Israel-Hamas war: अमेरिकेने इस्रायलसाठी खुला केला आपला खजिना, मुस्लीम देश संकटात

Israel-hamas war : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धाचा आज २७ वा दिवस आहे. आतापर्यंत हजारो लोकं या संघर्षात मारली गेली आहेत. इस्रायलला अमेरिकेचा पाठिंबा आहे. तर अरब देश पॅलेस्टिनच्या बाजुने उभे राहिले आहेत.

Israel-Hamas war: अमेरिकेने इस्रायलसाठी खुला केला आपला खजिना, मुस्लीम देश संकटात
US president help israel
Follow us
| Updated on: Nov 03, 2023 | 1:12 PM

Israel-Hamas War : हमास दहशतवादी संघटना आणि इस्रायलमध्ये सुरु असलेल्या संघर्षात अमेरिकेने आता महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. हमासचा खात्मा केल्याशिवाय युद्ध संपणार नाही अशी घोषणा आधीच इस्रायलच्या पंतप्रधानांनी केली आहे. त्यात आता अमेरिकेने ही भर घातली आहे. हमासच्या दहशतवाद्यांना खात्मा करण्यासाठी अमेरिकेने आपला खजिनाच इस्रायलसाठी खुला केला आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे इस्रायलविरोधी मुस्लीम देशांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. पाकिस्तानच्या एकूण जेवढं संरक्षण बजेट आहे त्याच्या दुप्पट निधी अमेरिकेने इस्रायलला दिला आहे. इस्रायलला 14.5 अब्ज डॉलरची लष्करी मदत अमेरिकेने घोषित केली आहे.

अमेरिकेचा इस्रायलला भक्कम पाठिंबा

अमेरिका सुरुवातीपासूनच इस्रायलच्या पाठी उभी आहे. हमास या दहशतवादी संघटनेला पाठिंबा देणाऱ्या देशांना युद्धात न उतरण्याचा इशारा आधीच अमेरिकेने दिला आहे. अन्यथा अमेरिका पण युद्धात उतरेल असं अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेच्या भक्कम पाठिंब्यामुळे इस्रायलची ताकद वाढली आहे.

हमास आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरु झाल्यापासून अनेक देशांच्या चिंता वाढल्या आहेत. अनेक देशांनी युद्धाला विराम  देण्याचं आवाहन केले आहे. इस्रायल मात्र हमासला संपवण्यासाठी सतत गाझावर हल्ले करुन हमासच्या ठिकाणांना उद्धवस्त करत आहे. आतापर्यंत इस्रायलने हमासचे अनेक दहशतवादी ठार केले आहेत. हमासने २०० हून अधिक जणांना ओलिस ठेवले आहे.

इस्रायली सैन्याने गाझाला घेरले

इस्रायली लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हगरी यांनी सांगितले की, इस्रायली सैन्याने गाझाला चारही बाजूंनी वेढा घातला आहे. हमासच्या दहशतवाद्यांचा खात्मा करणे आणि ओलीसांची सुटका करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. गाझा हमासपासून मुक्त होईपर्यंत आमची लष्करी मोहीम सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

इस्रायलने युद्धविराम देण्यास नकार दिला आहे. अरब देश युद्धबंदीसाठी इस्रायलवर दबाव टाकत आहेत. पण इस्रायलकडून त्याला कोणताही प्रतिसाद दिला जात नाहीये. हमासला फक्त ज्यूंना संपवायचं आहे. त्यामुळे ते कोणत्याही परिस्थितीत हमासला संपवल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका इस्रायलने घेतली आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.