Donald Trump : त्या देशाला अमेरिका जगाच्या नकाशावरुन मिटवून टाकेल, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून थेट वॉर्निंग

Donald Trump : . अलीकडेच अमेरिकेत एका प्रचारसभेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न झाला होता. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. दोघे जखमी झाले. त्यावर ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जर, असं झालं नाही, तर अमेरिकी नेते घाबरट समजले जातील' असं ट्रम्प म्हणाले.

Donald Trump : त्या देशाला अमेरिका जगाच्या नकाशावरुन मिटवून टाकेल, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून थेट वॉर्निंग
अमेरिकेतीलच नाही तर जगातील श्रीमंतांच्या यादीत डोनाल्ड ट्रम्प यांचा समावेश आहे. ते एक यशस्वी उद्योगपतीही आहेत. 'ब्लूमबर्ग बिलिअनेअर्स इंडेक्स'च्या जगातील 500 श्रीमंतांच्या यादीत डोनाल्ड ट्रम्प यांचाही समावेश आहे. 2024 मध्ये ट्रम्प यांच्या एकूण संपत्तीत 4 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली. Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 26, 2024 | 11:38 AM

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर काही दिवसांपूर्वी जीवघेणा हल्ला झाला. डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात या प्राणघातक हल्ल्यातून बचावले. त्यांच्या कानाला चाटून गोळी गेली. ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे कोण आहे? हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यामागे इराणच कारस्थान असल्याच अनेक रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. गुरुवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर या विषयी प्रतिक्रिया दिली. ‘इराणने माझी हत्या केली, तर अमेरिकेने इराणला संपवलं पाहिजे’ असं ट्रम्प म्हणाले.

“जर, त्यांनी राष्ट्रपती ट्रम्प यांची हत्या केली, तर अमेरिका इराणला जगाच्या नकाशावरुन मिटवून टाकेल अशी अपेक्षा आहे. जर, असं झालं नाही, तर अमेरिकी नेते घाबरट समजले जातील” असं ट्रम्प म्हणाले. अलीकडेच अमेरिकेत एका प्रचारसभेत ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न झाला होता. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. दोघे जखमी झाले. या हल्ल्यामागे इराण असल्याच अजून स्पष्ट झालेलं नाहीय. इराणने सुद्धा त्यांच्यावर झालेले आरोप फेटाळून लावले आहेत.

त्यानंतर बदल्याची भाषा, धमकी

ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर असताना 2018 मध्ये, त्यांनी माजी राष्ट्रपती ओबामा यांच्या कार्यकाळात इराणबरोबर झालेला JCPAO न्यूक्लियर करार मोडला होता. त्याचा इराणच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. 2020 मध्ये अमेरिकी ड्रोनच्या हल्ल्यात कासिम सुलेमानीची हत्या करण्यात आली. त्यानंतर अमेरिका आणि इराणमधील मतभेद, वाद आणखी वाढले. इराणने सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनातील सदस्यांना अनेक धमक्या दिल्या. जानेवरी 2022 मध्ये इराणचे माजी राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांनी ट्रम्प यांच्याविरोधात इंटरनॅशनल कोर्टमध्ये केस चालवण्याची मागणी केली होती.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.