अमेरिकेत मराठवाड्यापेक्षाही भयंकर दुष्काळ, हवेतून पाणी मिळवण्यासाठी लोकांनी मशिन्स लावल्या !
हवामान बदलामुळे उत्तर आणि दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा दुष्काळ पडला आहे. हवेतून पाणी बनवणाऱ्या मशीन्सची खरेदी मोठ्या संख्येनं होतं आहे.
नवी दिल्ली: अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यामुळे येथील लोक त्यांच्या घरात पाणी बनवण्याची मशीन बसवत आहेत. एपी या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, हवामान बदलामुळे उत्तर आणि दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा दुष्काळ पडला आहे. हवेतून पाणी बनवणाऱ्या मशीन्सची खरेदी मोठ्या संख्येनं होत असून पृथ्वीच्या भविष्याबाबत कसं असणार यासदंर्भात प्रश्न उपस्थित होतं आहेत.
मशीनचं काम कसं चालतं?
ही मशीन्स एअर कंडिशनरप्रमाणे काम करतात. त्याची कॉइल्स हवा थंड करते आणि बेसिनमध्ये पाणी साठवले जाते. टेड बोमन यांनी वॉशिंग्टन येथे या मशीनचं डिझाईन केले. ते म्हणाले की, हवेतून पाणी बनवणे हे एक विज्ञान आहे. या मशीनच्या मदतीने आपण तेच करत आहोत. त्सुनामी प्रॉडक्ट्स कंपनीचे हे उत्पादन सध्या हवेत असलेलल्या आर्द्रतेतून पाणी काढण्यासाठी विकसित करण्यात आलं आहे. मशीनच्या दुसऱ्या मॉडेलमध्ये हवेतील हवेतील ओलावा, सौर ऊर्जा पॅनेल आणि इतर कंटेनर असतात. बोमेन यांनी सांगितले की त्यांच्या कंपनीची मशीन्स हवेतील आर्द्रता काढून टाकतात. त्यातून बाहेर पडणारे पाणी फिल्टर करून पिण्यायोग्य बनवता येते. ही मशीन्स घरे, कार्यालये, पशु फार्म आणि इतर अनेक ठिकाणी वापरली जाऊ शकतात.
दिवसाला किती लीटर पाणी बनवणार
हे तंत्र विशेषतः धुके असलेल्या भागात चांगले कार्य करते. त्यांच्या आकारानुसार ही मशीन्स एका दिवसात 900 ते 8,600 लिटर पाणी बनवू शकतात. ही मशीन्स स्वस्त नाहीत. सुमारे 22 लाख ते 1.5 कोटी रुपये याची किमंतआहे. तरीही कॅलिफोर्नियातील काही लोक त्यांच्या घरांच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते विकत घेत आहेत. कॅलिफोर्नियामधील अनेक भागातील रहिवाशांना जलसंवर्धन करण्यास सांगितले गेले आहे. बेनिशियामध्ये राहणारा डॉन जॉन्सन सांगतो की त्याने सर्वात लहान मशीन खरेदी केली आहे. जॉन्सनला आशा होती की उंच एसी युनिटसारखे हे मशीन त्याच्या बागेला हिरवे ठेवण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करेल. परंतु त्याला आढळले की मशीनने त्याच्या बागेच्या तसेच त्याच्या घरच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे पाणी बनवले आहे. तुम्ही पाण्याच्या बाटल्यांवर किती पैसे खर्च कराल, असं जॉन्सन म्हणतात. हे मशीन तुमच्यासाठी त्यापेक्षा खूप कमी किमतीत पाणी बनवेल. मशीनच्या वर बसवलेले सौर ऊर्जा पॅनेल्स इतकी ऊर्जा निर्माण करतात की मशीन चालवण्यासाठी आणखी ऊर्जा खर्च लागत नाही.
इतर बातम्या:
PHOTO: औरंगाबादेत पुन्हा दाणादाण, मोठ-मोठी झाडं पडली, विजेचे खांब वाकले, कोर्ट परिसरात मोठे नुकसान
American People setup water making from air machine in California check details here