USS Gerald R Ford | ही नुसती युद्धनौका नाही, समुद्रावरच रणांगण, भयानक क्षमता, वाट्याला जाईल त्याचा दुर्देवी शेवट

USS Gerald R Ford | इस्रायलने USS गेराल्ड फोर्ड वापरलं, तर काय भयानक घडेल, ते फक्त 5 पॉइंटमध्ये. भारताच्या INS विक्रांतची क्षमता किती आहे? अमेरिकेने इस्रायलसाठी पाठवलेल्या या युद्धनौकेमध्ये असं काय खास आहे?

USS Gerald R Ford | ही नुसती युद्धनौका नाही, समुद्रावरच रणांगण, भयानक क्षमता, वाट्याला जाईल त्याचा दुर्देवी शेवट
USS Gerald R Ford
Follow us
| Updated on: Oct 12, 2023 | 2:47 PM

जेरुसलेम : अमेरिकेने इस्रायलसाठी जगातील सर्वात मोठ, महागडं आणि हायटेक शस्त्रांनी सज्ज असलेल युद्धजहाज पाठवलय. अमेरिकी प्रशासनाने USS गेराल्ड फोर्ड इस्रायल जवळच्या समुद्रात तैनात केलय. या जहाजाची क्षमता खूप मोठी आहे. त्यामुळे काही मिनिटात गाझा पट्टीत मोठ नुकसान होईल. जवळपास पाच हजार नौसैनिक, 90 फायटर विमानं, हेलिकॉप्टर्सचा ताफा सामावून घेण्याची क्षमता आहे. मिसाइलसह अत्याधुनिक शस्त्रास्त्र या वॉरशिपवर बसवलेली आहेत. शत्रूला सडेतोड प्रत्युत्तर देण्यास हे युद्धजहाज सक्षम आहे. 5 पॉइंट्समध्ये USS गेराल्ड फोर्डची क्षमता, ताकत समजून घ्या.

हायटेक वॉरशिप : USS गेराल्ड फोर्डच्या निर्मितीसाठी 18 अब्ज अमेरिकी डॉलरचा खर्च आलाय. सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल हे अमेरिकेच युद्धजहाज आहे. प्रत्येक बाबतीत USS गेराल्ड फोर्ड जगातील दुसऱ्या कुठल्याही विमानवाहू युद्धनौकेपेक्षा एक पाऊल पुढे आहे. 337 मीटर लांब, 78 मीटर रुंद आणि 76 मीटर ऊंची आहे.

फायटर विमान : USS गेराल्ड फोर्डमध्ये 90 फायटर विमान आणि हॅलिकॉप्टरला सामावून घेण्याची क्षमता आहे. यावर साडेचार हजार अधिकारी आणि कर्मचारी तैनात आहेत. ते आपआपल्या क्षेत्रात पारंगत आहेत. वजन आणि आकारमानात विशालकाय असूनही हे जहाज वेगाने मार्गक्रमण करते. प्रतितास 56 किमी वेग आहे. समुद्री जहाजासाठी हा शानदार स्पीड समजला जातो.

रडार आणि सेंसर : USS गेराल्ड फोर्डवरील अत्याधुनिक शस्त्र शत्रूला कधीही धूळ चारु शकतात. या युद्धजहाजाकडे बॅकअप प्लान नेहमी तयार असतो. याच्या फ्लीटमध्ये क्रूजर आहे. USS गेराल्ड फोर्डला लागणार साहित्य पुरवण्यासाठी अन्य जहाज सुद्धा आहेत. रडार आणि सेंसरमुळे हे जहाज इतरांपेक्षा वेगळ आणि अधिक सुरक्षित आहे. हे जहाज स्वत:साठी लागणारी वीज स्वत:च बनवतं. यात दोन युनिट आहेत.

लढण्याची क्षमता किती दिवस : 90 दिवस लागणार आवश्यक साहित्य या जहाजावर राहू शकत. म्हणजे बाहेरुन कुठल्याही मदतीशिवाय हे जहाज सलग 90 दिवस लढाई लढू शकतं. 2017 साली USS गेराल्ड फोर्ड अमेरिकन नौदलात दाखल झालं. या जहाजाच्या बांधणीला पूर्ण 10 वर्ष लागली. 18 अब्ज अमेरिकन डॉलर खर्च करण्यात आले.

नाव कशावरुन दिलं : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष गेराल्ड आर फोर्ड यांच नाव या जहाजाला देण्यात आलय. फोर्ड यांनी नौदलात काम केलं होतं. म्हणूनच हे अत्याधुनिक जहाज त्यांना समर्पित करण्यात आलय. भारताकडे INS विक्रांत ही सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौका आहे. 262 मीटर लांब, 62 मीटर रुंद आणि 59 मीटर ऊंच आहे. INS विक्रांतवर एकाचवेळी 36 फायटर विमान राहू शकतात. 1650 अधिकारी-कर्मचारी या जहाजावर तैनात आहेत.

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.