Benjamin Netanyahu : इस्रायलमध्ये राजकारणही जोरात, विरोधी पक्ष नेता सरकारमध्ये, त्याने जे म्हटलं ते महत्त्वाचं

Benjamin Netanyahu : इस्रायल एकाबाजूला अनेक आघाड्यांवर युद्ध लढत आहे. त्याचवेळी इस्रायलमध्ये राजकारणही जोरात चाललय. इस्रायलमध्ये विरोधी पक्षनेताच सरकारमध्ये आल्याची घटना घडली आहे. सरकारमध्ये येताना विरोधी पक्षनेत्याने जे म्हटलय ते महत्त्वाच आहे.

Benjamin Netanyahu : इस्रायलमध्ये राजकारणही जोरात, विरोधी पक्ष नेता सरकारमध्ये, त्याने जे म्हटलं ते महत्त्वाचं
netanyahu-gideon saar
Follow us
| Updated on: Sep 30, 2024 | 1:40 PM

इस्रायल सध्या एकाचवेळी वेगवेगळ्या आघाड्यांवर युद्ध लढत आहे. त्याचवेळी इस्रायलमध्ये राजकारणही जोरात सुरु आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी रविवारी गिदोन सार यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं. ही राजकीय चाल बेंजामिन नेतन्याहू यांच्यासाठी फायद्याची आहे. त्यांच्या सत्तारुढ आघाडीचा यामुळे विस्तार होणार आहे. नेतन्याहू यांना आपली सत्तेची खुर्ची टिकवण्यासाठी मदत मिळणार आहे. पंतप्रधान नेतन्याहू यांनी यावेळी गिदोन सार यांच्या क्षमतेच कौतुक केलं. गिदोन सार हे विरोधी पक्षाचे नेते होते. ते न्यू होप पार्टीमध्ये आहेत. आपल्या निर्णयाच समर्थन करताना गिदोन सार म्हणाले की, “देश सध्या ज्या स्थितीशी झुंजतोय, त्यामध्ये देश भक्तीची हीच योग्य वेळ आहे”

जे ठरलय त्यानुसार सार यांना सुरक्षा कॅबिनेटमध्ये स्थान दिलं जाई असं नेतन्याहू म्हणाले. नेतन्याहू यांचे दुसरे स्पर्धक संरक्षण मंत्री योआव गॅलेंट यांची जागा मिळेल असं सार यांना अपेक्षा होती. पण संरक्षण मंत्री बनण्याच त्यांचं स्वप्न भंगलं आहे. गिदोन सार यांनी सरकारमध्ये सहभागी करुन घेतल्याबद्दल नेतन्याहू यांचे आभार मानले.

हा विरोधी पक्ष नेता काय म्हणाला?

अनुभव आणि योग्यतेच्या आधारावर सरकारच्या कामात योगदान देण्याची इच्छा गिदोन सार यांनी व्यक्त केली होती. देशभक्ती दाखवण्याची हीच योग्य वेळ आहे असं ते म्हणाले. मी मंत्री न बनताच सरकारमध्ये सहभागी होतोय असं गिदोन सार म्हणाले. गिदोन सार यांच्यानुसार संरक्षण मंत्रालयाचा प्रस्ताव होता, पण त्यांनी नकार दिला.

‘देशभक्तीची हीच योग्यवेळ’

सार यांनी इस्रायलच्या एकतेवर भर दिला. वर्तमान स्थितीत सरकार आणि जनतेची एकता मजबूत करणं आवश्यक आहे. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये गिदोन सार यांनी म्हटलय की, “इस्रायलच्या दृष्टीने हे ऐतिहासिक दिवस आहेत. आमच्या शत्रुंच्या दृष्टीने हे निर्णायक दिवस आहेत. यावेळी इस्रायलच्या सरकारला भक्कम करणं आवश्यक आहे. देशभक्तीची हीच योग्यवेळ आहे”

‘ते एक सभ्य गृहस्थ’

नेतन्याहू यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्याच्या सार यांच्या निर्णयावर विरोधी पक्ष खवळला आहे. विरोधी पक्षनेते यायर लॅपिड यांनी एक्सवर लिहिलय की, “हे पाहणं खूप कठीण आहे, इतिहासातील सर्वात खराब सरकार कशा प्रकारे देशातील सर्वात चांगल्या लोकांना नष्ट करत आहे. सार यांना आपला आत्मसम्मानाचा त्याग करताना पाहणं सुद्धा कठीण आहे. कारण ते एक सभ्य गृहस्थ आहेत”

'काय ही विद्यार्थ्यांची चेष्टा', विरोधकांच्या टीकेवर केसकरांचं उत्तर
'काय ही विद्यार्थ्यांची चेष्टा', विरोधकांच्या टीकेवर केसकरांचं उत्तर.
नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यावरून शिंदेंच्या मंत्र्याचा निशाणा
नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यावरून शिंदेंच्या मंत्र्याचा निशाणा.
'लाडक्या बहिणी'चे पैसे हडप, 'त्यानं' 33 जणांचं वापरलं आधारकार्ड अन्...
'लाडक्या बहिणी'चे पैसे हडप, 'त्यानं' 33 जणांचं वापरलं आधारकार्ड अन्....
देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय शरद पवारांची तुतारी हाती घेणार?
देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय शरद पवारांची तुतारी हाती घेणार?.
अजित दादांचे दोन बडे नेते पवारांच्या भेटीला, राजकारणात मोठे बदल होणार?
अजित दादांचे दोन बडे नेते पवारांच्या भेटीला, राजकारणात मोठे बदल होणार?.
जरांगेंची मोठी घोषणा; नारायण गडावर दसऱ्याच्या दिवशी मी भक्त म्हणून...
जरांगेंची मोठी घोषणा; नारायण गडावर दसऱ्याच्या दिवशी मी भक्त म्हणून....
दादांच्या आमदाराने महिला अधिकाऱ्याला दिली निपटविण्याची धमकी, ऐका ऑडिओ
दादांच्या आमदाराने महिला अधिकाऱ्याला दिली निपटविण्याची धमकी, ऐका ऑडिओ.
'शासनाच्या भरोशावर राहू नका, शासन विषकन्या असते'; गडकरी काय म्हणाले?
'शासनाच्या भरोशावर राहू नका, शासन विषकन्या असते'; गडकरी काय म्हणाले?.
'हिंदू अंत करतील, वाकड्या नजरेनं...', नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य
'हिंदू अंत करतील, वाकड्या नजरेनं...', नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य.
पाहिल्याची बाही दुसऱ्याच्या शर्टाला, दुसऱ्याचा...दानवेंची सरकारवर टीका
पाहिल्याची बाही दुसऱ्याच्या शर्टाला, दुसऱ्याचा...दानवेंची सरकारवर टीका.