NASA च्या चांद्रमोहिमेतील 10 अंतराळवीरांमध्ये भारतीय वंशाच्या अनिल मेनन यांचा समावेश, कोण आहेत मेनन?
NASA ने महत्वाकांक्षी मिशनसाठी 10 अंतराळवीरांची निवड केली आहे. यात अमेरिकी वायुसेनामध्ये लेफ्टनंट कर्नल आणि स्पेसएक्सचे पहिले फ्लाईट सर्जन भारतीय वंशाचे अनिल मेनन यांचाही सहभाग आहे.मिनेसोटाच्या मिनीपोलिस मध्ये जन्न झालेले मेनन हे 2018 मध्ये एलन मस्कच्या अंतरिक्ष कंपनी स्पेसएक्सचा भाग राहिले आहेत
मुंबई : अमेरिकेतील अंतराळ संस्था NASA ने महत्वाकांक्षी मिशनसाठी 10 अंतराळवीरांची (Astronaut) निवड केली आहे. यात अमेरिकी वायुसेनामध्ये लेफ्टनंट कर्नल आणि स्पेसएक्सचे पहिले फ्लाईट सर्जन भारतीय वंशाचे अनिल मेनन (Anil Menon) यांचाही सहभाग आहे.मिनेसोटाच्या मिनीपोलिस मध्ये जन्न झालेले मेनन हे 2018 मध्ये एलन मस्कच्या अंतरिक्ष कंपनी स्पेसएक्सचा (SpaceX) भाग राहिले आहेत. तसंच डेमो-2 अभियानादरम्यान मानवाला अंतराळात पाठवण्याच्या मिशनमध्ये मदत केली होती. इतकंच नाही तर भविष्यातील अभियानांसाठी मानव प्रणालीची मदत करणाच्या चिकित्सा संघटनेची निर्मितीही त्यांनी केली.
अनिल मेनन हे पोलिओ लसीकरणाचा अभ्यास आणि समर्थनासाठी रोटरी एम्बेसेडर म्हणून भारतात एक वर्ष वास्तव्यालाही होते. यापूर्वी 2014 मध्ये ते NASA सोबत जोडले गेले. NASA चे विविध अभियानात फ्लाईट सर्जनची भूमिका साकारत त्यांनी अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर (आयएसएस) पोहोचवलं. 2010 मध्ये हैती तर 2015 मध्ये नेपाळमधील भूकंपादरम्यान, तसंच 2011 मध्ये रेनो एअर शो दुर्घटनेवेळी मेनन यांनी एक चिकित्सक म्हणून पहिली प्रतिक्रिया दिली होती.
#TRISH congratulates @NASA_Astronauts‘s 2021 astronaut candidate class, including former #TRISH PI Anil Menon!
We are excited to see the work each member will do to further human space exploration! (Photo/@NASA) https://t.co/blIDYMiWNL pic.twitter.com/OVW8XI5ePI
— Translational Research Institute for Space Health (@BCMSpaceHealth) December 6, 2021
जानेवारी 2022 मध्ये आंतराळवीर म्हणून प्रशिक्षणाला सुरुवात होणार
वायुसेनेत मेनन यांनी फ्लाईट सर्जन म्हणून 45 वी स्पेस विंग आणि 173 वी फ्लाईट विंगमध्ये सेवा दिली आहे. ते 100 पेक्षा अधिक उड्डाणात सहभागी झाले. तसंच क्रिटिकल केयर एयर ट्रान्सपोर्ट टीमचा भाग बनून त्यांनी अनेक रुग्णांची वाहतूक केली. जानेवारी 2022 मध्ये आंतराळवीर म्हणून प्रशिक्षणाला सुरुवात ते करतील. हे प्रशिक्षण 2 वर्षांपर्यंत चालेल.
NASA announces the 2021 class of 10 astronaut candidates:
Nichole Ayers Marcos Berríos Christina Birch Deniz Burnham Luke Delaney Andre Douglas Jack Hathaway Anil Menon Christopher Williams Jessica Wittner pic.twitter.com/AoWIqMDEKk
— Michael Sheetz (@thesheetztweetz) December 6, 2021
आता हे आर्टेमिस जनरेशन आहे – बिल नेल्सन
NASA मे सोमवारी आपल्या अंतराळवीरांच्या नव्या श्रेणीची घोषणा केली. यात सहा पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे. मार्च 2020 मध्ये 12 हजार जणांनी यासाठी अर्ज सादर केला होता. हे अंतराळवीर आर्टेमिस जनरेशनचा हिस्सा असतील. हे नावही NASA च्या आर्टेमिस कार्यक्रमाने प्रेरित आहे. यानुसार पहिली महिला आणि पुरुषाला 2025 च्या सुरुवातीला चंद्रावर पाठवण्याची योजना आहे. NASA चे प्रशासक बिल नेल्सन यांनी एका समारोहावेळी भावी अंतराळवीरांचं स्वागत केलं. तसंच अपोलो जनरेशनन खूप काही केलं. आता हे आर्टेमिस जनरेशन आहे, असं नेल्सन म्हणाले.
इतर बातम्या :