जगात एक बेट असं आहे जिथे फक्त 20 लोकंच राहतात. ग्रिमसे असं या बेटाचं नाव आहे. Grimsey हे बेट फक्त 6.5 चौरस किलोमीटरमध्ये पसरले आहे. आइसलँडच्या उत्तरेकडील किनारपट्टीपासून ते सुमारे 40 किलोमीटर अंतरावर आहे. आर्क्टिक सर्कलमध्ये येणारा हा एकमेव भाग आहे.
ग्रिमसे येथे एकही रुग्णालय, डॉक्टर किंवा पोलीस ठाणे नाही. दर तिसऱ्या आठवड्यात एक डॉक्टर येथे विमानाने येतो आणि इथल्या लोकांची तपासणी करतो. सुरक्षेच्या बाबतीत तटरक्षक दल आणि आपत्कालीन सेवांनी यांनी आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय करावे यासाठी या बेटावर राहणाऱ्या लोकांना प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत हे लोकं स्वतःहून त्या आव्हानांना सामोरे जातात.
विजेसाठी जनरेटर
बेटावर एक रेस्टॉरंट, बार, स्विमिंग पूल, लायब्ररी, चर्च आणि एअरस्ट्रिप आहे. याशिवाय एक किराणा दुकान देखील आहे. ते दररोज एक तास सुरू असते. ग्रिमसे बेट खूपच दुर्गम आहे. येथे विद्युत वाहिनी पोहोचलेली नाही. संपूर्ण बेट डिझेल जनरेटरवर चालते.
प्रत्येक ऋतूची वेगळी मजा
हवामानाच्या दृष्टीने आणि सागरी पक्ष्यांसाठी हे बेट प्रेक्षणीय आहे. याबाबतीत या बेटाची समृद्धता पाहण्यासारखी आहे. प्रत्येक ऋतूत येथे वेगळा अनुभव मिळतो. हिवाळ्यात अंधाराबरोबरच वादळे येतात. येथे वसंत ऋतुमध्ये दिवे आणि पक्षी येतात.
पक्षी पाहायला आवडतात अशा लोकांसाठी हे बेट म्हणजे एक मोठा खजिना आहे. कारण येथे लाखो सागरी पक्षी येतात. एका सर्वेक्षणानुसार येथे प्रति व्यक्तीमागे 50 हजार पक्षी आहेत. या बाबतीत इथले लोक खूप श्रीमंत आहेत.
पण काही समुद्री पक्षी थोडे धोकादायक देखील आहेत. तुम्ही जर त्यांच्या घरट्या जवळ गेलात तर ते तुमच्यावर हल्ला करतात. आर्क्टिक टर्न याबाबत आक्रमक असतात.
घोडे आणि मेंढ्या
याशिवाय येथे आइसलँडिक घोडे आणि मेंढ्या देखील दिसतात. त्यामुळे येथे पर्यटकही येतात. बहुतेक लोकं येथे नैसर्गिक दृश्ये आणि समुद्री पक्षी पाहण्यासाठी येत असतात.
पृथ्वी 23.5 अंशांने झुकत असल्यामुळे, आर्क्टिक सर्कल येथे दरवर्षी थोडेसे बदलते. हा बदल पाहण्यासाठी येथे एक वर्तुळ आहे जे दरवर्षी सुमारे 14 मीटरने सरकते, परंतु काहीवेळा ते 130 मीटरपर्यंत देखील सरकले आहे.