Israel-hamas war : इस्रायल-हमास संघर्षात आणखी एका देशाची उडी, युद्धाची केली घोषणा
Israel-hamas conflict : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेला संघर्ष अजुनही सुरुच आहे. जग या युद्धामुळे दोन गटात वाटला गेला आहे. हमासला संपवण्याची शपथ इस्रायलच्या पंतप्रधानांनी घेतली आहे. तर इस्रायलविरोधात आता आणखी एका देश युद्धात उतरला आहे.
Israel-hamas war : इस्रायल विरुद्ध हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धात आता येमेनही उतरला आहे. येमेनच्या हुथी बंडखोरांच्या सरकारने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात असे म्हटले आहे की ते इस्रायलविरुद्ध युद्धाची घोषणा करत आहेत. सध्या येमेनमध्ये हुथी बंडखोरांचे सरकार आहे ज्यांनी 2014 मध्ये राजधानीवर कब्जा केला होता. या सरकारला इराणचा पाठिंबा आहे आणि हुथी वेळोवेळी इस्रायलवर रॉकेट आणि क्षेपणास्त्रे डागत राहिला आहे.
इस्रायलवर आणखी क्षेपणास्त्रे डागण्याचा इशारा
हुथी सरकारचे पंतप्रधान अब्देल अझीझ बिन हबतूर म्हणाले की, आम्ही आमच्या लोकांना गाझामध्ये मरण्यासाठी सोडू शकत नाही. गाझामध्ये युद्धविराम न झाल्यास ते इस्रायलवर आणखी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागतील.
दरम्यान, येमेनमधून इस्रायलवर डागलेल्या क्षेपणास्त्राला रोखण्यासाठी इस्रायलने प्रथमच एरो एअर डिफेन्स सिस्टीमचा वापर केला आणि क्षेपणास्त्र यशस्वीरित्या नष्ट केले. इस्रायल-गाझामध्ये सतत हल्ले करुन हमासला नष्ट करण्याचा मार्गावर आहे.
परदेशी ओलिसांची सुटका
येत्या काही दिवसांत परदेशी ओलिसांची सुटका करणार असल्याचे हमासने म्हटले आहे. 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यानंतर हमासने सुमारे 220 इस्रायली आणि परदेशी नागरिकांना ओलीस ठेवले होते. ज्यामध्ये दोन अमेरिकन आई-मुलगी आणि दोन वृद्ध इस्रायली महिलांची सुटका करण्यात आली आहे.
जर्मन-इस्त्रायली ओलीस ठेवलेल्या महिलेच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. याआधीही हमासने ५० ओलिसांच्या सुटकेचा दावा केला होता, मात्र इस्रायलने हा हमासचा प्रचार असल्याचे म्हटले होते.