डोनाल्ड ट्रम्प भारत-चीन सीमावादात मध्यस्थीसाठी इच्छुक
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-चीन सीमावादात (America President Donald Trump) मध्यस्थी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
मुंबई : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-चीन सीमावादात (America President Donald Trump) मध्यस्थी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करुन आपली इच्छा व्यक्त केली. अमेरिका भारत-चीन सीमा वादाच्या मुद्द्यावर मध्यस्थी करण्यास तयार आहे, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत (America President Donald Trump).
“अमेरिका सीमा वादाचा प्रश्न सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्यास तयार आहे. याबाबत भारत आणि चीन या दोन्ही देशांना माहिती देण्यात आली आहे”, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.
We have informed both India and China that the United States is ready, willing and able to mediate or arbitrate their now raging border dispute. Thank you!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) May 27, 2020
काही दिवसांपूर्वी लडाखमध्ये चिनी आणि भारतीय सैनिक आमनेसामने आले होते. त्यामुळे सीमाभागात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, हा वाद लगेच निवळला होता. त्यानंतरही चीनकडून कुरापत्या सुरुच आहेत. चीनकडून सीमा परिसरात सैनिकांची संख्या वाढवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे भारतीय सैन्य देखील सतर्क झालं आहे.
चीनसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर काल (26 मे) पंतप्रधान कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत नियंत्रण रेषा परिसरात वास्तविक काय परिस्थिती आहे? यावर चर्चा झाली. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, तिन्ही दलाचे प्रमुख, तसेच सीडीएस जनरल बिपिन रावत आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या बैठकीत मोदींनी संपूर्ण आढावा घेतला.
पंतप्रधान मोदींनी सीडीएस बिपिन रावत, तिन्ही सेनाप्रमुख यांच्याकडून ब्ल्यू प्रिंट मागितली आहे. दरम्यान, केंद्र सरकारकडून लडाखच्या सीमेजवळ सुरु असलेलं रस्ते बांधकामाचं काम बंद केलं जाणार नाही, असादेखील निर्णय घेण्यात आला आह.
युद्धासाठी सज्ज राहा, चीनच्या अध्यक्षांचे सैन्याला आदेश
कोरोनामुळे जगभरात चीनविरोधात संताप वाढत चालला आहे. भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांसोबत चीनचे संबंध ताणले गेले आहेत. भारताच्या लडाख सीमेवर चीनकडून कुरापत्या सुरु आहेत. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याकडून सैन्याला युद्ध सज्जतेचा इशारा देण्यात आला आहे.
चिनी सेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संबोधित करताना जिनपिंग यांनी तैवान प्रदेशावरुन अमेरिका आणि चीन यांच्यात वाढलेल्या तणावावरही भाष्य केलं. “कोरोनामुळे संपूर्ण जगात चीनबाबत रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे चिनी सैन्याने सर्वात वाईट परिस्थिती आहे, अशी कल्पना करावी. त्याबाबत विचार करावा आणि तयारी करावी. सैन्याने प्रशिक्षणाचं काम वाढवावं. देशाच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी युद्धासाठी तयार राहा”, असं जिनपिंग यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा :
कोरोना संकट गेल्यावर मैदानात या आणि सरकार पाडून दाखवा, गुलाबराव पाटलांचं भाजपला आव्हान
देवेंद्र फडणवीसांच्या प्रत्येक दाव्याला अनिल परब यांचं प्रत्युत्तर
चिडलेल्या रेल्वेमंत्र्यांनी एकदम 152 ट्रेन उलट-सुटल सोडल्या, सरकारच्या बदनामीचा प्रयत्न : अनिल परब
सरकारच्या फेकाफेकीचा पर्दाफाश आम्हाला करावाच लागेल : देवेंद्र फडणवीस