरुप हवाई हल्ल्यापुरता मर्यादीत आहे. इस्रायल हमास विरोधात आक्रमक आहे. इस्रायली सैन्य गाझा पट्टीत घुसल्यानंतर खऱ्या घनघोर युद्धाला सुरुवात होईल. इस्रायलवर एकाचवेळी अनेक बाजूंनी आक्रमण होऊ शकते, ही शक्यता लक्षात घेऊन अमेरिकेने गेराल्ड फोर्ड ही शक्तीशाली युद्धनौका भूमध्य सागरात पाठवली आहे. खास इस्रायलच्या मदतीसाठी ही युद्धनौका आली आहे. सुरुवातीला असं वाटत होतं की, अमेरिकन नौदल कुठला तिसरा देशमध्ये पडला तर भूमिका घेईल. पण आता अशी बातमी आहे की, अमेरिका थेट या युद्धात उतरणार आहे. हमास विरोधात लढताना इस्रायली सैन्याच्या मदतीसाठी अमेरिकेची सर्वात घातक ‘डेल्टा फोर्स’ सोबत असेल. सोशल मीडियावर डेल्टा फोर्सचा फोटो व्हायरल झालाय.
इस्रायलमधील डेल्टा फोर्सचा फोटो व्हायरल झाल्याने अमेरिकेची चांगलीच पंचाईत झाली आहे, अमेरिका या युद्धात थेट हस्तक्षेप करणार नाही, असं म्हटलं जात होतं. डेल्टा फोर्सने आतापर्यंत अनेक घातक ऑपरेशन्स केली आहेत. ओसामा बिन लादेनला मारण्यापासून ते सद्दाम हुसैनला पकडण्यापर्यंत डेल्टा फोर्सचा सहभाग होता, अफगाणिस्तानात तालिबान विरोधातही डेल्टा फोर्सने अनेक ऑपरेशन्स केली आहेत. इस्रायली सैन्य, रणगाडे गाझा पट्टीजवळ तैनात आहेत. फक्त ‘आक्रमण’ या एका आदेशाची ते वाट पाहतायत. इस्रायलच्या राजकीय नेतृत्वाने अजून हिरवा कंदिल दाखवलेला नाही, आदेश येताच कुठल्याही क्षणी इस्रायली सैन्य गाझामध्ये घुसेल. युद्ध लांबणीवर जाण्यामागच कारण काय?
गाझा पट्टीतून हमासच्या दहशतवाद्यांचा समूळ नायनाट करायचा हा संकल्प इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी केलाय. इस्रायलने याआधी सुद्धा गाझा पट्टी ताब्यात घेतली होती. यावेळी आव्हान थोडी वेगळी असली, तरी इस्रायली सैन्याची ताकत प्रचंड आहे. त्यामुळे ते निश्चित विजयी होतील. फक्त त्यांना काही ठिकाणी संघर्ष करावा लागेल. हमासच्या दहशतवाद्यांच्या ताब्यात असलेल्या इस्रायली बंधकांची अजून सुटका झालेली नाही. हे सुद्धा प्रत्यक्ष जमिनीवरील कारवाई लांबणीवर जाण्यामागे एक कारण असू शकते.