Boycott Maldives | मालदीव बरोबर राडा, जगातील ‘हा’ देश ठामपणे उभा राहिला भारताच्या बाजूने, मोठी घोषणा
Boycott Maldives | मालदीव बरोबर वाद सुरु असताना भारताचा सच्चा मित्र पाठिशी भक्कमपणे उभा राहिलाय. या संपूर्ण वादात भारताच्या बाजूने ठाम भूमिका घेणारा हा जगातील पहिला देश आहे. त्यांनी मालदीवला आरसा दाखवून दिलाय. त्यामुळे चीनच्या प्रेमात असलेल्या मालदीवला वास्तवाच भान येईल.
Boycott Maldives | मालदीवच्या काही मंत्र्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपमानास्द टिप्पणी केली. त्यानंतर खवळलेल्या भारतीयांनी मालदीवला आपली ताकत दाखवून दिली. भारत सरकारने मालदीवला त्यांनी किती मोठी चूक केलीय, याची जाणीव करुन दिली. भारताच्या आक्रमक भूमिकेनंतर अखेर मालदीवला बॅकफूटवर जाव लागलं. मालदीवने लगेचच कारवाई करत तिघांना मंत्रीपदावरुन हटवलं. भारतातील एका प्रसिद्ध ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनीने मालदीवची सर्व फ्लाइट बुकिंग रद्द केली. मालदीवकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरु आहेत. पण त्यात त्यांना यश मिळताना दिसत नाहीय. दरम्यान दुसऱ्याबाजूला मालदीव बरोबरच्या या वादात भारताच्या सच्चा मित्राने आपण भारतासोबत भक्कमपणे उभे आहोत, हा संदेश दिलाय.
भारताच्या या सच्चा मित्राने मालदीवला आरसा दाखवलाय. या वादविवादाच्या काळात भारतासोबत उभा राहिलेला सच्चा मित्र आहे, इस्रायल. त्यांनी मालदीवला एकप्रकारे सत्याची जाणीव करुन दिलीय. इस्रायलने लक्षद्वीपच्या नैसर्गिक सौंदर्याच भरभरुन कौतुक केलय. सोबतच लक्षद्वीपबद्दल इस्रायलने मोठी घोषणा केलीय. या केंद्रशासित प्रदेशात समुद्राच पाणी स्वच्छ करण्याच्या प्रोजेक्टवर काम सुरु करत असल्याची इस्रायलने घोषणा केली आहे.
हे फोटो त्या लोकांसाठी आहेत, जे….
भारतातील इस्रायली दूतावासाने आपल्या X हँडलवर लक्षद्वीपचे काही फोटो शेअर केलेत. “डिसेलिनेशन प्रोजेक्ट सुरु करण्याच्या भारत सरकारच्या विनंतीवरुन आम्ही मागच्यावर्षी लक्षद्वीपला गेलो होतो. इस्रायल या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी तयार आहे. हे फोटो त्या लोकांसाठी आहेत, जे अजूनपर्यंत लक्षद्वीपच सौंदर्य पाहू शकलेले नाहीत. या फोटोंमधून तुम्ही मनमोहक, आकर्षक दृश्य पाहू शकता” असं इस्रायलने X वर म्हटलय.
We were in #Lakshadweep last year upon the federal government’s request to initiate the desalination program.
Israel is ready to commence working on this project tomorrow.
For those who are yet to witness the pristine and majestic underwater beauty of #lakshadweepislands, here… pic.twitter.com/bmfDWdFMEq
— Israel in India (@IsraelinIndia) January 8, 2024
डिसेलिनेशन म्हणजे काय?
लक्षद्वीप एक बेट आहे. तिथे गोड्या पाण्याची समस्या आहे. इस्रायलकडे समुद्राच खार पाणी गोड्या पाण्यामध्ये बदलण्याची टेक्निक आहे, त्याला डिसेलिनेशन म्हणतात. खाऱ्या पाण्यातून खनिज आणि अन्य अशुद्ध घटक बाजूला करुन ते पाणी पिण्यायोग्य बनवलं जातं. इस्रायलला समुद्राने वेढलेलं आहे. तिथेही पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. त्यामुळे त्यांनी ही टेक्नोलॉजी विकसित केलीय.