भारतातून पाकिस्तानला गेलेल्या अंजूचा मोठा निर्णय, इस्लाम धर्म स्वीकारला आणि…

| Updated on: Jul 25, 2023 | 5:39 PM

भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजू हिच्याविषयी मोठी बातमी समोर आली आहे. अंजू ही आपल्या एका फेसबुक फ्रेंडला भेटण्यासाठी पाकिस्तानात गेली होती. सीमा हैदर हिच्या प्रकरणानंतर ती चर्चेत आली. आता अंजूबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे.

भारतातून पाकिस्तानला गेलेल्या अंजूचा मोठा निर्णय, इस्लाम धर्म स्वीकारला आणि...
Anju love story
Follow us on

कराची | 25 जुलै 2023 : पाकिस्तानात गेलेल्या भारतीय अंजूने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. राजस्थानहून पाकिस्तानला गेलेल्या अंजूने नसरुल्लासोबत लग्नही केलं आहे. पाकिस्तानात गेलेली अंजू आता फातिमा बनली आहे. अंजू ही फेसबुक फ्रेंडला भेटण्यासाठी पाकिस्तानला गेली होती. या फेसबुक फ्रेंडसोबत तिने लग्न केल्याची माहिती मिळत आहे. अंजू विझा घेऊन पाकिस्तानात गेली होती. तिने सुरुवातीला आपल्या मित्राला भेटण्यासाठी पाकिस्तानला जात असल्याची माहिती दिली होती. तसेच आपण काही दिवसांनी परत भारतात येणार असल्याचं तिने सांगितलं होतं. पण आता पाकिस्तानातून अंजूने लग्न केल्याची माहिती समोर येत आहेत. अंजूचं भारतात याआधीचं लग्न झालंय. तिला पहिल्या पतीपासून दोन मुलंदेखील आहेत. अंजू धर्म परिवर्तन करण्याआधी खिस्ती धर्मीय होती, अशी माहिती मिळत आहे.

अंजूने जिल्हा कोर्टात लग्न केलं. मालकुंड डिवीजनचे डीआयडी नासीर महमूद दस्ती यांनी अंजू आणि नसरुल्लाह यांच्या लग्नाची पुष्टी केल्याची माहिती पाकिस्तानच्या माध्यमांनी दिली आहे. अंजूला लग्नानंतर पोलिसांच्या सुरक्षेत घरी पोहोचवण्यात आलं आहे.

दरम्यान, नसरुल्लाहने लग्न केलं नसल्याचं म्हटलं आहे. अंजू माझी मैत्रिण आहे. पण मी तिच्यावर त्या दृष्टीकोनाने प्रेम करत नाही, असं नसरुल्लाहने म्हटलं आहे. असं असताना दोघांचा निकाहनामा समोर आलाय. त्यामुळे नेमकं खरं कोण? असा प्रश्न उपस्थित होतोय.

हे सुद्धा वाचा

अंजूची जी इच्छा असेल तेच होईल. अंजूने नाही सांगितलं तर लग्न होणार नाही, असं नसरुल्लाहने सांगितलं. अंजूला आज कोर्टात हजर करण्यात आलं. यावर नसरुल्लाह म्हणाला की, अंजू विदेशी असल्याने तिच्यावर हल्ला होऊ शकतो म्हणून तिला कोर्टात हजर करण्यात आलं. पण तिच्यावर कोण हल्ला करु शकतो? या प्रश्नाचं उत्तर तो देऊ शकला नाही.

अंजू नेमकी आहे तरी कोण?

अंजू ही मूळची भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील कैलोरची नागरीक आहे. ती एका खासगी कंपनीत नोकरी करते. तिने 2007 मध्ये अरविंद नावाच्या व्यक्तीसोबत लग्न केलं होतं. ती लग्नानंतर आपल्या पतीसोबत राजस्थानमधील भिवाडी येथे आपल्या पतीसोबत राहत होती.

अंजू आणि अरविंद यांना दोन मुलं आहेत. अंजू ही फेसबुकच्या माध्यमातून नसरुल्लाच्या संपर्कात आली होती. त्यानंतर दोघांची मैत्री झाली होती. त्यानंतर दोघं फोनवरती देखील बोलायला लागले होते. या दरम्यान त्यांची घट्ट मैत्री झाली आणि ती नसुरल्लाहला भेटण्यासाठी पाकिस्तानला गेली.