Israeli diplomat attack in China | मोठी बातमी, चीनमध्ये इस्रायलच्या डिप्लोमॅटवर प्राणाघातक हल्ला
Israeli diplomat attack in China | सध्या इस्रायल आणि हमासमध्ये भीषण युद्ध सुरु आहे. या दरम्यान एक मोठी घटना घडलीय. चीनमध्ये इस्रायली दूतावासाच्या एका अधिकाऱ्यावर भीषण हल्ला झाला आहे.
बीजिंग : सध्या इस्रायल आणि हमासमध्ये भीषण युद्ध सुरु आहे. सगळ्या जगाच लक्ष या गंभीर विषयाकडे लागलं आहे. या दरम्यान चीनमध्ये एक गंभीर घटना घडली आहे. चीनमध्ये इस्रायली डिप्लोमॅटवर प्राणघातक हल्ला झालाय. इस्रायलच्या डिप्लोमॅटिक अधिकाऱ्यावर चाकू हल्ला करण्यात आला आहे. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याची पुष्टि केली. या डिप्लोमॅटला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलय. डिप्लोमॅटची प्रकृती आता स्थिर आहे. बीजिंगमध्ये शुक्रवारी इस्रायली दूतावासाच्या अधिकाऱ्यावर हा हल्ला झाला. हल्ल्याच कारण अजून स्पष्ट नाहीय. याआधी इजिप्तमध्ये इस्रायली पर्यटकांवर एका पोलीस अधिकाऱ्याने फायरिंग केली होती. या गोळीबारात दोन इस्रायली पर्यटक आणि इजिप्तच्या एका नागरिकाचा मृत्यू झाला होता.
इस्रायल आणि हमासमध्ये घनघोर लढाई सुरु असताना चीनमध्ये इस्रायली अधिकाऱ्यावर हा प्राणघातक हल्ला झालाय. पॅलेस्टिनमधील दहशतवादी संघटना हमासने 7 ऑक्टोबरला गाझा पट्टीतून इस्रायलवर हजारो रॉकेट डागले. इतकच नाही, दक्षिण इस्रायलमध्ये घुसून नरसंहार केला. यात 1200 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलने प्रत्युत्तर म्हणून गाझा पट्टीत बॉम्बफेक केली. हमासच्या तळांना लक्ष्य केलं. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात आतापर्यंत 1500 लोकांचा मृत्यू झालाय.
जगाची दोन गटात विभागणी
इस्रायल-हमास युद्धावरुन जगातील अनेक देशांची दोन गटात विभागणी झाली आहे. अमेरिका, ब्रिटेन, फ्रान्स, जर्मनीसह तमाम युरोपियन देश हमासच्या विरोधात आहेत. त्यांनी हमासला दहशतवादी संघटना म्हटलय. इस्रायलच्या कारवाईला त्यांनी योग्य ठरवलय. इराण, सौदी अरेबियासह अरब आणि मुस्लिम देश पॅलेस्टाइनच्या बाजूने आहेत. अमेरिका, ब्रिटेन, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, कॅनडासह युरोपच्या तमाम देशात कुठे पॅलेस्टाइन तर कुठे इस्रायलच्या समर्थनात प्रदर्शन सुरु आहे.