ऑनलाईन ऑर्डरमध्ये वाढ, लॉकडाऊनदरम्यान अमेझॉनकडून 75 हजार नोकऱ्या
कोरोना विषाणूने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत (Amazone recruitment during lockdown) आहे.
मुंबई : कोरोना विषाणूने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत (Amazone recruitment during lockdown) आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जगभरात कोट्यवधी नोकऱ्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच दरम्यान ऑनलाईन ई-कॉमर्स वेबसाईट कंपनी अमेझॉनने नोकऱ्या देण्याचा निर्णय घेतला आहे. अमेझॉनकडून 75 हजार जागांसाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये वेअरहाऊस ते स्टाफ, डिलिव्हरी बॉय ते ड्रायव्हरपर्यंत अनेक पदासाठी भरती केली (Amazone recruitment during lockdown) जाणार आहे.
ऑनलाईन ऑर्डरमध्ये वाढ
अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे सर्व लोक घरात बसले आहेत. त्यामुळे ऑनलाईन ऑर्डरमध्ये वाढ झाली आहे. अजून काही दिवस क्वारंटाईन राहावे लागू शकते. त्यामुळे अनेकांनी आपली दुकानं उघडली नाहीत. त्यामुळे अमेझॉनकडून खाण्या-पिण्याच्या आणि आरोग्य संबंधित वस्तूंचा साठा करण्यात आला आहे. त्यासोबत अमेझॉनच्या स्टोरमध्ये डिलिव्हरी बॉयची गरज आहे. त्यामुळे अमेझॉन नवीन भरती करणार आहे.
नवीन भरती करणे हे अमेझॉनसाठी एक मोठे संकट आहे. कारण अमेझॉनच्या वेअरहाऊसमध्ये आतापर्यंत अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
“आम्ही अमेरिका आणि यूरोपमधील सर्व वेअरहाऊसमध्ये कर्मचाऱ्यांना मास्क दिले आहे. तसेच कर्मचाऱ्यांचे तापमान चेक करत आहे. काही निवडक अधिकाऱ्यांनी कंपनीला आपले वेअरहाऊस बंद करण्यास सांगितले आहे”, असं अमेझॉनने सांगितले.
प्रति तास अधिक वेतन मिळणार
बेरोजगारी वाढत असल्यामुळे अमेझॉनकडून हा गॅप भरला जात आहे. नवीन कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने 15 डॉलर प्रति तास यामध्ये आता कमीत कमी 2 डॉलरची वाढ करण्याच निर्णय घेतला आहे. एप्रिलपासून हा निर्णय लागू झाला आहे.